Hair Growth Tips : खोबरेल तेलामुळे केसांचे संरक्षण होण्यास वाढ होण्यास मदत होते. त्यातील अनेक गुणधर्म केसांसाठी खूप फायदेशीर मानले जातात. त्यावर पोषणतज्ज्ञ रश्मी मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, खोबरेल तेलात आवळा किंवा आवळा पावडर मिसळून लावल्यास केसांची वाढ दुप्पट होऊ शकते. पोषणतज्ज्ञ रश्मी मिश्रा यांनी Indin_veg_diet या अकाउंटवर एक पोस्ट करीत म्हटले की, केसांच्या वाढीसाठी आवळा पावडर खोबरेल तेलात मिसळून केस आणि केसांच्या मुळांमध्ये मसाज करा; ज्यामुळे केसांची लांबी दुप्पट वेगाने वाढेल.
याच विषयावर द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना कार्यात्मक औषध आणि आरोग्य तज्ज्ञ शिवानी बाजवा यांनी सविस्तर माहिती दिली आहे. डॉ. बाजवा म्हणाल्या की, आवळा विविध जीवनसत्त्वांनी परिपूर्ण आहे; जो शरीरातील आवश्यक जीवनसत्त्वांची कमतरता दूर करण्यास मदत करतो. आवळ्याचा अप्रत्यक्षपणे केसांना फायदा होतो. आवळ्यामधील कॅल्शियमसारखी खनिजे सूर्यप्रकाश आणि उष्णतेमुळे होणाऱ्या नुकसानीपासून केसांचे संरक्षण करतात. टॅनिन, बायोमॉलेक्युल केसांमध्ये केराटिनशी बांधले जाते; ज्यामुळे केस तुटण्याची समस्या दूर होते. आवळ्यातील जीवनसत्त्व कचे उच्च प्रमाण कोलेजनच्या निर्मितीसाठी मदत करते; ज्यामुळे केसांचे आरोग्य सुधारण्याव्यतिरिक्त अनेक फायदे होतात.
नारळाच्या तेलात लॉरिक अॅसिड असते; जे अतिशय फायदेशीर फॅटी अॅसिड आहे. त्यामुळे आपल्या शरीरातील चयापचय क्रिया वेगाने होते. द एस्थेटिक क्लिनिकच्या त्वचारोग तज्ज्ञ व कॉस्मेटिक स्कीन स्पेशालिस्ट डॉ. रिंकी कपूर यांच्या मते, खोबरेल तेलाच्या वापराने केस आणि टाळू मॉइश्चराइझ होते; ज्यामुळे केसांतील कोरडेपणा दूर होत केसांत गुंता होत नाही. खोबरेल तेलाने केसांच्या मुळांचे आरोग्य निरोगी ठेवत, केसांचे तुटणे कमी होते. अशाने अप्रत्यक्षपणे केसांच्या वाढीस चालना मिळू लागते. त्याशिवाय नारळाच्या तेलात दाहकविरोधी गुणधर्म असतात; ज्यामुळे टाळूला येणारी खाज रोखली जाते.
बाजवा यांनी स्पष्ट केले की, खोबरेल तेल केसांच्या मुळांना मजबूत करते आणि बाह्य प्रदूषण किंवा कोणत्याही घाणीपासून टाळू स्वच्छ ठेवते. त्यामुळे केसांमध्ये फोडी येण्याची समस्या कमी होते. तसेच खोबरेल तेल उवांची अंडी नष्ट करू शकत नसले तरी केसांमध्ये वाढलेल्या उवा मारण्यासाठी ते प्रभावी असते.
खोबरेल तेल व आवळा पावडर यांचे मिश्रण केसांना कसे लावावे?
हे मिश्रण लावण्यापूर्वी थोडे गरम करा आणि लावा. त्यानंतर लावल्यानंतर एक तासाने हलक्या शाम्पूने स्वच्छ धुवा, असे बाजवा म्हणाल्या.
खोबरेल तेल, आवळा पावडरचे मिश्रण खरेच केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे का?
आवळा पावडरने केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते आणि खोबरेल तेल केसांचे पोषण आणि संरक्षण करते. त्यामुळे या दोघांचे मिश्रण केसांच्या पोषणासाठी फायदेशीर असते. हे मिश्रण लावल्याने टाळूमध्ये रक्त परिसंचरण वाढून, केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते. त्यामुळे केसांना इतर समस्यांपासून दूर ठेवता येते. हे केसांसाठी एक प्रकारे अमृतासारखे काम करते, असेही बाजवा म्हणाल्या.
पण, डॉक्टरांच्या कोणत्याही सल्लाशिवाय हे मिश्रण केसांना लावल्यास त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यावर बाजवा म्हणाल्या की, जास्त तेल टाळूचे नुकसान करू शकते. विशेषतः एखाद्याची टाळू तेलकट असेल आणि त्याने हे मिश्रण लावले, तर त्याच्या केसात ओलावा आणि घाण अडकते; ज्यामुळे केसांसंबfधीत आजार दूर होऊ शकतात, असे बाजवा म्हणाल्या.
पण, खोबरेल तेल आणि आवळा पावडर यांचे मिश्रण केसांना लावल्यास त्याचा प्रत्येक व्यक्तीवर समान परिणाम दिसणार आहे. कारण- प्रत्येक व्यक्तीची आनुवंशिकता, आहार, ताण पातळी आणि केसांची एकूण निगा राखण्याची पद्धत यांसारखे घटकदेखील केसांचे आरोग्य आणि वाढ निश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, असेही डॉ. कपूर म्हणाल्या.