लग्न आणि सणासुदीच्या काळात सोनं खरेदीकडे लोकांचा कल असतो. त्याचबरोबर गुंतवणूक म्हणून चांदीकडे पाहिलं जातं. त्यामुळे खरेदीदारांचं रोज चढउतार होण्याऱ्या सोनं-चांदीच्या भावाकडे लक्ष असतं. भारतात प्राचीन काळापासून लोक सोन्यात गुंतवणूक करणे सर्वोत्तम मानतात. लोक त्यांच्या गरजेनुसार सोने खरेदी करत असतात. महिलांना साधारणपणे दागिने खरेदी करायला आवडतात. मात्र अनेकदा सोनं खरं की खोटं याबाबत संभ्रम असतो. अनेक वेळा लोक बाजारातील कोणत्याही लहानशा दागिन्यांच्या दुकानात सोने खरेदी करतात. नंतर सोनं खोटे निघाले तर त्यांचे मोठे नुकसान होते. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर खऱ्या आणि खोट्या सोन्यामधील फरक नीट समजणं गरजेचं आहे. यामुळे तुमची फसवणूक टळेल. चला तर मग खरे आणि खोटे सोने कसे ओळखायचे, हे जाणून घेऊयात.

जेव्हा तुम्ही बाजारात सोने खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा दागिन्यांवर नेहमी हॉलमार्क चिन्ह असावे याची विशेष काळजी घ्या. हे सोन्याची शुद्धता दर्शवते. सर्टिफिकेशन ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सद्वारे शुद्ध सोन्याला हे चिन्ह दिले जाते. कधीकधी स्थानिक ज्वेलर्स हॉलमार्कशिवाय दागिने विकतात. अशा परिस्थितीत हॉलमार्क केलेले सोने विकणाऱ्या दागिन्यांच्या दुकानातूनच सोने खरेदी करण्याचा प्रयत्न करा.

सोन्याची शुद्धता अशी ओळखावी: २४ कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण २४ कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. सामान्यपणे २२ कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये ९१.६६ टक्के सोने असते. जर तुम्ही २२ कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की २२ कॅरेट सोन्यामध्ये २ कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित ५ प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

पाण्यात टाकून तपासून बघा: पाण्याच्या मदतीने तुम्ही खरे आणि खोटे सोने सहज ओळखू शकता. पाण्यात टाकल्यावर खरे सोने लगेच बुडते. तर खोटे सोने पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगते. एक ग्लास पाण्याच्या मदतीने तुम्ही खरे आणि खोटे सोने ओळखू शकता. जर सोने पाण्याच्या पृष्ठभागाच्या खाली जात नसेल तर ते खोटं आहे.

चुंबकाद्वारे ओळखा: तुम्ही चुंबकाच्या सहाय्यानेही सोने ओळखू शकता. चुंबक खऱ्या सोन्याला चिकटत नाही. परंतु खोट्या सोन्यावर चिकटू शकते. सोन्यामध्ये चुंबकीय धातू मिसळण्यात आल्यास चिकटते. त्यामुळे खोटं सोनं ओळखण्यास मदत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिनेगरद्वारे ओळखा: जवळजवळ प्रत्येक घरात व्हिनेगर असते. त्याच्या मदतीने तुम्ही खरे आणि खोटे सोने ओळखू शकता. तुम्ही सोन्यावर व्हिनेगरचे काही थेंब टाका. नंतर व्हिनेगर रंग बदलत आहे की नाही ते तपासा. जर व्हिनेगर रंग बदलत असेल तर सोने बनावट आहे.