Dasara 2022 Wishes in Marathi : Read and share Vijayadashami 2022 Wishes, whatsapp status, message, facebook status | Loksatta

Happy Dasara 2022 : दसऱ्याच्या शुभदिनी आपल्या प्रियजनांना ‘हे’ संदेश पाठवून द्या खास शुभेच्छा

Vijayadashami 2022 Wishes in Marathi : काही कारणांमुळे तुम्ही आपल्या प्रियजनांना भेटू शकत नसाल, तर काही खास संदेश पाठवून तुम्ही त्यांना दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या शुभेच्छा देऊ शकता.

Happy Dasara 2022 : दसऱ्याच्या शुभदिनी आपल्या प्रियजनांना ‘हे’ संदेश पाठवून द्या खास शुभेच्छा
दसऱ्याच्या शुभदिनी आपल्या प्रियजनांना 'हे' संदेश पाठवून द्या खास शुभेच्छा

Dasara 2022 Wishes in Marathi : अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला दसरा साजरा केला जातो. याच दिवशी विजयादशमीही साजरी केली जाते. हा सण म्हणजे अधर्मावर धर्माचा विजय. याच दिवशी भगवान राम यांनी रावणाचा वध करून माता सीतेला परत आणले होते, असे मानले जाते. याचाच आनंद म्हणून हा सण साजरा केला जातो. हा सण संपूर्ण देशात अगदी उत्साहात साजरा केला जातो. लोक आपले कुटुंब, मित्रपरिवार, नातेवाईक यांच्यासह हा सण साजरा करतात. मात्र, काही कारणांमुळे आज तुम्ही आपल्या प्रियजनांना भेटू शकत नसाल, तर खास संदेश पाठवून तुम्ही त्यांना दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या शुभेच्छा देऊ शकता.

दसऱ्याचा हा पवित्र सण तुमच्या घरात अनंत आनंद घेऊन येवो.
भगवान राम यांच्या आशीर्वादाने तुमच्यावर सुखाचा वर्षाव होवो.
दसऱ्याच्या शुभेच्छा!

दसरा म्हणजे,
अधर्मावर धर्माचा विजय,
असत्यावर सत्याचा विजय,
वाईटावर चांगल्याचा विजय,
पापावर पुण्यचा विजय,
जुलूमशाहीवर सद्गुणाचा विजय,
क्रोधावर दया, क्षमेचा विजय,
आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय,
तुम्हाला दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

दसऱ्याच्या शुभदिनी केवळ रावणाच्या पुतळ्याचेच दहन नाही, तर आपल्यातील दुर्गुणांचेही दहन करूया.
रामाचे हृदयात स्मरण करून धर्ममार्गावर चालण्यास सुरुवात करूया.
तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा!

प्रभू श्रीरामाचे नाव हृदयात ठेवून आपल्यातील रावणाचा नाश करूया.
तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा!

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
सुंदर मी होणार- केसांचे सौंदर्य कसे राखाल?

संबंधित बातम्या

तुमचाही मुलगा हातात मोबाईल घेतल्याशिवाय जेवत नाही? जाणून घ्या मुलांची ही सवय सोडवण्याचे उपाय
Benefits of Boiled Egg In Winter: हिवाळ्यात उकडलेली अंडी खाणं आरोग्यासाठी ठरतं फायदेशीर; जाणून घ्या ‘हे’ आश्चर्यकारक फायदे
बदाम खाल्ल्याने ‘हे’ ४ त्रास १०० च्या वेगाने वाढू शकतात! एका दिवसात किती व कसे बदाम खाणे आहे योग्य?
तोंडाची दुर्गंधी ठरू शकते ‘या’ जीवघेण्या आजारांचे लक्षण; वेळीच करा ‘हे’ उपाय
फ्रिजमध्ये खाद्यपदार्थ ठेवताना कोणती काळजी घ्यावी? ‘या’ उपयुक्त टिप्स नेहमी लक्षात ठेवा

व्हिडिओ

ताज्या बातम्या
नादच केला पठ्ठ्यानं! चक्क किंग कोब्रालाच घातली आंघोळ, श्वास रोखून धरणारा असा Viral Video यापूर्वी पाहिला नसेल?
श्माम बेनेगलांनी लीड रोल दिला नाही, तर कमर्शिअल चित्रपटवाले कसे देणार? – नीना गुप्ता
मुंबई: जादूटोणा केल्याची बतावणी करीत घरातून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दाम्पत्याला अटक
Benefits of Boiled Egg In Winter: हिवाळ्यात उकडलेली अंडी खाणं आरोग्यासाठी ठरतं फायदेशीर; जाणून घ्या ‘हे’ आश्चर्यकारक फायदे
VIDEO: “अनेक मुलींचे खून हिंदू मुलांकडूनही झालेत आणि…”, ‘लव्ह जिहाद’वर बोलताना संजय राऊतांचं मोठं विधान