scorecardresearch

Health Tips: ब्रश न करता पाणी पिणे आरोग्यासाठी खरच फायदेशीर आहे का? जाणून घ्या

काही लोकांचा असा विश्वास आहे की सकाळी ब्रश न करता पाणी पिणे अधिक फायदेशीर आहे.

drinking water before brushing
(फोटो: Freepik )

Health Tips: सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने (drinking water) शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर पडतात, असे तुम्ही घरातील मोठ्यांकडून ऐकले असेल. याशिवाय हायड्रेटेड (hydrate) राहण्यासाठी पाणी पिणेही खूप महत्त्वाचे आहे. आवश्यकतेपेक्षा कमी पाणी प्यायल्याने पोट आणि त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. दिवसातून १० ते १२ ग्लास पाणी प्यावे असा सल्लाही डॉक्टर देतात. त्याचवेळी, काही लोकांचा असाही विश्वास आहे की सकाळी ब्रश न करता पाणी पिणे अधिक फायदेशीर आहे. ब्रश न करता पाणी पिणे आरोग्यासाठी खरच फायदेशीर आहे का? जाणून घ्या

खरच आहे का फायदेशीर?

  • लोकांचा असा विश्वास आहे की सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते. याशिवाय तोंडात बॅक्टेरिया जमा होत नाहीत.
  • सकाळी रिकाम्या पोटी ब्रश न करता पाणी पिणे देखील आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते. ज्यांना सर्दी लवकर होते त्यांनी तर सकाळी आवर्जून पाणी प्यावे.
  • ब्रश न करता पाणी प्यायल्याने तुमचे केस मजबूत आणि चमकदार बनतात आणि त्वचेत चमकही राहते.
  • पोटाशी संबंधित समस्या जसे की बद्धकोष्ठता, कच्ची ढेकर येणे इत्यादी दूर होण्यास मदत होते.
  • जर तुम्हाला उच्च रक्तदाब आणि मधुमेह असेल तर तुम्ही सकाळी पाणी प्यावे.
  • सकाळी रिकाम्या पोटी ब्रश न करता पाणी प्यायल्याने लठ्ठपणा कमी होण्यासही मदत होते.

(हे ही वाचा: Hair Care Tips: केस कधी धुवायचे कसं ओळखायचं? जाणून घ्या)

(हा लेख फक्त सामान्य माहिती प्रदान करतो. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मत नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Health tips is drinking water without brushing really good for your health find out ttg