दिग्गज टेक कंपनी गुगलने आज एका इव्हेंटमध्ये भारतात नवीन भाषा फिचर लाँच करण्याची घोषणा केली. गुगलने भारतात आपलं नवीन बहुभाषी मॉडेल MuRIL लाँच केलंय. नवीन फिचरमुळे गुगलच्या विविध सेवांना भारतातील स्थानिक भाषेचा सपोर्ट मिळेल.
आता युजर्सनी मोबाइल फोनवर गुगल सर्च केल्यास रिझल्ट इंग्रजीशिवाय तेलगू, तामिळ, बांगला आणि मराठी भाषेतही दिसेल. आतापर्यंत गुगल सर्चचा रिझल्ट हिंदी आणि इंग्रजी भाषेतच येत होता. पण आता स्थानिक भाषांमध्येही युजर्सना हा रिझल्ट मिळेल. याशिवाय गुगल मॅप्समध्येही तुम्हाला सिस्टिममधील भाषा न बदलता 9 भाषांमध्ये रिझल्ट दिसेल.
नवीन फिचरमुळे युजर्सना Google असिस्टंटमध्येही आवडीच्या भाषेचा पर्याय मिळेल. युजर्स अॅप सेटिंग्समध्ये जाऊन आवडीची भाषा निवडू शकतात. याशिवाय, कंपनीने ‘गुगल लेन्स’साठी ‘होमवर्क’ नावाचं एक नवीन फिचर आणलं आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना गणिताच्या समस्या सोडवण्यास मदत होईल. ही सेवा हिंदी आणि इंग्रजीत उपलब्ध असेल.