Happy Friendship Day 2025 Wishes Quotes Message: मित्र-मैत्रिणींशिवाय आयुष्य पूर्णचं होऊ शकत नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही खास मित्र-मैत्रिणी असतात, ज्यांच्याबरोबर आपण लहानाचे मोठे होतो, अनेक गोष्टी त्यांच्याबरोबर शेअर करतो. सुख-दुःखात ते आपली साथ देतात. चुकीच्या मार्गावर चालत असताना वाट दाखवतात. अशाच खास दोस्तांसाठी दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. (Happy Friendship Day 2025 Marathi Shubhechha Sandhesh Wishes, message, status, quotes)
या वर्षी फ्रेंडशिप डे हा ३ ऑगस्टला रविवारी आहे. शाळा, कॉलेजमध्ये एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधून, तर कधी टी-शर्ट किंवा हातावर मार्करने सह्या करून हा दिवस साजरा केला जातो. पण, हल्ली फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा ट्रेंड बदलतोय. यात ट्रेंडनुसार आता सोशल मीडियावर तरुणाई प्रत्येक सणाचं सेलिब्रेशन करताना दिसते, त्यामुळे दोस्तांना फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही खास Facebook Messages, WhatsApp Status, HD Images, Greetings मजेशीर मराठी शुभेच्छापत्र घेऊन आलो आहोत, ज्या आजच डाऊनलोड करून मित्रांना पाठवायला विसरू नका.
फ्रेंडशिप डे शुभेच्छा संदेश (Happy Friendship Day Wishes And Messages)
१) रक्ताची नसूनही रक्तात भिनते ती मैत्री
मैत्री दिनाच्या शुभेच्छा!

२) मैत्री ही कृष्ण आणि सुदाम्यासारखी असावी
एकाने गरिबीतही स्वतःचा
कधीच स्वाभिमान सोडला नाही
आणि दुसऱ्याने श्रीमंतीचा कधीच अभिमान केला नाही.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
३) वारा बेधूंद, दुनियादारीचा गंध
फुलांचा सुगंध आणि आपले जन्मोजन्मीचे ऋणानुबंध…
मैत्री दिनाच्या शुभेच्छा!

४) मन मोकळेपणाने आपण ज्याच्याकडे बोलू शकतो, रागावू शकतो,
आपलं मन हलकं करू शकतो ती म्हणजे जिवलग मैत्री….
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! (Friendship Day 2025 Wishes)
५) लोक रूप पाहतात, आम्ही हृदय पाहतो…
लोक स्वप्न पाहतात, आम्ही वास्तव पाहतो…
लोक जगात मित्र पाहतात, आम्ही मित्रांमध्ये जग पाहतो

फ्रेंडशिप डे कोट्स (Friendship Day Quotes In Marathi)
१) उधार मागणाऱ्या आणि उदार होऊन मदत करणाऱ्या
सगळ्यांना हॅप्पी फ्रेंडशिप डे.
तुम्ही आपले खास आहात!
२) मला ‘मी’ म्हणून स्वीकारणाऱ्या प्रत्येकाला
हॅप्पी फ्रेंडशिप डे!
३) भले माझ्या मित्रांना रोज कितीही टोमणे मारा पण…
नशीब लागतं राव…
माझ्यासारखा बेस्ट फ्रेंड मिळायला..
हॅप्पी फ्रेंडशिप डे, दोस्ता!
४) दुःख अडवायला उंबरासारखा
मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा
मैत्री दिनाच्या शुभेच्छा!
फ्रेंडशिप डे व्हॉट्सअप स्टेटस (Friendship Day Whatsapp Status)
१) फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमवून ते जतन करणे महत्त्वाचे आहे, मैत्री….
२) मैत्री म्हणजे कुंडली न जुळवता आयुष्यभर साथ देणारं एक नातं…
३) दोन गोष्टी सोडून मैत्री करा
एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा

४) कोण म्हणतं मैत्री बरबाद करते
जर निभावणारे कट्टर असतील ना तर
सारी दुनिया सलाम करते
५) आम्ही वेळ घालवण्यासाठी मैत्री करत नाही
मित्रासाठी वेळ घालवतो.
तुम्हाला सर्वांना आमच्याकडून हॅप्पी फ्रेंडशिप डे!