मागच्या लेखात आपण कोलेस्ट्रॉलचे शरीरातील प्रमाण आणि आहारातील तेल याबद्दल जाणून घेतलं. या लेखात तेलाचे वेगवेगळे प्रकार आणि त्याचे शरीरावर होणारे परिणाम याबाबत जाणून घेऊया.

अनेकदा केवळ फॅट्सचा वापर कमी केला की कोलेस्ट्रॉल आपोआप कमी होईल असा एक समज आपल्याकडे आहे. तेल आणि कोलेस्ट्रॉल यांचा जवळचा संबंध नक्कीच आहे. मात्र केवळ तेल बंद केलं तर त्याबरोबर आवश्यक जीवनसत्त्वांच्या प्रमाणावर देखील परिणाम होतो.

Stale vs fresh roti Find out which one might help regulate blood sugar
रात्री फ्रिजमध्ये ठेवलेली पोळी सकाळी खावी का? शिळी पोळी रक्तातील साखरेचे नियमन करू शकते का? तज्ज्ञ काय सांगतात
Loksatta kutuhal Artificial Neural Networks Perceptrons Machine learning
कुतूहल: कृत्रिम चेतापेशींचे जाळे
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स
Eating walnuts on an empty stomach in the morning
अक्रोड खाताना ‘ही’ योग्य वेळ, पद्धत व प्रमाण पाळल्यास मेंदू होईल तल्लख; तुमच्या शरीरात काय बदलेल?

शरीरातील पेशी निरोगी ठेवायच्या असतील तर कोलेस्ट्रॉल आवश्यक आहे. हेच कोलेस्ट्रॉल जर शरीरात साठू लागले तर मात्र हृदयरोगाचे कारण ठरू शकते.

आपल्या शरीरात इस्ट्रोजेन , टेस्टोस्टेरॉन ,ड जीवनसत्त्व यांचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी किंबहुना या सगळ्या आवश्यक पोषणतत्त्वांचे संप्रेरकांच्या निर्माणासाठी कोलेस्ट्रॉल आवश्यक असते. स्निग्ध पदार्थ पाण्यात विरघळू शकत नाहीत. तसेच रक्तात देखील विरघळू शकत नाहीत मात्र स्निग्धांशाचे योग्य प्रमाण शारीरिक संतुलनासाठी आवश्यक आहे.

हेही वाचा… Health Special : टीबीवरच्या बीसीजी लसीचा नव्याने अभ्यास का सुरू झाला आहे?

ओमेगा – ३, ६ आणि ९ स्निग्धांश आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण संतुलित राहण्यासाठी मदत करतात

पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स -विशेषतः ओमेगा ३ फॅटी ऍसिड्समुळे कोलेस्ट्रॉल प्रमाणात राहते तसेच LDL चे प्रमाण कमी होते.

मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्समुळे ट्रायग्लिसेराईडचे प्रमाण कमी होते. मात्र संपूर्ण कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते. वनस्पतीजन्य आणि प्राणिजन्य पदार्थामध्ये या प्रकारचे फॅट्स आढळतात. बेकरी पदार्थ तयार करताना त्याला मऊपणा आणण्यासाठी आणि अनेकदा चकाकी आण्यासाठी जे स्निग्धांश वापरले जातात त्यांचा शरीरातील LDL वाढण्यात बऱ्यापैकी हातभार लागतो. अनेकदा केक, पेस्ट्री यावर तेलाचे प्रमाण लिहिलेले नसते. केकची घनता , त्याचा पोत मऊसर असावा यासाठी वापरले जाणारे तेलाचे आणि साखरेचे प्रमाण अवाजवी असते.

रेडी टू इट पदार्थातील छुपे स्निग्धांश

पदार्थ जास्त वेळ टिकून राहावेत म्हणून प्रक्रिया करताना त्यात जास्तीचे स्निग्ध पदार्थ एकत्र केले जातात. विशेषतः चटणी , खोबऱ्याचे पदार्थ , रेडी तो कुक पदार्थाची ग्रेव्ही यात साठवणीच्या तेलाचे प्रमाण भरपूर असते. नेहमीचे पदार्थ बाजारातून खरेदी करताना त्यात असणारे अन्न घटक पडताळून पाहणे महत्वाचे आहे. अनेकदा हेल्दी किंवा आरोग्यदायी वाटणारे पदार्थ छुपे स्नोग्धांश सोबत घेऊन येतात.

हेही वाचा… Health Special : स्क्रीन टाइम मॅनेजमेंट कसं करायचं?

अशा पदार्थांमध्ये मुख्य पदार्थासोबत – व्हेजिटेबल ऑइल , व्हेजिटेबल सॉलिड्स , प्रेझर्वेटिव्हस , मीठ ,साखर यांचे प्रमाण देखील मुबलक असते.

उदाहरणार्थ आपण नेहमीच्या रेडी टू मेक सूपबद्दल पाहूया.

अन्न घटक – साखर , मक्याचे स्टार्च , टोमॅटो पावडर (१५%), मैदा , मीठ हायड्रोजिनेटेड पामतेल , वाळवलेल्या भाज्या – कांदा पावडर , मसाले, घट्टपणा कमी करणारे घटक , घनता वाढविणारे पदार्थ , बीट पावडर, लसूण पावडर , नैसर्गिक अन्नपदार्थ सदृश घटक ,चव वाढविणारे पदार्थ , गहू , ऍसिडिटी कमी करणारे पदार्थ. या सगळ्या अन्न घटकांमध्ये टोमॅटो सूप म्हणून आपण मैदामिश्रित पाणी गरम करून पितोय ज्यात ५०% इतकं देखील टोमॅटो किंवा भाज्या नाहीयेत. हे सूप दररोज आहारात असेल तर शरीराचे नुकसान जास्त होण्याची संभावना आहे.

बिस्किटांच्या बाबतीत देखील याच प्रकारचे अन्नघटक बिस्कीट तयार करण्यासाठी वापरले जातात. मल्टिग्रेन म्हणून दावा करणाऱ्या अनेक बिस्किटांमध्ये धान्याचं प्रमाण ३०% हून देखील कमी असते आणि पामतेल ,बटर ,मार्गरिन यांचे प्रमाण जास्त असते. कोलेस्ट्रॉल संबधी केल्या गेलेल्या संशोधनात हे ठळकपणे आढळून आले आहे की नियमितपणे बिस्कीट , केक्स, बेकरी आहारात असणाऱ्या व्यक्तींमध्ये LDLचे प्रमाण वाढलेले असते आणि HDL चे प्रमाण अत्यल्प असते.

बेकरी पदार्थ अनेकदा अनावश्यक अतिरिक्त ऊर्जेचे म्हणजेच एक्सट्रा कॅलरीजचे कारण होतात.

हेही वाचा… Health Special: पित्त म्हणजे नेमकं काय? त्याचे प्रकार किती?, जाणून घ्या

मुख्यत्वे ही ऊर्जा साखर आणि स्निग्धांशापासून मिळते. सातत्याने आहारात बेकरी पदार्थ समाविष्ट केल्यास हळूहळू LDL चे प्रमाण वाढू लागते. याबरोबरीने ट्रायग्लिसेराईड देखील वाढते. आपल्या स्वादुपिंडावरील ताण वाढला की हळूहळू रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू लागते.

धूम्रपान करणारे आणि दारूचे सेवन करणाऱ्यांमध्ये व्हाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता ७५-८० % इतकी जास्त वाढते. कोलेस्ट्रॉल वाढणे आणि चांगले कोलेस्टेरॉल कमी होण्याची प्रक्रिया दैनंदिन जीवनशैली, आहार शैली यावर देखील अवलंबून असते. नेहमीच्या आहारात किमान ५०० मिली तेल एका व्यक्तीसाठी महिन्यभरासाठी पुरायला हवे. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले असेल तर योग्य आहारनियमन , साठवणीच्या पदार्थाचे, वापरलेल्या तेलात तळलेल्या पदार्थाचे शून्य प्रमाण , ताज्या फळ-भाज्यांचे मुबलक प्रमाण आणि सुधारित जीवनशैली यांनी उत्तम परिणाम होऊ शकतात.