scorecardresearch

तुम्हाला अनेकदा चक्कर आल्यासारखे वाटते का? मग आहारात ‘या’ पदार्थांचा करा समावेश

आहारतज्ञ गरिमा गोयल यांच्या मते, “कोणत्याही वैद्यकीय स्थितीशिवाय चक्कर येण्याची लक्षण देखील रक्तदाब कमी होण्याचे कारण असू शकते.”

do you often feel lightheaded or dizzy add these foods to your diet
तुम्हाला अनेकदा चक्कर आल्यासारखे वाटते का? ( Image Credit Frepik)

भोवळ किंवा चक्कर येण्याच्या लक्षणांकडे अनेकजण दुर्लक्ष करतात, परंतु त्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे कारण ते काही इतर आरोग्य स्थितींचे संकेत असू शकतात. आहारतज्ञ गरिमा गोयल यांच्या मते, “कोणत्याही वैद्यकीय स्थितीशिवाय चक्कर येण्याची लक्षण देखील रक्तदाब कमी होण्याचे कारण असू शकते.”

या लक्षणांचे व्यवस्थापन करण्यात तुमचा आहार कसा महत्त्वाची भूमिका बजावू शकतो हे सांगताना त्या पुढे म्हणाल्या, “जर हा प्रकार सामान्य निरोगी व्यक्तीमध्ये वारंवार होत असतील, तर उच्च कार्बोहायड्रेट आणि इलेक्ट्रोलाइटयुक्त नाश्ता आवश्यक आहे, जसे की, सफरचंद किंवा केळी किंवा लिंबाचा रस. नेहमीचा पॅरामीटर म्हणजे 15:15 चा नियम आहे. ज्यानुसार 15 ग्रॅम कार्बोहायड्रेट्ससह स्नॅक खाणे किंवा पिणे आणि 15 मिनिटे प्रतीक्षा करणे. एक निरोगी व्यक्ती या वेळेत स्वतःहून बरी होते परंतु जर तुम्ही मधुमेही असाल तर सेवन केल्यानंतर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी तपासा.

आहारतज्ञ गरिमा गोयल यांनी काही पदार्थांची यादी दिली ज्यांचा तुम्ही तुमच्या आहारात समावेश करू शकता ज्यामुळे चक्कर आल्यानंतर सहज बरे व्हाल आणि तुमची ऊर्जा आणि स्थिरता परत मिळेल.

ग्लुकोज:

एका ग्लास पाण्यात 3 चमचे (1 टेबलस्पून) ग्लुकोज घाला आणि 15 मिनिटांपेक्षा कमी वेळात उत्साही वाटेल. “ग्लुकोज हे उर्जेचे स्वरूप आहे जे मेंदूच्या पेशींद्वारे थेट शोषले जाते. हे सिद्ध झाले आहे की, व्यायामापूर्वी ग्लुकोजचे सेवन देखील व्यायामानंतर चक्कर येणे टाळण्यास मदत करते,” असे गोयल यांनी स्पष्ट केले.

पाणी:

कधीकधी, डिहायड्रेशनमुळे चक्कर येऊ शकते आणि एक ग्लास पाणी पिण्याने हे सर्व त्रास दूर होतो. “शरीराला पुरेसे हायड्रेट करणे अत्यंत महत्वाचे आहे.”

अ‍ॅपल सॉस:

अ‍ॅपल सॉस म्हणजेच सफरचंदचा गाभा/प्युरी. ताज्या फळांऐवजी, गोड किंवा गोड नसलेले सफरचंद सॉस रक्तातील साखर अधिक वेगाने वाढवते, तज्ञांनी सांगितले. “अ‍ॅपल सॉसचा ग्लायसेमिक इंडेक्स 53 असतो तर सफरचंदाचा 38 असतो. तुमच्या रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यासाठी एक चमचा सफरचंद सॉस खाणे ही एक आरोग्यदायी सूचना आहे. तसेच, त्यात विविध खनिजे असतात जी चक्कर येणे दूर करण्यास मदत करतात.”

पालेभाज्या:

रक्तक्षय असलेल्या स्त्रियांमध्ये चक्कर येण्याचे प्रमाण जास्त असते. म्हणून, हिरव्या पालेभाज्यांसारखे लोहयुक्त पदार्थ खाण्याची शिफारस केली जाते.

मनुका:

मूठभर मनुके खाल्ल्याने ऊर्जा वाढवणारा नाश्ता म्हणून काम होऊ शकते.

बिनधास्त आंबे खा! त्वचेला होऊ शकतात ‘हे’ फायदे; आंब्याने पिंपल का येतात ते ही आधी जाणून घ्या

केळी:

कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने आणि उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असल्याने चक्कर येण्यापासून लवकर बरे होण्यास मदत होते कारण ते केळी पोटॅशियम तसेच साखरेचे उत्तम मिश्रण आहे.

दही:

बेरी आणि नट्स असलेले दही एखाद्या व्यक्तीची ऊर्जा वाढवण्यास मदत करते, विशेषत: प्रतिक्रियाशील हायपोग्लाइसेमिया असलेल्यांसाठी ते फायदेशीर ठरू शकते. “याव्यतिरिक्त, ते प्रथिने, कॅल्शियम आणि इतर रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे घटक आहारात समाविष्ट करते,” असे पोषणतज्ञांनी सांगतिले आहे.

रताळे:

हा एक उत्तम स्नॅकिंग पर्याय आहे कारण त्याचा कमी ग्लायसेमिक इंडेक्स साखरेची पातळी दीर्घ काळासाठी स्थिर ठेवतो.

५ तासांपेक्षा कमी झोपल्याने पायांच्या रक्तवाहिन्या बंद होण्याची शक्यता? संशोधक काय सांगतात जाणून घ्या

गोयल यांनी शेअर केल्याप्रमाणे या काही इतर टिप्स आहेत.

  • दर 2-3 तासांनी लहान पण वारंवार जेवण करा कारण जेवणामधील दीर्घ अंतर हे चक्कर येण्याचे कारण असू शकते.
  • फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, लिन प्रोटीन आणि फायबर यांचा योग्य प्रमाणात संतुलित आहार घ्या. माफक प्रमाणात प्रत्येक अन्न गट शरीराचा समतोल राखण्यात भूमिका बजावतो.
  • कॅफिनचे सेवन मर्यादित करा कारण यामुळे हायपोग्लाइसेमिक लक्षणे दिसू शकतात किंवा रक्तदाब वाढू शकतो, ज्यामुळे डोके दुखू शकते.
  • मद्यसेवन टाळा कारण न खाता प्यायल्यास शरीरातील साखरेची पातळी कमी होऊ शकते.
  • रक्तातील ग्लुकोज कमी करण्यासाठी जास्त साखर असलेले पदार्थ टाळा.
  • कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले खाद्यपदार्थ निवडा जेणेकरुन साखरेची अचानक घट किंवा शूट-अप टाळण्यासाठी.

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 14:30 IST