टीना महिन्याच्या बहुतेक काळामध्ये नेहमी ‘आनंदी आणि उत्साही” असायची, पण मासिक पाळीपूर्वीचे काही दिवसांना ती घाबरायची. तिला वाटणारी ही भिती (बहूतेक महिलांना) मासिक पाळीमध्ये होणाऱ्या पोटदुखीमुळे नव्हे तर तीव्र डोकेदुखीची होती, ज्याचा त्रास तिला महिन्याच्या फक्त तीन ते चार दिवसच होत असे. तिने हे चार दिवस कधीच येऊ नये अशी इच्छा व्यक्त केली पण शक्य नाही. टीनाचा हा अनुभव हैद्राबाद येथील अपोलो हॉस्पिटलमधील न्युरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी टि्वटरवर शेअर केला.

टिनाच्या मनात त्या ३ दिवसांची भिती बसली होती. टीनाला महिन्याच्या इतर दिवसांमध्ये डोकेदुखीचा आजिबात त्रास होत नव्हता. तिला मासिक पाळी नियमित येत असते आणि तिला २ वर्षांचे मुलं देखील आहे. पण डोकेदुखी तीव्र. व्हिज्युअल अ‍ॅनालॉग स्केलवर 7-8 च्या स्कोअरसह डोकेदुखी तीव्र होती (जेथे 10 सर्वात तीव्र वेदना आहे आणि 0 म्हणजे वेदना नसणे). टीनाला डोकेदुखीशी संबंधित मळमळ, उलट्या आणि चक्कर आल्या होत्या. डोकेदुखी 24-36 तास होत असे आणि ज्यामुळे ती पूर्णपणे अक्षम केले,” असे डॉं. सुधीर कुमार यांनी सांगितले.

pregnancy early sign
गर्भधारणा झाल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी शरीरात दिसू लागतात ‘ही’ ५ लक्षणे; जाणून घ्या कसे ओळखावे
tingling in hands and feet
हाता-पायांमध्ये येणाऱ्या मुंग्यांकडे कधीही दुर्लक्ष करू नका; होईल भयंकर आजार, वेळीच जाणून घ्या कशामुळे होतो हा त्रास
Swatantra Veer Savarkar box office Collection Day 11
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाच्या कमाईत मोठी घट, ११ व्या दिवशी कमावले ६० लाख, एकूण कलेक्शन जाणून घ्या
Draw a beautiful rangoli of Gudhi
Video : पळी वापरून काढा गुढीची सुंदर रांगोळी, पाहताक्षणी लोक म्हणतील, “वाह! सुरेख”

वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगतात की, या डोकेदुखीचा टीनाच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर मोठा परिणाम झाला. “त्या 3-4 दिवसांत ती आपल्या मुलाला आणि पतीला दर्जेदार वेळ देऊ शकली नाही. ती ऑफिसला जाण्याच्याही मनस्थितीत नव्हती. ती एक सॉफ्टवेअर प्रोफेशनल होती आणि तिला नियमितपणे 2-3 दिवस प्रत्येक महिन्याला सुट्टी घ्यावी लागत होती,” असे डॉ. कुमारने त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले.

Heart Health: दीर्घकालीन हृदयविकार टाळण्यासाठी 4 आवश्यक स्वयंपाक पद्धती

टीनाने यासाठी तिच्या गायनॉकॉलॉजिस्टचा सल्ला घेतला पण त्या उपचारांचा तिला फारसा काही फायदा झाला नाही. सर्व काही व्यवस्थित असल्याचे तिला तिच्या गायनॉकॉलॉजिस्टने सांगितले. डॉक्टरांनी वेदनाशामक औषधांचा प्रयत्न केला, ज्यामुळे टीनाला फारसा फायदा झाला नाही. वेदनाशामक किंवा योगासने आणि ध्यान केल्यानंतरही तिला आराम मिळण्यास मदत झाली नाही. शेवटी, तिची जीवनशैली आणि वैद्यकीय इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर, डॉ कुमार यांनी तिला प्युअर मेन्सट्रेल मायग्रेन (PMM) असल्याचे निदान केले. “पीएमएममध्ये डोकेदुखी मासिक पाळीच्या 2 दिवस आधी किंवा मासिक पाळीच्या पहिल्या 3 दिवसात (-2 ते +3) होऊ शकते. या काळात मायग्रेनला इस्ट्रोजेन काढून टाकल्यामुळे चालना मिळू शकते,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

निदानानंतर, तिने दर महिन्याला त्या पाच दिवस वैद्यकीय उपचार घेणे निवडले कारण दैनंदिन औषधांची गरज नाही. “1-महिन्याच्या रिव्हिव्यूनंतर तिने फक्त 1 दिवस डोकेदुखी होत असल्याची तक्रार नोंदवली. पुढील 3 महिन्यांत, तिला दरमहा 0-1 दिवस डोकेदुखी होती. शिवाय, डोकेदुखीचा कालावधी केवळ 12 तासांचा होता आणि तीव्रता देखील कमी झाली होती. टीनाच्या जीवनाचा दर्जा सुधारला आणि तिला कामावरून सुट्टीची गरज भासली नाही,” डॉ कुमार यांनी सांगितले.

प्युअर मेन्सट्रल मायग्रेन म्हणजे काय?

प्युअर मेन्सट्रल मायग्रेन याला शुद्ध मासिक पाळीतील डोकेदुखी म्हणूनही ओळखले जाते. मासिक पाळी सुरू असलेल्या स्त्रीमध्ये मासिक पाळी येण्याच्या दोन दिवसांत आणि/किंवा मासिक पाळीच्या पहिल्या तीन दिवसांत उद्भवते, असे डॉ भाग्य लक्ष्मी एस. यांनी स्पष्ट केले. त्या हैद्राबादमधील यशोदा हॉस्पिटलच्या सल्लागार प्रसूतीतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि लॅपरोस्कोपिक सर्जन आहेत.

“या रुग्णांना मासिक पाळीशिवाय इतर वेळी मायग्रेनचा झटका येत नाही,” ती पुढे म्हणाली.

याबाबत सहमती दर्शविताना खारगर येथील मदरहूड हॉस्पिटलमध्ये सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ प्रतिमा ठमके यांनी सांगितले की, ‘हे दर महिन्याला होऊ शकते.’

रोज संत्री खाल्याने तुमचा तणाव आणि चिंता होऊ शकते दूर? जाणून घ्या

ही डोकेदुखी कशामुळे होते?

तज्ज्ञांच्या मते, मायग्रेनचे हे झटके मासिक पाळीदरम्यान इस्ट्रोजेन कमी झाल्यामुळे होतात. “तुमच्या मासिक पाळीच्या अगदी आधी कमी इस्ट्रोजेन पातळीमुळे ही डोकेदुखी होऊ शकते,” डॉ ठमके म्हणाले.

इतर कारणांमध्ये मौखिक गर्भनिरोधक गोळ्यांचा समावेश होतो. “इस्ट्रोजेनच्या पातळीत घट झाल्यामुळे त्यांना गोळ्यांचे सेवन न केलेल्या आठवड्यात डोकेदुखीचा अनुभव येऊ शकतो,” डॉ भाग्या म्हणाल्या की, डोकेदुखी सामान्यतः रजोनिवृत्तीच्या जवळ आणि गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत वाढते.

“हे सामान्य ऑर्मोन चक्राच्या व्यत्ययामुळे होते. पेरीमेनोपॉझल ग्रुपमध्ये वारंवार पाळी आल्याने डोकेदुखीची वारंवारता अधिक असू शकते. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनचे संतुलन बिघडल्यामुळे गर्भावस्थेच्या पहिल्या तिमाहीत डोकेदुखी वाढू शकते,” असेही त्यांनी सांगितले.

लक्षणे

पीएमएमच्या काही लक्षणांचा समावेश असू शकतो

  • उबदार वाटणे
  • भूक न लागणे
  • चक्कर येणे
  • थकवा
  • मळमळ
  • उलट्या होणे
  • अतिसार
  • प्रकाश, आवाज आणि वासांसाठी संवेदनशीलता वाढणे

कसा रोखू शकता हा आजार?

लक्षात ठेवण्यासाठी येथे काही टिप्स आहेत:

  • वारंवार लहान जेवण घ्या. जेवण न केल्याने किंवा उपवास केल्याने हार्मोन्समुळे डोकेदुखी होऊ शकते.
  • नियमित झोपेचे चक्र ठेवा आणि झोपताना स्वच्छता राखा.
  • तणाव आणि चिंता टाळा. त्यांचा सामना करण्यासाठी व्यायाम, योग आणि ध्यान यांचा वापर करा.