Healthy Eating: फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे व अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेली फळे कोणत्याही संतुलित आहाराचा एक महत्त्वाचा घटक असतात. ती अनेक आरोग्यदायी फायदे देतात, ज्यात विशिष्ट प्रकारच्या कर्करोगापासून संरक्षण, रक्तदाब व कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करणे आणि शरीर चांगल्या स्थितीत राखण्यास मदत करतात. परंतु तुम्हाला ठाऊक आहे का? फळांचे सेवन आपल्या आरोग्यासाठी कितीही फायदेशीर असले तरी काही फळांच्या सेवनाने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

चेन्नईतील श्री बालाजी मेडिकल सेंटरमधील नोंदणीकृत आहारतज्ज्ञ दीपलक्ष्मी यांनी आतड्यांच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम फळे कोणती आणि कोणती टाळावीत हे सांगितले.

बद्धकोष्ठता

तुमच्या सकाळच्या दिनचर्येत समाविष्ट करण्यासाठी सर्वोत्तम फळांपैकी एक म्हणजे पिकलेली पपई. “पपईमध्ये पपेन नावाचे एक शक्तिशाली पाचक एंझाइम असते, जे प्रथिने तोडण्यास मदत करते आणि आतड्यांच्या हालचालींना समर्थन देते. त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि नैसर्गिक फायबर ते सौम्य; परंतु आतड्यांच्या हालचालींना उत्तेजन देण्यासाठी प्रभावी बनवते,” असे दीपलक्ष्मी म्हणाल्या.

आम्लता

लाल केळी किंवा लहान पिवळी इलायची केळी हा उत्तम पर्याय असू शकतो. या केळ्यांमध्ये नैसर्गिकरीत्या आम्ल कमी असते आणि पेक्टिन जास्त असते. ते एक विरघळणारे फायबर असते, जे जळजळ कमी करण्यास मदत करते. त्यामध्ये पोटॅशियमदेखील असते, जे पोटातील पीएच पातळी संतुलित करण्यास मदत करू शकते.

परंतु, पूर्णपणे पिकलेल्या केळ्यांचे सेवन करावे. कच्च्या केळ्यांमध्ये प्रतिरोधक स्टार्च असतो, जो काही लोकांमध्ये पोटफुगी वाढवू शकतो किंवा पचनास विलंब करू शकतो. “केळी सामान्यतः सुरक्षित असली तरी रिफ्लक्सचा त्रास असलेल्यांनी त्यांचे शरीर कसे प्रतिसाद देते हे पाहावे,” असे त्या म्हणाल्या.

पोट फुगणे

जड किंवा प्रथिनेयुक्त जेवणानंतर पोट फुगणे किंवा आळस येणे सामान्य आहे. अशा परिस्थितीत दीपलक्ष्मी म्हणाल्या की, जेवणानंतर अननस हे एक उत्तम फळ असू शकते. अननसात ब्रोमेलिन असते, जे एक नैसर्गिक एंझाइम आहे. ते प्रथिनांचे पचन करण्यास मदत करते आणि पोट फुगणे व गॅस कमी करण्यास मदत करते. या एंझाइममध्ये सौम्य दाहकविरोधी प्रभावदेखील दिसून येतो, ज्यामुळे आतड्यांचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.

असे असले तरी अननस नैसर्गिकरीत्या आम्लयुक्त असते. म्हणून ज्या व्यक्तींना आम्ल रिफ्लक्सचा त्रास किंवा पोटात जळजळ होण्याची शक्यता असते, त्यांनी ते कमी प्रमाणात सेवन करावे किंवा तशी लक्षणे वाढताना ते टाळावे.

प्रथिनेयुक्त फळे

“सर्वसाधारणपणे खाल्ल्या जाणाऱ्या फळांमध्ये पेरू हे सर्वांत जास्त प्रथिने असलेले फळ म्हणून वेगळे आहे, जे प्रति १०० ग्रॅम अंदाजे २.६ ते ३ ग्रॅम प्रथिने प्रदान करते. त्यात आहारातील फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सदेखील भरपूर असतात, जे सर्व पचन आरोग्य, रोगप्रतिकारक कार्य आणि एकूणच कल्याणाला समर्थन देते” असे त्यांनी सांगितले.

जेव्हा अपचन आणि बद्धकोष्ठता एकत्रितपणे येते तेव्हा बरेच लोक मोसंबी खातात. कारण- त्यांना वाटते की, त्याचे हायड्रेटिंग व व्हिटॅमिन-समृद्ध प्रोफाइल मदत करेल; पण दीपलक्ष्मी म्हणाल्या की, तसे नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मोसंबीत फायबर असते; परंतु त्यात पपई किंवा अननसासारख्या फळांमध्ये आढळणारे शक्तिशाली पाचक एंझाइम नसतात. त्याच्या आम्लयुक्त स्वभावामुळे संवेदनशील व्यक्तींमध्ये पोटफुगी होऊ शकते, विशेषतः जेवणानंतर सेवन केल्यास मोसंबी हायड्रेशन आणि सौम्य पचनास मदत करू शकते; परंतु अपचनाचा त्रास असलेल्यांसाठी हा सर्वोत्तम पर्याय असू शकत नाही.