नवी दिल्ली : अ‍ॅलर्जीतून होणाऱ्या सर्दीमुळे नाक सतत वाहणे, नाक चोंदण्याचा त्रास काही जणांना सतत होतो. हवेतील सूक्ष्म कण, परागकण, धूलिकणांमुळे काहींना हा त्रास होतो. नाक किंवा तोंडावाटे हे शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे नाक सतत वाहते. शिंका येत राहतात. कान बधीर होतात. नाक चोंदल्याने नाकावाटे श्वास घेणे कठीण होते.  पाणी येत राहते. घसा खवखवतो. कुठल्याही वयोगटात हा त्रास उद्भवू शकतो.

प्रत्येक ऋतुबदलात हा त्रास होतो. या विकाराच्या रुग्णाच्या कुटुंबात अशी अ‍ॅलर्जी असणारे आप्त असतात. वंशपरंपरेने हा त्रास होऊ शकतो. धूलिकण, वनस्पती, बुरशीच्या संपर्कात आल्यावर हा विकार होतो. कबुतराच्या विष्ठेमुळे व पिसांमुळेही हा त्रास होऊ शकतो. अस्थमाच्या रुग्णांतही हा विकार पहावयास मिळतो. रुग्णाची सर्वागीण तपासणी करून त्याच्या कुटुंबाचा इतिहास तपासून तसेच रुग्णाच्या लक्षणांचे सातत्याने निरीक्षण करून त्यास अ‍ॅलर्जी आहे का, याचे नेमके निदान करता येते. काही त्वचा चाचण्या, रक्त तपासणीद्वारेही निदान पक्के करता येते. त्यानंतर त्याच्या प्रतिबंधासाठी उपाय करता येतात.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
heatwave heat, people of mumbai, summer season, Citizens, vomiting, dizziness, diarrhea
उष्णतेमुळे मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; नागरिक उलटी, चक्कर व अतिसाराने हैराण
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार

आपले निवासस्थानात, कार्यालयात स्वच्छता राखणे, वैयक्तिक स्वच्छता नियमित राखणे गरजेचे असते. केसाळ प्राण्यांना हात लावल्यानंतर हात स्वच्छ धुणे, लोकरीचे कपडे, उबदार रग, गालिचे कमी प्रमाणात वापरणे. सॉफ्ट टॉईजशी फार संपर्क न ठेवणे, ते अंथरुणात झोपताना जवळ न ठेवणे व गालिचे-अंथरूण-पांघरूण स्वच्छ करून सूर्यप्रकाशात ठेवण्याने धूलिकण घटून सर्दी होण्यास प्रतिबंध होतो. परंतु अशा घटकांशी पूर्ण संपर्क येऊ न देणे अशक्य असते. नाकात मारावयाचे औषधफवारे (स्प्रे) व गोळय़ांनी ही सर्दी अटोक्यात ठेवता येते.