Hair Care Tips: आठवड्यातील कोणत्या दिवशी केस धुवावेत (Hair Wash) आणि कोणत्या दिवशी धुवू नयेत याविषयीही तुमचाही गोंधळ उडत असेल. यामुळे अनेक लोक केस जास्त धुवायला लागतात तर, काही ५-६ दिवस झाले तरी केस धुवत नाही. केस कधी धुवावे आणि केव्हा नाही यामागे खरं तर रॉकेट सायन्स नाही, पण काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यांची विशेष काळजी घ्यावी लागेल. जेव्हा तुम्हाला तुमच्या केसांमध्ये खाली दिलेली लक्षणं (Hair Wash Signs) दिसू लागतात, तेव्हा समजून घ्या की केस धुवायची वेळ आली आहे.

जाणून घ्या लक्षणं

  • केस धुवल्यानंतर लगेच केसांमध्ये तेल दिसू लागले, म्हणजेच केस चिकट दिसू लागले, तर केस धुणे आवश्यक आहे. जेव्हा तुमचे टाळू अर्थात स्कॅल्प तेलकट (Oily Scalp) असते तेव्हा हे असे बऱ्याचदा दिसून येते.
  • जर तुम्हाला तुमचे केस रोज धुवायचे नसतील आणि तुमचे केस कमी वेळात तेलकट होत असतील तर तुम्ही ड्राय शॅम्पू (Dry Shampoo) देखील वापरू शकता.
  • जर केसांमध्ये टाळूची त्वचा दिसू लागली असेल किंवा जर तुम्ही तुमचे डोके थोडेसे खाजवले, नखांमध्ये घाण दिसत असेल तर याचा अर्थ तुमचे केस घाण झाले आहेत आणि केस धुवायची वेळ आली आहे.
  • केस बराच वेळ धुतले नाही तर केसांमध्येही गाठी तयार होतात. जर तुमच्या केसांमध्ये गुंता दिसत असेल तर तुम्ही तुमचे केस शॅम्पूने धुवावेत.
  • केस धुतल्यानंतर त्यामधून शॅम्पू किंवा कंडिशनरचा सुवास येऊ लागतो. जेव्हा तुमच्या केसांमधीलं हा सुगंध येणे थांबतो, तेव्हा याचा अर्थ केस धुण्यासाठी तयार आहेत.
  • जास्त वेळ न धुतल्यास केसांचा पोतही खराब दिसतो. याकडेही लक्ष द्या.
  • तुमचे केस रोज धुतल्याने केस गळणे किंवा कोरडे होणे नक्कीच होऊ शकतात, परंतु तुम्ही खूप दिवस शॅम्पू करणेही टाळू नका. तसेच, ड्राय शॅम्पू फक्त इमरजेंसी ठेवा, त्याला आपली सवय बनवू नका.

(हे ही वाचा: आठवड्यातून आपले केस नक्की किती वेळा धुवावे?; जाणून घ्या तज्ज्ञांकडून)

health benefits of lauki
तुम्ही उन्हाळ्यात दर आठवड्याला दुधी खाल्ला तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
farmer suicide, documentry farmer suicide
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: अचंबित करणाऱ्या गोष्टी…
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या
vada pav recipe
वडापाव नव्हे! इडली वडापाव; कधी खाल्ला का? जाणून घ्या ही सोपी रेसिपी

(हा ले(हा लेख फक्त सामान्य माहिती प्रदान करतो. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मत नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)