Holi 2019 : रंगात रंगुनी सारे जाल पण धुळवडी नंतर…

धुळवडीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तुम्हाला कोरडय़ा त्वचेमुळे आणि रखरखीत केसांमुळे धक्का बसला असेल तर थोडी काळजी घ्यावी लागेल.

संग्रहित छायाचित्र

Happy holi 2019: ‘रंगात रंगुनी सारे..’ असे म्हणत आपण सारे धुळवडीच्या रंगात रंगुनी जातो. तुम्हीही धुळवड साजरी करत धम्माल उडवl असाल. पण धुळवडीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तुम्हाला कोरडय़ा त्वचेमुळे आणि रखरखीत केसांमुळे धक्का बसला असेल तर थोडी काळजी घ्यावी लागेल.

धुळवडीनंतर अनेक रुग्ण त्वचेच्या तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे जातात. रंगांचा दुष्परिणाम झाल्याने त्वचेची जळजळ होत आहे, त्वचेवर सर्वत्र कोरडे चट्टे उठलेले आहेत, असा त्यांचा तक्रारीचा सूर असतो. खरे तर रंग खेळण्यापूर्वी त्वचेची थोडी काळजी घेतली तर त्यानंतरचे दुष्परिणाम टाळता येतील. रंगांमधील धोकादायक रसायनांमुळे चेहऱ्याच्या त्वचेच्या वरच्या थरातून आद्र्रता व नैसर्गिक तेल कमी होतात. हा सण हिवाळ्याच्या अखेरीस येत असल्याने आधीच आद्र्रता कमी असते. त्वचेतील तेल व आद्र्ता राखण्यासाठी मॉइश्चराइज्ड क्रीम तसेच तेलाचा वापर करता येईल. ‘अल्ट्रासोनिक विथ मॉइश्चरायिझग सीवीड मास्क’ किंवा ‘इलेक्ट्रोपोरेशन विथ नरिशिंग सिरम’ आणि ‘रोझ हिप ऑइल’ यांचा वापर धुळवडीच्या काही दिवस आधी केला तर रंगांमुळे त्वचेतून होणारा तेलाचा मोठय़ा प्रमाणावरील ऱ्हास भरून काढतो येतो. जीवनसत्त्व ‘ई’ आणि कोरफड असलेली मॉइश्चरायझर्स हे मसाजसाठी उत्तम पर्याय आहेत.

* रंग खेळायला जाण्यापूर्वीही मॉइश्चरायझर लावल्यास घातक परिणाम मर्यादित होऊ शकतात.

* एकदा रंग खेळून झाल्यावर ते लगेचच धुवून काढा. धुण्यापूर्वी मेकअप रिमूव्हिंग क्लिंझर्सचा वापर करून चेहरा, गळा व हात स्वच्छ करता येतील. मात्र आता रंग खेळून झालेले आहेत. तुम्ही आधी काळजी घेतली नसेल तरी त्यावर काही उपाय करता येतील.

* रंग एका दिवसात जात नाहीत. त्यामुळे ते काढण्यासाठी त्वचा घासू नका. त्यामुळे कदाचित रंग तर जाणार नाहीतच पण त्वचेचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी आणखी काही काळ जाईल. धुताना त्वचेवर जास्त साबण घासला जातो. शरीराच्या इतर भागातील त्वचेपेक्षा चेहऱ्यावरील त्वचा अधिक नाजूक असते. त्यामुळे ती घासल्यावर अधिक कोरडी होते व रॅशेसही उठतात.

* सर्व रंग धुवून निघाला तरी त्यासोबत त्वचेतील तेलही गेल्याने त्वचा खूप कोरडी होते. त्यामुळे त्वचेवर मॉइश्चरायझरचा एक जाड थर लावा आणि आठवडाभर ते काही काळ वापरा.

* डीप क्लिंझग, हायड्रेटिंग आणि नरििशग थेरपीमुळे त्वचा पूर्ववत होऊ शकते. भरपूर जीवनसत्त्व तसेच अण्टीऑक्सिडंटचा वापर करा. मात्र त्वचेवरील चट्टे अधिक प्रमाणात असतील तर त्वचाविकारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Happy holi 2019 skin hair care tips to enjoy holi better