scorecardresearch

Premium

Mental Health Special: गुड फीलिंगचा व्हायरस पसरावा!

“मानसिक आरोग्य किंवा स्वास्थ्य “म्हणजे “मानसिक आजार “ असा गैरसमज समाजात आहे.

good mental health important Spread virus good feeling society
गुड फीलिंगचा व्हायरस पसरावा! (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सावर रे मना ….
मन वढाय वढाय
उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरून येतं पिकांवर

खान्देशकन्या बहिणाबाई चौधरींच्या या ओळी मनाच्या चंचलतेबद्दल आपल्याला बरंच काही सांगून जातात. अशा अस्वस्थ मनाला स्वस्थ ठेवण्यासाठी त्याला समजणे अत्यंत महत्वाचे आहे. हे “मानसिक आरोग्य किंवा स्वास्थ्य “म्हणजे “मानसिक आजार “ असा गैरसमज समाजात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या व्याख्येनुसार मानसिक आरोग्य म्हणजे अशी स्वास्थ्यस्थिती ज्यामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्यातील क्षमता ओळखून त्याजोगे पुरेपूर वागू शकेल, दैनंदिन जीवनातील ताणतणावांचा सामना करू शकेल उत्पादनक्षमपणे कार्यरत राहील व समाजाप्रती योगदान करू शकेल. मानसिक स्वास्थ्य हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे . आपले विचार, भावना आणि वर्तन या तीन गोष्टी मानसिक संतुलनाचा आधार आहेत. परंतु ‘व्यक्ती ‘आणि ‘परिस्थिती ‘ नुसार या तीन गोष्टी बदलतात. तेव्हा हे संतुलन बिघडून मानसिक आजार उद्भवू शकतात.

pain behaviour in marathi, what is pain behaviour in marathi
Health Special : पेन बिहेवियर म्हणजे काय?
Jaya Ekadashi 2024
Jaya Ekadashi 2024 : जया एकादशीला ‘या’ चार राशींना होणार बक्कळ धनलाभ? तुमचे नशीब पालटणार का? जाणून घ्या
village development poverty alleviation programmes reservation for ebc
चतु:सूत्र : वंचित नाही, म्हणून गरीबही नाही?
health special, chocolate, hot, cocoa powder, kisme, eclairs, cadbury, valentine day,
Health Special : चॉकलेटचा कुठला प्रकार तुम्हाला ठेऊ शकतो फिट?

आजच्या धावपळीच्या युगात संसाधनांपलीकडे मागण्या, वाढते कामाचे तास, आजारग्रस्तांची काळजी घेणे, आर्थिक समस्या, एकटेपणा अशी अनेक कारणे coping म्हणजे सामना करण्याच्या क्षमतेला आव्हान देतात. त्यातच ‘व्यक्ती तितक्या प्रकृती ‘ म्हणजे अनेकांचे स्वभावदोष मन अस्वस्थ करतात. उत्तम मानसिक आरोग्य असलेल्या व्यक्ती बिकट स्थितीत ताणतणाव कसा कमी करावा यावर उपाय शोधू शकतात. दुसऱ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि प्रसंगी चुकीच्या गोष्टींना विरोध करून योग्य निर्णय घेतात.

हेही वाचा… Mental Health खरंच मॅटर का करतं?

मानसिक आरोग्याचा थेट संबंध शारीरिक आरोग्याशी आहे. डिप्रेशन, अँझायटी सारखे आजार, डोकेदुखी, पचनसमस्या, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा अनेक आजारांना निमंत्रण देतात. म्हणूनच शरीराबरोबर मनावर लक्ष देणे आवश्यक आहे. Emotional Intelligence (EI) म्हणजे भावनात्मक बुद्धीमत्ता यात महत्वाची भूमिका बजावते. EI चांगला असल्यास विचारक्षमता, निर्णयक्षमता सुधारते. स्वतःची जाणीव होणे, आवेगावर नियंत्रण येणे , दुसऱ्या बद्दल सहानुभूती निर्माण होणे, कामात चिकाटी आणि प्रेरणा येणे अशा अनेक चांगल्या गोष्टी भावनात्मक बुद्धीमुळे होउन नातेसंबंधामध्ये होणारे संघर्ष कमी होतील आणि मन शांत होण्यास मदत होईल.

हेही वाचा… Mental Health Special: मुलांना सांगा या १० महत्वाच्या टिप्स!

बालपणी अनुभवलेली हिंसा, कर्करोग किंवा मधुमेहासारखे आजार, मेंदूतील रसायनांत झालेला बदल, उत्तेजक पदार्थांचे सेवन, डोक्याला गंभीर मार लागणे, आकडीची समस्या अशी अनेक कारणे मानसिक आजाराशी निगडीत आहेत. भारतात प्रत्येक ८ पैकी १ जण मानसिक आजाराने ग्रस्त आहे. आजची मुलंही social media च्या काळात एकाकी आहेत. Phone वर मित्रांची गर्दी असते पण गरजेच्या वेळी समजून घेणारे मित्र त्यांना नाही. हे सगळे थांबावयास हवे. Connectedness ही त्याची गुरूकिल्ली आहे. स्वतःबरोबर आपल्या लोकांची विचारपूस करणे, गरज पडल्यास त्यांना मदत करणे, सकस आहार आणि पुरेशी झोप घेणे, आवडीचा व्यायाम, प्राणायाम करणे, नकारात्मक बातम्या कमी ऐकणे महत्वाचे आहे.” गुड फीलिंग “ चा व्हायरस समाजात पसरवणे काळाची गरज आहे \!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: For good mental health its important to spread the virus of good feeling in the society hldc dvr

First published on: 10-10-2023 at 12:41 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×