तुमच्यापैकी अनेक जण वजन कमी करण्यासाठी किंवा संतुलित ठेवण्यासाठी विविध प्रकारच्या प्रोटीन पावडरचे सेवन करतात. अनेकांच्या सकाळची सुरुवात प्रोटीन पावडरच्या सेवनाने होते. परंतु, प्रोटीन पावडरच्या सेवनाने आपल्या किडनीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो असे बोलले जाते. हाय प्रोटीनयुक्त आहार खाल्ल्यास शरीरातील रक्त फिल्टर करण्यासाठी मूत्रपिंडावर अधिक ताण येतो. कालांतराने मूत्रपिंडावरील वाढत्या ताणामुळे किडनी खराब होते असे मानले जाते. पण, खरंच प्रोटीन पावडरने किडनीवर वाईट परिणाम होतात का? तसेच प्रोटीन पावडर कोणासाठी घातक असते? अशा अनेक प्रश्नांवर शालीमार बागमधील फोर्टिस हॉस्पिटलच्या युरोलॉजी, युरो-ऑन्कोलॉजी आणि रीनल ट्रान्सप्लांटेशन विभागाचे संचालक डॉ. विकास जैन यांनी इंडियन एक्स्प्रेसला सविस्तर माहिती दिली आहे. यात त्यांनी प्रोटीन पावडर सेवनाची योग्य पद्धत सांगितली आहे.

नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले की, निरोगी व्यक्ती आणि मधुमेह किंवा उच्च रक्तदाबसारख्या आजारांचा त्रास नसलेल्या व्यक्तींना प्रोटीन पावडरचे मर्यादित सेवन केल्यास त्यांच्या किडनीला कोणताही मोठा धोका निर्माण होत नाही. किडनी तसंही शरीरातील विषारी घटकांवर प्रक्रिया करण्याचे काम करते. त्यामुळे अशा व्यक्तींनी रोज प्रोटीन शेकचे सेवन केल्यास त्याचा कोणताही प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता नाही.

Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
How Suryanamaskar and pranayama help to fight allergies
तुम्हाला वारंवार ॲलर्जी होते? सूर्यनमस्कार आणि प्राणायाम ठरतील फायदेशीर

शरीरात हायड्रेशन संतुलित करून प्रोटीन पावडरचे सेवन केले पाहिजे. कारण यामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ आणि विषारी पदार्थ काढून टाकताना मूत्रपिंडावरील ताण कमी होईल. यासाठी प्रोटीन पावडर तुम्ही पाण्याबरोबर सेवन करू शकता.

परंतु, ज्यांना आधीच मूत्रपिंडासंबंधित किंवा इतर काही आजार आहेत, त्यांनी प्रोटीन पावडरचे सेवन करताना थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे. जर तुम्हाला आधीच मूत्रपिंडासंबंधित आजार असेल तर तुम्ही प्रोटीन पावडरचे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच मर्यादित सेवन केले पाहिजे, यामुळे आजार वाढण्याची गती कमी होण्यास मदत होईल. काही पुरावे सूचित करतात की, प्रोटीनचे मर्यादित सेवन करणे ही तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट आहे. किडनीसंबंधित अगदी मध्यम स्तरावरील आजार असेल, त्यांनीही प्रोटीनचे मर्यादित सेवन करावे.

शरीराला किती प्रोटीन पावडरची गरज असते?

निरोगी प्रौढ व्यक्ती त्याच्या वजनाच्या प्रति किलोग्रॅम किमान ०.८ ग्रॅम प्रोटीन खातो. पेशींची वाढ आणि इतर शरीराच्या सामान्य कार्यांसाठी हे प्रमाण पुरेसे आहे. स्नायू मजबूत, बळकट करण्यासाठी तुम्हाला किमान १२ आठवड्यांसाठी प्रति किलो शरीराच्या वजनासाठी सुमारे दोन ग्रॅम प्रोटीन आवश्यक असेल. तुम्ही हे प्रमाण शरीराच्या वजनाच्या प्रति किलो १.८ ग्रॅमपर्यंत खाली आणू शकता. याचा अर्थ आहारात प्रोटीनचा अधिक समावेश असेल, परंतु रोजच्या आहारातून आपण जास्त प्रोटीनचे सेवन तर करत नाही ना याकडे लक्ष द्या. प्रोटीन पावडर किंवा इतर आहारातील पूरक पदार्थांचा खूप जास्त डोस घेणाऱ्या व्यक्तींना मूत्रपिंडाच्या कार्यावर या पदार्थांच्या एकत्रित प्रभावामुळे जास्त धोका निर्माण होऊ शकतो.

किडनीच्या कार्यावर परिणाम झाल्यास तो कसा ओळखावा?

क्रिएटिनिन पातळी सामान्यत: किडनीच्या कार्यासाठी मार्कर म्हणून वापरली जाते. पचनक्रियेदरम्यान तयार होणारे टाकाऊ घटक किडनीद्वारे फिल्टर केले जाते. अशात वाढलेली क्रिएटिनिन पातळी मूत्रपिंडाला धोका असल्याचे दर्शवते. परंतु, केवळ क्रिएटिनिनच्या पातळीवरून किडनीवर परिणाम होत आहे की नाही हे आपण ओळखू शकत नाही.

तुम्ही लघवीतील प्रोटीन-ते-क्रिएटिनिन गुणोत्तर पाहणे आवश्यक आहे, जे क्रिएटिनिन पातळीच्या सापेक्ष लघवीमध्ये उपस्थित प्रोटीनचे प्रमाण मोजते आणि संभाव्य मूत्रपिंडासंबंधित आजारांबाबत पूर्व इशारा देते. लघवीतील प्रोटीन-ते-क्रिएटिनिन गुणोत्तर हे प्रोटीन्यूरियाची उपस्थिती दर्शवू शकते. ही स्थिती लघवीतील प्रोटीनच्या असामान्य उत्सर्जनाद्वारे दर्शविली जाते, यामुळे शरीराच्या आत झालेला किडनीसंबंधित आजार किंवा परिणाम दर्शवू शकते.

लघवीतून रक्त येणे, पाय किंवा हात सुजणे, स्नायू क्रॅम्पिंग, थकवा, निद्रानाश आणि डोकेदुखी याकडे लक्ष द्या.

नेहमी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या

तुमच्या कोणत्याही प्रोटीन पावडरचे सेवन करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घ्या. किडनीचे नुकसान होण्याचे दोन सर्वात महत्त्वाचे जोखीम घटक म्हणजे उच्च रक्तदाब आणि मधुमेह. म्हणून अशा रुग्णांनी प्रोटीन पावडर सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.