गुगलने शोधकर्ता अँजेलो मोरिओन्डो यांची १७१ वी जयंती कलात्मक डूडलद्वारे साजरी केली. मोरिओन्डोला एस्प्रेसो मशिन्सचे गॉडफादर मानले जाते. १८८४ मध्ये पहिल्या ज्ञात एस्प्रेसो मशीनचे पेटंट घेण्याचे श्रेय त्यांना मिळाले. ऑलिव्हिया व्हेनने तयार केलेल्या पहिल्या एक्सप्रेसो मशीनचा GIF डूडलने तयार केला आहे.

कोण आहेत अँजेलो मोरिओन्डो?

अँजेलो मोरिओन्डोचा जन्म ६ जून १८५१ रोजी इटलीतील ट्यूरिन येथे उद्योजकांच्या कुटुंबात झाला. मोरिओन्डोच्या आजोबांनी वाइन उत्पादन कंपनीची स्थापना केली. यानंतर मोरिओन्डोच्या वडिलांनी ती कंपनी सांभाळली. नंतर, अँजेलोने स्वतःच त्याचा भाऊ आणि चुलत भाऊ सोबत ‘मोरिओन्डो आणि गॅरिग्लिओ’ ही लोकप्रिय चॉकलेट कंपनी तयार केली.

‘या’ भारतीयाचे आइनस्टाईनही होते मोठे चाहते

मोरिओन्डो यांनी शहराच्या मध्यभागी असलेल्या पियाझा कार्लो फेलिस येथे ‘ग्रँड-हॉटेल लिगूर’ आणि व्हिया रोमावरील गॅलेरिया नाझिओनाले येथे ‘अमेरिकन बार’ ही दोन दुकाने विकत घेतली. मोरिओन्डोच्या काळात इटलीमध्ये कॉफी अत्यंत लोकप्रिय होती. मात्र, कॉफी तयार होण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागत असल्याने ग्राहकांची गैरसोय व्हायची.

गुगलने सांगितले, “मोरिओन्डोने विचार केला की एकाच वेळी अनेक कप कॉफी तयार करून, तो अधिक ग्राहकांना जलद सेवा देऊ शकतो, ज्यामुळे त्याला त्याच्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करता येईल.” १८८४ मध्ये ट्यूरिन येथील जनरल एक्स्पोमध्ये मोरिओनाडोने त्याचे एस्प्रेसो मशीन सादर केले. सादरीकरणापूर्वी त्यांनी मशीन एका मेकॅनिकच्या देखरेखीखाली ठेवली. येथे याला कांस्य पदक देण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मशिनमध्ये एक मोठा बॉयलर होता जो गरम पाण्यासोबत कॉफी देत ​​असे. २३ ऑक्टोबर १८८५ रोजी पॅरिसमध्ये नोंदणी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय पेटंटद्वारे या शोधाची पुष्टी झाली. मोरिओन्डोला पेटंट मिळाले. मोरिओन्डोने नंतरच्या वर्षांत त्याच्या शोधात सुधारणा करणे आणि पेटंट करणे सुरू ठेवले.