Health Risks: सॉस आणि सूप घट्ट करण्यासाठी कॉर्नफ्लोअर हा घटक वापरला जातो. कॉर्न सिरप बनविण्यासाठीही याचा वापर केला जातो, जो बहुतेक बेकर्स आणि कन्फेक्शनर्स वापरतात. परंतु, हे तुमच्या शरीराला खूप नुकसानदायक ठरू शकते.

“संतुलित आहाराचा भाग म्हणून मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास कॉर्नफ्लोअर बहुतेक लोकांसाठी सुरक्षित मानले जाते. परंतु कॉर्नफ्लोअर हे प्रक्रिया केलेले, परिष्कृत अन्न आहे आणि ते फारसे पौष्टिक नाही. कारण- त्यात जीवनसत्त्वे, खनिजे व तंतुमय पदार्थ नसतात,” असे अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल्सच्या पोषणतज्ज्ञ सुश्री मंजुला श्रीधर म्हणाल्या.

त्याशिवाय त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त आहे, जो मधुमेहाच्या व्यक्तींसाठी योग्य नाही. त्यामुळे हृदयाच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते, चयापचयाची समस्या निर्माण होऊ शकते आणि जर त्याचे कमी प्रमाणात सेवन केले नाही, तर रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

कॉर्नफ्लोअरच्या वापराची सुरक्षित मर्यादा आहे का?

“रेसिपीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कॉर्नफ्लोअरचे सामान्य प्रमाण सुमारे १-२ टेबलस्पून असतो. संतुलित आहाराचा भाग म्हणून अधूनमधून ही मात्रा घेणे बहुतेक लोकांसाठी सुरक्षित असते”, असे श्रीधर म्हणाल्या. कॉर्न स्टार्चचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने पचनक्रियेत अस्वस्थता, वजन वाढणे किंवा कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असल्याने रक्तातील साखरेची पातळी असंतुलित होणे यांसारख्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

कॉर्नफ्लोअरला इतर निरोगी पर्याय आहेत का?

मुंबई येथील क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट व डाएटिशियन रेश्मा नाकटे वेगवेगळ्या वापरासाठी खालील पर्यायांची शिफारस करतात :

टॅपिओका फ्लोअर, बटाटा फ्लोअर व तांदळाचे पीठ हे अन्न पदार्थ जाडसर आहेत, जे कोणत्याही पदार्थाचा पोत आणि सुसंगतता सहजपणे सुधारू शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंडी, चिया सीड्स आणि आळशीच्या बिया हे उत्कृष्ट बंधनकारक एजंट आहेत, जे तुमच्या डिशचे घटक एकत्र ठेवण्यासाठी बेकिंगसाठी वापरले जाऊ शकतात.