वॉशिंग्टन : मोबाइल, दूरचित्र वाहिन्या पाहण्यासाठी किशोरवयीन मुलांनी दिलेला वेळ आणि त्यांचे मानसिक आरोग्य या संबंधी एक संशोधन वॉशिंग्टन विद्यापीठाने केले आहे. या संशोधनानुसार अशा उपकरणांच्या नियमित वापरामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

संशोधक एम. लिन चेन यांनी सांगितले की, मी सिएटलमधील एका बालरोग रुग्णालयात डॉक्टर आहे. या ठिकाणी मुलांच्या झोपेसंबंधी विकारांवर अभ्यास करते. आमच्या पथकाने समाजमाध्यमे, दूरचित्र वाहिन्यांसह मोबाइलवर मुलांनी व्यतीत केलेल्या वेळेचे त्यांच्या मनावर होणाऱ्या नकारात्मक परिणामांबाबत निरीक्षण केले आहे. या वेळी कमी झोप ही मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम करते, हे दिसून आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आठवडय़ातील एका दिवसातील एक तासाच्या कमी झोपेमुळेही मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊन नैराश्यासह आत्महत्येचे विचार मनात येण्याची शक्यता असते. तसेच मुले अमली पदार्थाच्या आहारी जाण्याची शक्यताही वाढते, असेही संशोधनात आढळले आहे. जगभरातील ६ ते १८ या वयोगटातील १ लाख २० हजार मुलांच्या दिनचर्येवर आधारित या संशोधनानुसार कोणत्याही प्रकारच्या समाजमाध्यमांवर सक्रिय असलेली मुले ही अनिद्रने ग्रस्त आहेत. हे वाईट परिणाम अमेरिकेतीलच नव्हे, तर जगभरातील मुलांमध्ये दिसून येत आहेत.