Breakfast For Heart Disease Prevention: हृदयाला निरोगी ठेवणारा आहार तुमच्या दिवसाच्या प्रारंभापासून सुरू होतो. तुमच्या सकाळच्या दिनचर्येत पौष्टिकतेने भरलेले, हृदयाला निरोगी ठेवणारे पदार्थ समाविष्ट केल्याने तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो.

नवी दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्समधील कार्डिओथोरॅसिक व हार्ट अँड लंग ट्रान्सप्लांट सर्जरीमधील वरिष्ठ सल्लागार डॉ. मुकेश गोयल, नाश्त्याच्या काही पर्यायांची माहिती देतात, जे चवीलाच उत्तम असण्यासह हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आरोग्यासही मदत करतात.

फायबरयुक्त ओटमिलपासून ते ओमेगा-३ युक्त स्मूदीपर्यंत हे जेवण तुमच्या हृदयाला पोषण देण्यासाठी आणि दिवसभर सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी निर्माण करण्यात आले आहेत.

१. ताज्या बेरीजसह संपूर्ण धान्य, डाळी

धान्य हे हृदयाच्या आरोग्यासाठी एक प्रमुख अन्न आहे. कारण- त्यात बीटा-ग्लुकन, एक विरघळणारे फायबर आहे; जे एलडीएल (वाईट) कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकते.

ब्ल्यूबेरी किंवा स्ट्रॉबेरीसारख्या ताज्या फळांचे सेवन केल्याने अँटीऑक्सिडंट्स आणि अतिरिक्त फायबरदेखील मिळतात; जे हृदयरोगाचे प्रमुख घटक असलेले ऑक्सिडेटिव्ह ताण आणि जळजळ कमी करण्यास फायदेशीर ठरतात.

२. मिक्स ड्रायफ्रुट्सह ग्रीक दही

ग्रीक दही हा उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांचा एक उत्कृष्ट स्रोत आहे. हा स्रोत स्नायूंची प्रमाणबद्धता आणि एकूण आरोग्य राखण्यास मदत करतो.

बदाम, अक्रोड किंवा पिस्ता यांसारख्या मिक्स ड्रायफ्रुट्सह ते खाल्ल्याने, त्यातून हृदयासाठी आरोग्यदायी असंतृप्त चरबी, फायबर आणि मॅग्नेशियम व पोटॅशियम यांसारखे आवश्यक सूक्ष्म पोषक घटक मिळतात. हे पोषक घटक रक्तदाब नियंत्रित पातळी राखण्यासाठी आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी आवश्यक आहेत.

३. अॅव्होकॅडोसह संपूर्ण धान्य टोस्ट

संपूर्ण धान्याच्या टोस्टमध्ये जटिल कार्बोहायड्रेट्स असतात; जे सतत ऊर्जा प्रदान करतात आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात.

त्यात अ‍ॅव्होकॅडो घातल्याने मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्सचा समावेश होतो, जे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवून लिपिड प्रोफाइल सुधारण्यासाठी ओळखले जातात. हे मिश्रण हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि एकूणच आरोग्यास समर्थन देते.

४. मिक्स भाज्यांसह अंड्याचे पांढरे आम्लेट

अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये संतृप्त चरबी कमी आणि प्रथिने जास्त असतात, ज्यामुळे ते हृदयासाठी अनुकूल पर्याय ठरते.

पालक, टोमॅटो व शिमला मिरचीसारख्या विविध भाज्यांचा समावेश केल्याने जेवणातील फायबर आणि पोषक घटक वाढतात, ज्यामुळे हृदयाच्या आरोग्यास मदत करणारे आणि जळजळ कमी करणारी जीवनसत्त्वे, खनिजे व अँटिऑक्सिडंट्स मिळतात.

५. ग्रीन स्मूदी (पालक, केळी, कुस्करलेली आळशी)

पालक, केळी व कुस्करलेल्या आळशीच्या बिया वापरून बनवलेल्या हिरव्या स्मूदीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि वनस्पती-आधारित ओमेगा-३ फॅटी अॅसिड यांसारखे घटक भरपूर प्रमाणात असतात.

हे पोषक घटक रक्तदाब नियंत्रित ठेवणे, कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करणे आणि एकूणच हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे आरोग्य चांगले राखणे यांसाठी आवश्यक आहेत .

६. कमी चरबीयुक्त दूध आणि बदामासह संपूर्ण धान्य

संपूर्ण धान्य हा जटिल कार्बोहायड्रेट्सचा एक उत्तम स्रोत आहे, जो ऊर्जा प्रदान करतो आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कमी चरबीयुक्त दुधासह ते खाल्ल्याने हृदय आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी यांचे प्रमाण वाढते. बदाम हृदयासाठी आरोग्यदायी चरबी आणि अतिरिक्त फायबर प्रदान करतात, ज्यामुळे नाश्त्याला हा एक चांगला, हृदयासाठी अनुकूल असा पर्याय ठरतो.