हवामानातील बदलांचा केसांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. हवामानातील बदलांमुळे केसांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. हिवाळ्यात तर केस कोरडे होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे या दिवसांमध्ये केसांची काळजी घेणे गरजेचे असतं. केसांची काळजी घेण्यासाठी अनेकजण हेअर सीरमचा वापर करतात. मात्र, हेअर सीरम वापरण्याबाबत अनेकांच्या मनामध्ये संभ्रम असतो. हेअर सीरमचा वापर कसा करावा? तो कोणत्या लोकांनी वापरावा? आणि तो कोणत्या वेळी वापरणे चांगलं आहे याबाबतचे अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेकजण हिवाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी हेअर सीरमचा वापर कसा करावा? याबाबतचे प्रश्न ब्युटीशियनला विचारतात. तुम्हालाही जर अशा प्रकारचे प्रश्न पडत असतील, तर हेअर सीरमचा वापर आणि केसांची निगा यांच्याशी संबंधित काही महच्वाच्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हेही वाचा- तुम्हीही झोपेत दात चावता का? हे असू शकतं ‘या’ गंभीर आजाराचं लक्षण, वेळीच ओळखा

हेअर सीरम कोणी वापरावे?

हेअर सीरम कोणी वापरावे आणि कोणी नको याबाबत काही नियमावली नाही. प्रत्येकजण हेअर सीरमचा वापर करु शकतो. पण तुमच्या केसांच्या गरजेनुसार कोणते हेअर सीरम चांगले आहे, याबाबतची माहिती तुम्हाला असायला हवी, ती जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या ब्युटीशियनची मदत घेऊ शकता. कारण कोरड्या केसांसाठी मॉइश्चरायझिंग सीरम येतो आणि तेलकट केसांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे नरिशिंग सीरम मिळतात.

हेअर सीरम रोज वापरावे का?

हेही वाचा- थंडीत सतत अंगदुखी का होते? जाणून घ्या यामागचे कारण

तुम्ही तुमच्या केसांच्या गरजेनुसार योग्य हेअर सीरम निवडले असेल तर तुम्ही ते रोज लावू शकता. कारण हेअर सीरम कोणत्याही प्रकारचे कोटिंग किंवा थर मागे सोडत नाही. त्याऐवजी, हे पोषक तत्वांनी भरलेले एक द्रव आहे, जे केसांना आवश्यक पोषण देण्याचे काम करते. त्यामुळे जरी त्याचा वापर दररोज करु शकता.

हेअर सीरमचा वापर करणाऱ्यांनी केसांना तेल लावावे का?

हेअर सीरम आणि केसांचे तेल या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत आणि दोन्ही एकमेकांच्या बदली नाहीत. कारण हेअर सीरम हे हेअर स्टाइलशी संबंधित उत्पादन आहे. हेअर सीरम हे केसांना स्टायलिंगमुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचवण्यासोबतच केसांना पोषण देण्याचे काम करतं. हे केसांना लगेच चमक देते, ज्यामुळेतुमचे केस अधिक चमकदार दिसावेत. मात्र, केसांच्या सर्वांगीण वाढीसाठी केसांना तेल लावण आवश्यक आहे. त्यामुळे हेअर सीरम वापरणाऱ्यांनी केसांना तेल लावणं गरजेच आहे.

केसांचे सीरम कधी लावावे ?

हेही वाचा- तुम्हीही चहासोबत टोस्ट आवडीने खाताय? तर आत्ताच थांबवा, त्यामुळे होणारे ‘हे’ गंभीर परिणाम एकदा जाणून घ्याच

हेअर सीरम नेहमी स्वच्छ केसांमध्ये लावावे. शॅम्पूनंतर तुमचे केस कोरडे झाल्यानंतर तुम्ही केशरजना करण्यापूर्वी हेअर सीरमचा वापर करु शकता.

हेअर सीरम लावण्याचे फायदे

हेअर सीरम हे केसांना पोषण देतात शिवाय ते केसांमध्ये चमक आणतात. तसचं सीरमच्या वापरामुळे केसांची लवचिकता वाढते. शिवाय ते केंसांचे नुकसान नियंत्रित करण्यास आणि केसांना मऊ बनवण्यास मदत करते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hair tips learn how to use hair serum for winter hair care jap
First published on: 07-01-2023 at 10:39 IST