‘या’ तारखेला जन्मलेल्या मुली पतीसाठी भाग्यशाली मानल्या जातात, चेक करा बर्थडेट!

अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून भविष्य जाणून घेता येते. असं म्हटलं जातं की या तारखांना जन्मलेल्या मुलींच्या पतीने तिच्या नावावर व्यवसाय केला तर त्यात यश मिळतं. या जन्मतारीख असलेल्या मुली आपल्या पतींसाठी खूप प्रेमळ असतात. ती तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात चांगला सुसंवाद राखते. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या तारखा…

numerology-4

Numerology: अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून भविष्य जाणून घेता येते. ज्या मुलींची जन्मतारीख ३, १२, २१ किंवा ३० आहे अशा मुली त्यांच्या पतीसाठी खूप भाग्यवान मानल्या जातात. असं म्हटलं जातं की जर तिच्या पतीने तिच्या नावावर व्यवसाय केला तर त्यात यश मिळतं. या जन्मतारीख असलेल्या मुली आपल्या पतींसाठी खूप प्रेमळ असतात. ती तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात चांगला सुसंवाद राखते.

अशा मुली शांत स्वभावाच्या असतात. करिअरमध्ये चांगलं स्थान प्राप्त करतात. त्या भविष्यातील घडामोडी अगोदरच सांगतात. त्यामुळे त्यांना प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता असते. त्या नोकरी आणि व्यवसाय दोन्ही करू शकतात. हातात घेतलेले काम पूर्ण करूनच ते दम घेतात. त्यांच्यात प्रचंड हिंमत असते. जीवनात येणाऱ्या सर्व प्रसंगांना तोंड देण्यास अशा मुली सक्षम असतात.

आणखी वाचा : Chanakya Niti: आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील, चाणक्य नीतिमधील या टिप्स एकदा वापरून पाहा…

या जन्मतारीख असलेल्या मुलींमध्ये उत्तम नेतृत्व क्षमता असते. सर्वत्र ती एक नेत्याच्या रुपात समोर येते. त्यांचे काम करून घेण्यातही अशा मुली तज्ञ मानल्या जातात. अनेक वेळा यश मिळाल्यावर त्यांच्यात थोडा अहंकारही दिसून येतो. ते खूप दयाळू देखील आहेत. सर्वांना मदत करण्यास तयार आहेत. खूप मेहनत करून त्यांना कमी वेळात खूप प्रगती मिळते.

आणखी वाचा : Chandra Grahan 2021: काही दिवसांनी होणार आहे चंद्रग्रहण, या ४ राशीच्या लोकांनी सावधानता बाळगावी

लग्नापूर्वी त्यांचे लव्ह लाईफ तणावपूर्ण असण्याची शक्यता असते. पण त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी असतं. ती आपल्या पतीला आनंदी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. त्यांच्या प्रगतीत ते पूर्ण सहकार्य करतात. असं म्हणतात की तिने ज्या पुरुषाशी लग्न केलं त्यानंतर त्यांच्या पतीचं नशीब चमकतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Girls with these dates of birth are considered lucky for husband maa lakshmi is kind to them prp

Next Story
एचआयव्ही परिक्षणाने भारतात वाचतील लाखो प्राण
ताज्या बातम्या