अनेकांना कॉफी प्यायला आवडते, पण कॉफी पिण्यामुळे ह्रदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो का अशी चिंता अनेकांना वाटत असते. दरम्यान, याबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना बंगळुरू येथील मणिपाल हॉस्पिटलच्या इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी, एचओडी आणि सल्लागार, डॉ. रंजन शेट्टी सांगतात की, माझे बरेच रुग्ण असे आहेत ज्यांना कॉफी प्यायला आवडते. ते नेहमी विचारतात की, “कॉफी पिणे सुरक्षित आहे का? हृदयाचे ठोके वाढण्याची काळजी करू नये का?, त्यांची भीती या वस्तुस्थितीमुळे उद्भवते की, “कॉफी हे एक उत्तेजक घटक आहे, जे हृदयगती वाढवू शकते आणि परिणामी हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात.”

एरिथमिया म्हणजे काय आणि कॉफी पिण्याशी त्याचा काय संबध आहे? (WHAT IS ARRHYTHMIA AND HOW IS DRINKING COFFEE LINKED TO IT?)


एरिथमिया म्हणजे हृदयाचे अनियमित ठोके होणे, ज्याचा आलेख नेहमी स्थिर ठेवला पाहिजे. हृदयाची सामान्य लय राखणे महत्त्वाचे असते, कारण हृदय पंप करत असलेल्या रक्ताद्वारे आपल्याला पोषक तत्व आणि ऑक्सिजन पुरवत असते. अनियमित लय रक्तप्रवाहात अडथळा आणू शकते, त्याच्या विद्युत आवेगांवर ( Electrical Impulses) परिणाम करू शकते आणि अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

speech fasting benefits if you stay silent for an entire day this is what happens to your body
तुम्ही पूर्ण दिवस न बोलता शांत राहिल्यास शरीरात नेमके काय बदल होतात? जाणून घ्या ‘स्पीच फास्टिंग’चे फायदे
100 gram raw garlic revealing impressive impact on our lives how garlic boost your immune system said expert
१०० ग्रॅम लसणात आहेत ‘हे’ पोषक घटक; उच्च रक्तदाबामध्ये ठरेल वरदान, वाचा तज्ज्ञांची मते…
Benefits of Drinking Okra Water
एक महिना ‘हे’ पाणी प्यायल्याने झपाट्याने वजन होईल कमी; कोलेस्ट्रॉलही राहील नियंत्रणात, एकदा फायदे वाचाच!
How Suryanamaskar and pranayama can help you fight spring allergies
तुम्हालाही वारंवार शिंका येतात का? रोज करा ‘हे’ दोन प्रभावी प्राणायाम अन् व्हा अ‍ॅलर्जी फ्री

खूप जास्त प्रमाणात कॉफी प्यायल्यास वाढते हृदयाची धडधड

कॅफिन आणि निकोटीन हे उत्तेजक मानले जातात आणि त्याचा थेट परिणाम हृदयाच्या नैसर्गिक पेसमेकरवर (pacemakers ) होतो. कॉफी प्यायल्याने नॉरड्रॅनालाईन (Noradrenaline) आणि नॉरपेनेफ्राइन (Norepinephrine) सोडण्यास चालना मिळते, ज्यामुळे काही व्यक्तींमध्ये हृदय गती आणि रक्तदाब वाढू शकतो. हे sympathetic nervous system देखील सक्रिय करते, जे शरीराला धोक्याचा इशारा पाठवते, हृदयाची गती वाढवते आणि रक्तवाहिन्या संकुचित करते. यामुळे काही रुग्णांची धडधड वाढते. अर्थात, तुम्ही खरोखरच खूप जास्त प्रमाणात कॉफी किंवा ब्लॅक कॉफी प्यायली असेल तरच असे होते. खूप जास्त प्रमाणात प्यायलेली ब्लॅक कॉफी हृदयाच्या स्नायूंना उत्तेजित करू शकते आणि एरिथमिया म्हणजेच हृदयाचे अनियमित ठोके होण्यास कारणीभूत ठरू शकते.

हेही वाचा – रोज फळांचे सेवन का करावे? सद्गगुरूंनी सांगितले आश्चर्यकारक फायदे; काय आहे तज्ज्ञांचे मत?

कॉफी पिण्याची सुरक्षित मर्यादा आहे का?

बहुतेक पाश्चिमात्य लोक ब्लॅक कॉफी पितात. भारतात, आपल्याकडे बहुतेक दूध असलेली कॉफी प्यायली जाते, जी कॅफीनचा प्रभाव कमी करते. त्यामुळे दिवसातून दोनदा कॉफी घेणे कोणत्याही प्रकारच्या हृदयरोगासाठी सुरक्षित आहे.

गेल्या काही वर्षांतील अभ्यासात साधारणपणे असे आढळून आले आहे की, नेहमीच्या प्रमाणात कॅफीनचे सेवन केल्याने ॲरिथमियाचा धोका वाढत नाही.

हेही वाचा – मद्यपान कमी करणे किंवा पूर्णपणे बंद करणे हेच आहे सर्वोत्तम आरोग्याचे रहस्य? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

करंट हायपरटेन्शन अहवालातील २०२१ च्या अहवालात असे म्हटले आहे की, ” नेहमी एक ते तीन कप अशी मध्यम प्रमाणात कॉफी प्यायल्याने व्यक्तीच्या रक्तदाबावर विशेष परिणाम होत नसला तरी, कॅफिनच्या अचानक संपर्कात आल्यानेही काहीं प्रकरणांमध्ये १० मिमी एचजी (mm Hg) पर्यंत रक्तदाब वाढू शकतो आणि नंतर लवकरच स्थिरही होतो.

सर्क्युलेशन जर्नलमध्ये २०२१ च्या आणखी एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, “कदाचित कॉफीमुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. हे ॲडिपोज (फॅटी) टिश्यूमधून मुक्त फॅटी ॲसिड सोडण्यास मदत करते.

हेही वाचा – तुमची झोप पूर्ण होत नाही का? तुमच्या ‘या’ पाच सवयींमुळे बिघडते तुमचे चयापचय

पण, कॉफी किती प्रमाणात प्यावी यासाठी मर्यादा निश्चित करणे आवश्यक आहे, कारण प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर होणारा कॅफिनचा प्रतिसाद भिन्न असतो. कोणत्याही परिस्थितीत, तीन ते चार कपपेक्षा जास्त कॉफी पिऊ नका. लक्षात ठेवा, फक्त कॉफीच्या सेवनावर नियंत्रण ठेवणे, हे हृदयाचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी पुरेसे नाही. तुम्ही सक्रिय जीवनशैली आणि संतुलित आहारासह चांगल्या सवयीचे पालनदेखील केले पाहिजे.