स्वयंपाक करण्याच्या काही विशिष्ट पद्धती आहेत, ज्या आपण गेल्या कित्येक वर्षांपासून वापरत आहोत. ज्यामध्ये भाजणे, तळणे, शिजवणे अशा पद्धतींचा समावेश होतो. दरम्यान, आता एक नवीन पद्धत चर्चेत आली आहे, ज्याला एअर फ्राईंग असे म्हणतात. बाजारात अनेक वैशिष्ट्ये असलेले एअर फ्रायर उपलब्ध आहेत. या उपकरणांमध्ये गरम हवेच्या मदतीने खाद्यपदार्थ बनवले जातात.

आता पारंपरिक स्वयंपाकाच्या पद्धती विरुद्ध एअर फ्राईंगची पद्धत असा वाद सुरू झाला आहे आणि आरोग्यदायी स्वयंपाकाच्या पद्धतीमुळे एअर फ्राईंगच्या पद्धतीकडे अनेकांचा कल दिसून येत आहे. पण, हा बदल कायम राहील का? आजच्या काळात पौष्टिक खाद्यपदार्थांच्या सेवनाबाबत जागरुकता वाढली आहे आणि कोविडनंतरच्या आरोग्यविषयक समस्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा परिस्थितीत स्वयंपाक करण्याच्या पद्धतींचे महत्त्व वाढले आहे. एकूण सर्व स्वयंपाक करण्याच्या पद्धतींच्या स्पर्धेमध्ये एअर फ्राईंग पद्धतीने बाजी मारली आहे, ज्याचे कारण आहेत त्याचे अनेक आरोग्य फायदे.

Cng kit in car 5 things to keep in mind before installing cost
कारमध्ये सीएनजी किट बसवण्याचा विचार करताय? मग जरा थांबा, आधी ‘या’ पाच महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या
Office Snacks Must Have Food
ऑफिसच्या डब्यात ‘हे’ तीन पदार्थ असायलाच हवेत! पोषणतज्ज्ञांनीच सांगितला, काम करताना ऊर्जा वाढवण्याचा सोपा फंडा
Nonstick Pan Cleaning Hacks
तव्यावर मीठ टाकून गरम करताच होईल कमाल; एक नवा रुपया खर्च न करता मिळवा मोठा फायदा, पाहा Jugaad Video
How Japan is set to make millions of vending machines obsolete
पैसे टाकल्यावर वस्तू देणाऱ्या मशीन्स जपानमध्ये चर्चेत का आल्या आहेत?
Beetroot Juice Benefits
बीटाचा रस पिण्याचे फायदे वाचलेत का? ‘या’ वयोगटातील महिलांना होऊ शकतो मोठा लाभ; अभ्यासात सांगितले आहे ‘हे’ योग्य प्रमाण
Loksatta kutuhal Watch out for malpractices in the stock market
कुतूहल: शेअर बाजारातील गैरव्यवहारांवर नजर
Car Tips
कारचे ब्रेक लावताना क्लच का दाबू नये तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या यामागील खरं कारण
Diabetes Control Remedies
रक्तातील साखर १५ ते १० टक्के कमी करण्यासाठी जेवणात ‘या’ दोन गोष्टी वापराव्याच? डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले फायदे व मर्यादा

“एअर फ्राईंगचा मुख्य फायदा असा आहे की, ते फारच कमी तेल वापरते किंवा तेलच वापरत नाही, ज्यामुळे कॅलरीज ७० ते ८० टक्क्यांनी कमी होतात असे”, गुरग्राम (गुडगांव) फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट गुडगावच्या मुख्य क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट दीप्ती खातुजा यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.

डॉ. दिलीप गुडे, वरिष्ठ सल्लागार फिजिशियन, यशोदा हॉस्पिटल, हैदराबाद म्हणाले की, तेलात तळलेल्या पदार्थांपेक्षा एअर फ्राईंगमध्ये तयार केल्लया पदार्थांमध्ये कमी फॅटस असते. कारण एअर फ्रायरमध्ये संवहन स्वयंपाक पद्धतीचा (convection cooking) वापर केला जातो. संवहन म्हणजे हवा किंवा द्रव प्रवाहाद्वारे उष्णता हस्तांतरित करण्याची प्रक्रिया आहे. म्हणूनच एअर फ्राईंग संतुलित आहारासाठी स्वयंपाक करण्याचा एक आदर्श पर्याय ठरतो. हे पर्याय केवळ आपल्या वजनाबद्दल चिंतित असलेल्यांनाच नाही, तर हृदयाच्या समस्या, लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंड निकामी होणे यांसारख्या विकृत आजारांच्या वाढत्या संख्येचा धोका टाळण्यासाठी देखील चांगला पर्याय आहे.

हेही वाचा – घसा खवखवत असेल तर लिंबू आणि मधाचे सेवन करावे का? या घरगुती उपायाबाबत काय सांगतात डॉक्टर

याबाबत खातुजा यांनी सांगितले, “एअर फ्राईंग ॲक्रिलामाइडच्या निर्मितीपासून संरक्षण करते. ॲक्रिलामाइड हे एक रसायन आहे, जे पारंपरिक पद्धतीनुसार उच्च तापमानाला पदार्थ तळताना तयार होते आणि त्या रसायनामुळे कर्करोग होऊ शकतो. संशोधन ॲक्रिलामाइड (acrylamide) आणि एसोफेजियल (esophageal), ओव्हरिअन (ovarian), स्वादुपिंड (pancreatic) आणि Endometrial Malignancies यांच्यातील संबंध दर्शवते. एअर फ्राईंगमुळे गरम हवेच्या अभिसरणामुळे तो धोका टाळता येतो.”

खातुजा यांच्या म्हणण्यानुसार, “तळताना तेल पुन्हा वापरणे आणि पुन्हा गरम करणे ही बऱ्याच भारतीय घरांमध्ये एक सामान्य प्रथा आहे आणि या क्रियेमुळे ट्रान्स-सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड तयार होतात, ज्यांना कार्सिनोजेन्स म्हणून ओळखले जाते, जो आणखी एक धोका आहे. पारंपरिक स्वयंपाकाच्या पद्धतीने तळण्यापेक्षा एअर फ्राईंगचे अनेक फायदे आहेत, ज्यात अधिक सुरक्षितता, सुलभता, साफसफाई यांचा समावेश होतो. अशा प्रकारे सध्याच्या वातावरणात, काळजीपूर्वक एअर फ्राईंग करणे हा उत्तम पर्याय बनतो.”

एअर फ्रायरमध्ये खाद्यपदार्थांमधील पोषक तत्वांचे कमी नुकसान होते त्यामुळे एअर फ्राईंग आरोग्याची काळजी घेण्यास मदत करते. संतुलित आणि आरोग्याविषयी जागरूक जीवनशैलीसाठी ही पद्धत चांगली आहे.

काय लक्षात ठेवावे?
डॉ. गुडे यांनी निदर्शनास आणून दिले की, अन्नपदार्थ एअर फ्रायरमध्ये भाजण्यामुळे धोकादायक संयुगे तयार होऊ शकतात विशेषतः करपलेल्या पदार्थांमध्ये. म्हणून एअर फ्राईंग हे तेलात खाद्यपदार्थ तळण्यापेक्षा निश्चितच फायदेशीर असले तरीही त्याचा वापर कमी प्रमाणात करणे आवश्यक आहे आणि एअर फ्राईंगचे अन्न सामान्यतः दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा खाऊ नये.”