A1 Milk Or A2 Milk: गेल्या काही काळात सोशल मीडियावर A1 आणि A2 दूध आणि तूप याबाबत बरीच चर्चा आणि जाहिरातही पाहायला मिळत आहे. दूध तसंच तूप विकणाऱ्या कंपन्या A2 दूध आणि तूप आरोग्यासाठी सर्वात जास्त फायदेशीर असल्याचा दावा करतात. असं असताना गेल्या वर्षी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) कंपन्यांना A1 किंवा A2 म्हणून दूध विकण्यास मनाई केली. त्यानंतर एफएसएसएआयने आपला देश मागे घेतला. सध्या कंपन्या त्यांच्या लेबलवर A1 आणि A2 उत्पादन असल्याचे छापत आहेत. मात्र याबाबत योग्य माहिती अद्याप लोकांना ठाऊकच नाही. तर मग A1 आणि A2 दुधात नेमका फरक काय आणि दोघांचे फायदे काय याबाबत सविस्तर जाणून घेऊ…

A1 आणि A2 दूध म्हणजे काय?

A1 आणि A2 दुधामधील फरक पूर्णपणे समजून घेण्यासाठी दुधाची रचना समजून घेणे महत्त्वाचे आहे. गायींसह सर्व सस्तन प्राण्यांच्या दुधात तीन मुख्य घटक असतात ती म्हणजे चरबी, कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने. या प्रथिनांपैकी केसीन हे गायीच्या दुधातील प्रथिनांच्या सामग्रीपैकी अंदाजे ८० टक्के असते. केसीनचे अनेक उपप्रकार देखील आहेत आणि त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे बीटा-केसीन. हे गायीच्या दुधातील एकूण प्रथिनांपैकी अंदाजे ३० टक्के असते.

सोप्या भाषेत सांगायचे तर बहुतेक गायी A1, A2 किंवा दोन्ही प्रथिनांचे मिश्रण असलेले दूध तयार करतात. मानव आणि इतर सस्तन प्राणी फक्त A2 बीटा केसीन तयार करतात. मात्र गायींमध्ये अनुवांशिक उत्परिवर्तनामुळे (mutation) A1 आणि A2 दोन्ही प्रथिने तयार करण्याची क्षमता विकसित झाली आहे.

A1 आणि A2 दुधामधील फरक

A1 दुधात A1 बीटा-केसीन असते. ते युरोपियन जातींमध्ये जास्त प्रमाणात आढळते. तसंच A2 दुधात A2 बीटा-केसीन असते. ते भारतीय जातींमध्ये आढळते आणि त्यात प्रोलाइन देखील असते. काही अभ्यास असे दर्शवतात की, A2 दूध पचन आणि आरोग्यासाठी चांगले असू शकते. मात्र अजूनही A1 आणि A2 दुधामध्ये कोणे चांगले आहे यावर संशोधन सुरूच आहे.

A1 आणि A2 दुधाबाबतच्या गैरसमजुती आणि तथ्ये

A1 आणि A2 दुधाबद्दलच्या विविध दाव्यांबाबत कंपन्यांनी सांगितलेले फायदे आणि जोखीमा या बऱ्याच संभ्रमित करणाऱ्या आहेत. A1 दुधाचा वापर टाइप-१ मधुमेह, ऑटिझम आणि हृदयरोग यासारख्या अनेक जुनाट आजारांशी जोडणारे असल्याचे सांगणारे अनेक जुनी संशोधनं आहेत. असं असताना कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी अधिक संशोधन आवश्यक आहे.

सध्या ज्यांना नियमित गायीच्या दुधाचा वापर करून पचनाच्या समस्या आहेत, त्यांच्यासाठी A2 दूध हा एक उत्तम पर्याय आहे. मात्र तरीही सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. काही लोक A2 दूध सहजपणे सेवन करतात म्हणजे असं नाही की ते प्रत्येकासाठी योग्य आहे. दुग्धजन्य पदार्थांची तुमच्या शरीराची प्रतिक्रिया अनेक घटकांवर अवलंबून असू शकते. त्यामुळे तुमचे आतड्यांचे आरोग्य, जनुके आणि एकूण आहार यांचा समावेश आहे.

A1 आणि A2 दूध निवडावे?

A1 आणि A2 दूध निवडण्यात सर्वात मोठा घटक म्हणजे वैयक्तिक अनुभव. काही लोकांना A2 दूध फायदेशीर वाटते, तर काहींना दुग्धजन्य पदार्थ पूर्णपणे टाळल्याने बरे वाटते. तुमच्या शरीराचे ऐकणे आणि दूध पिल्यानंतर तुम्हाला कसे वाटते याकडे लक्षण देणे महत्त्वाचे आहे. जे लोक याबाबत काही ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी दोन्ही प्रकारचे दूध वापरून पहावे आणि पचन किंवा एकूण आरोग्यात होणारे बदल नोंदवावे. तुम्ही A1 आणि A2 किंवा लॅक्टोज फअरी दूध निवडले तरी सर्वात महत्त्वाचे हे आहे की तुमचे शरीर त्यावर काय प्रतिक्रिया देते.