jaggery and fennel seeds benefits for skin : जेवणानंतर सहसा आपण काही तरी गोड पदार्थ किंवा बडीशेप खाणे पसंत करतो. पण, जेवणानंतर गूळ आणि बडीशेप खाणे पचन व तोंडाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. गूळ गोड खाण्यावर नियंत्रण ठेवते, अन्न लवकर पचण्यास मदत होते; तर दुसरीकडे बडीशेप नैसर्गिक माउथ फ्रेशनर आहे; जी श्वासाची दुर्गंधी दूर करून बॅक्टेरिया कमी करण्यास मदत करते. त्यामुळे दोन्ही मिळून गॅस, ॲसिडीटी, पोटफुगी यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. गूळ शरीरातील विषारी पदार्थ काढून यकृत स्वच्छ करतो तर बडीशेप आतडे थंड, शांत करते आणि पचनसंस्था सक्रिय ठेवते. जेवणानंतर दररोज थोडासा गूळ व अर्धा चमचा बडीशेप खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, पोटातील जडपणा दूर होतो आणि तोंडाची स्वच्छता सुधारते.
होमिओपॅथिक डॉक्टर मनदीप दहिया यांच्या मते, गूळ, बडीशेप दोन्ही आयुर्वेदात सुपरफूड मानले जातात. एकत्र सेवन केल्यावर शरीर आतून स्वच्छ होण्यास मदत होते, पचन सुधारते आणि अनेक रोगांचा धोका कमी होतो. या दोन्हीमध्ये असलेले जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स शरीराला ऊर्जा, पोषण आणि संरक्षण देतात.
बडीशेपचे फायदे – बडीशेपमध्ये अँटिऑक्सिडंट बी असते; ज्यामुळे ज्यामध्ये लोह, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम यांसारखे पोषक घटक असतात. बडीशेप खाल्ल्याने कमजोर पचनशक्ती ठीक होते. बडीशेप रोज जेवणानंतर खाल्ल्यास पोटातील फॅटी लिव्हर, गॅस, ॲसिडिटी, पोट फुगणे, अपचन दूर होते याचबरोबर महिलांमध्ये लोहाची कमतरता कमी करण्यास मदत करते. यामुळे शरीराला थंडावा मिळतो, पोटाची जळजळ कमी होते आणि रक्तातील साखर, उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यात मदत होते.
गुळाचे फायदे – गूळ एक सुपरफूड आहे; जे व्हिटॅमिन बी६, बी१२, फोलेट, आयर्न, मॅग्नेशियम, झिंक यासारख्या आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. गुळाचे सेवन केल्याने रक्त शुद्ध होते, शरीरात स्टॅमिना, ऊर्जा वाढत, कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी गुळाचे सेवन प्रभावी ठरते. त्याचबरोबर त्वचेवरील डाग कमी, लोहाची कमतरता दूर करण्यासाठी, उन्हाळ्यात गूळ शरीराला ऊर्जा, ताजेपणा देण्यासाठी गूळ फायदेशीर आहे.
पोट फुगणे – सकाळी रिकाम्या पोटी पाण्याबरोबर गूळ, बडीशेप यांचे सेवन केल्याने पोटातील उष्णता कमी होते आणि पोट फुगणे, गॅस, ॲसिडिटी नियंत्रित राहते .
पचनसंस्था – गूळ आणि बडीशेप एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया सक्रिय राहते; त्यामुळे अन्न लवकर पचते, शरीराला पोषक तत्वांचा पुरवठा होतो; ज्यांना सकाळी पोटात जळजळ किंवा आंबट ढेकर येतात त्यांच्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे.
तोंडाची दुर्गंधी दूर होते – बडीशेपबरोबर गूळ खाल्ल्याने तोंडाचे आरोग्यही सुधारते. बडीशेप माऊथ फ्रेशनर म्हणून काम करते आणि तोंडातील बॅक्टेरिया कमी करते.
जीवनसत्त्वे आणि खनिजे – गूळ आणि बडीशेपचे मिश्रण आयर्न, फोलेट, बी-व्हिटॅमिन्स शरीरातील पोषक तत्वांचे संतुलन राखते. दोन्ही एकत्र खाल्ल्याने शरीरातील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता दूर होते.
सांधेदुखी आणि अशक्तपणा – बडीशेप आणि गूळ एकत्र खाल्ल्याने कॅल्शियम आणि लोहाचे शोषण वाढते; ज्यामुळे हाडे मजबूत होतात आणि वेदना कमी होतात.
कोलेस्ट्रॉल – गूळ आणि बडीशेप एकत्र खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित होते; ज्यामुळे हृदयविकाराच्या समस्या दूर होतात. दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने हार्ट ब्लॉकेजपासून आराम मिळतो.
लिव्हर डिटॉक्सिफाई – बडीशेप आणि गुळाच्या सेवनाने शरीरात साचलेली घाण निघून जाते आणि यकृत स्वच्छ होते.
वजन कमी होण्यास मदत – सकाळी रिकाम्या पोटी या दोन गोष्टी खाल्ल्याने चयापचय गतिमान होते, चरबी विरघळते. अर्धा चमचा एका बडीशेप आणि गुळाचा थोडासा तुकडा खाणे तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरेल.
