‘आई, मी आले गं कॉलेज मधून, भूक नाही मला अजिबात’, प्रणाली घरात आल्या आल्या आईला म्हणाली. आई जणू ती घरात शिरण्याचीच वाट पाहत होती. ती तरातरा प्रणालीच्या खोलीत आली आणि म्हणाली, ‘आज तुझे कपाट आवरले मी’. प्रणाली जागीच उभी राहिली आणि अचानक आईवर चिडली. ‘तू का हात लावलास माझ्या कपाटाला? मी मला हवे तेव्हा कपाट आवरेन नाही तर नाही आवरणार ! काय फरक पडतो? कोण बघायला येणार आहे माझे कपाट’? आईही चिडली. म्हणाली, ‘मी आई आहे तुझी. कॉलेजमध्ये जातेस म्हणजे काही फार मोठी झाली नाहीस! किती पसारा होता! कपडे नुसते कोंबून भरलेले! तो एक क्रॉप टॉप कधी आणलास? मी बघितलेला नाही तो कधी! आणि एक ग्रीटिंग कार्ड मिळाले. अभिजीतने दिलेले. कोण हा? लाल गुलाबांचे चित्र आहे कार्डावर ! काय चाललंय काय? आम्ही लाड करतो म्हणून काय झालं? आपलं वागणं स्वच्छ हवं. समजलं’? प्रणाली आणखीच चिडली आणि आई मुलीच्या वादाला तोंड फुटले. प्रणालीच्या मते एक मुलाने ग्रीटिंग कार्ड दिल्याने काही फरक पडत नाही. ती म्हणाली त्याप्रमाणे तिचा त्या मुलाशी काही संबंध नाही. दुसरे आईने तिला त्यावरून ‘जज’ करू नये.. तसेच प्रणालीला वाटले क्रॉप टॉप एखादेवेळेस मैत्रिणींबरोबर घालायला काय हरकत आहे? आई म्हणजे फारच जुनाट कल्पना बाळगते! काकूबाईसारखे कपडे घातले तरच मुलीचे वागणे बरोबर का?

‘कुठून आलास? किती वाजले? काही ताळतंत्र आहे की नाही? बारावीचे वर्ष आहे! अभ्यास कधी करायचा? नुसत्या उनाडक्या करायला हव्यात! कोण तुझे मित्र आहेत बघू तरी देत! परवा तुम्ही सगळे कोपऱ्यावर उभे होतात, ते पाहिले मी. एक जण तर चक्क सिगरेट फुंकट होता! तुझे काय’? बाबा नुसते जाब विचारत होते. शंतनू जाम वैतागला. बाबा, ‘माझ्यावर थोडा विश्वास ठेवलात तर बरं होईल. मी सिगरेट ओढत नाही. आईने तर चक्क जोरात श्वास घेतला. मी घरात आल्यावर सिगरेटचा वास येतो आहे का हे पाहायला! मी रोज देवाला नमस्कार करत नाही, मला त्याची गरज वाटत नाही; याचा अर्थ सिगरेट पिणे मला चालते, आवडते असे नाही ना! मला विचारलेत का, काही प्रॉब्लेम होता का? सांगून काही फायदा नाही म्हणा! अभ्यास मी करतो. पण याच्यावर तरी तुमचा कुठे विश्वास आहे?”

nashik sakal maratha samaj
…अन्यथा शरद पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांच्या घरासमोर उपोषण, नाशिकच्या सकल मराठा समाजाचा इशारा
Uddhav Thackeray Party symbol lok sabha Election 2024
‘असली’ कोण; ‘नकली’ कोण…!
Artist Marathi Comedy actor hoy Maharaja movie
रंजक प्रथमेशपट
sushma andhare on Dr Ajay Taware
Pune Porsche Crash : “डॉ. अजय तावरेंच्या जीवाला धोका”, सुषमा अंधारेंनी आर्यन खान प्रकरणाचा हवाला देत म्हटले…
Abdul Malik, Malegaon,
मालेगावात माजी महापौर अब्दुल मालिक यांच्यावर गोळीबार
Paralytic attack, Anand Dighe sister,
आनंद दिघे यांच्या बहिणीला पॅरालिटीक अटॅक, रुग्णालयात दाखल
Harassment Case Brijbhushan Sharan Singh
“मी गुन्हा केलाच नाही, तर गुन्ह्याची कबुली…”; महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोपावर ब्रिजभूषण सिंह यांची प्रतिक्रिया
Swati Maliwal Case
Swati Maliwal Case : “हा माझ्या मुलावर अन्याय आहे, तो गेली १५ वर्ष…”; बिभव कुमार यांच्या अटकेनंतर वडिलांची प्रतिक्रिया

हेही वाचा…Health allergy Special: कृत्रिम दागिन्यांच्या ॲलर्जीवर उपचार कोणते?

मुलं मोठी होऊ लागली की शा प्रकारचे अनेक संवाद घरोघरी घडतात.

आईवडिलांना आपल्या मुलांमधले अनेक बदल डोळ्यासमोर दिसत असतात. आपल्या मुलाला मिसरूड फुटली आहे, आवाजात बदल झाला आहे हे पाहून एकीकडे छान वाटते, तर एकीकडे आपला मुलगा बिघडणार तर नाही ना अशी भीती वाटू लागते. घरातल्या एखाद्या लग्नाच्या वेळेस आपली मुलगी छान नटली, जरा मेकअप केला तर आई मनात खूश होते आणि दुसरीकडे ‘अरे बाप रे, आता जपायला हवे हिला! आपले चारित्र्य सगळ्यात महत्त्वाचे, हे कळेल ना तिला?’ अशी चिंता वाटते. आता मुले अनेक प्रश्न उपस्थित करतात. घरातल्या पद्धती, रूढी पाळायला विरोध करतात. ‘बरोबर- चूक’ च्या व्याख्या मान्य करतातच असे नाही. ‘माझी इच्छा, माझे मत’ हे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटू लागते. मित्रमंडळींचा, त्यांच्या आचार विचाराचा जास्त प्रभाव पडतो. मग आपला मुलगा/ मुलगी ‘बंडखोर’ झाली असे वाटते.

मुलांची शारीरिक, मानसिक, भावनिक, वैचारिक, बौद्धिक आणि सामाजिक वाढ होत असते आणि पालकांना त्या बदलांचा स्वीकार करत करत आपल्या मुलांचे वागणे योग्य राहील, ती आत्मविश्वासाने समाजात वावरतील, आपल्या भविष्याविषयी निर्णय घेऊ शकतील आणि योग्य दिशेने त्यांचा विकास होईल या साठी प्रयत्न करावे लागतात.

हेही वाचा…Health allergy Special: कृत्रिम दागिन्यांच्या ॲलर्जीचे प्रकार आहेत तरी किती? 

ज्या प्रेमाने आपण लहानपणापासून मुलांशी वागलो, त्याच प्रेमाने आणि मायेने आता आपला मुलगा/ मुलगी पौंगंडावस्थेत असतानाही आपल्याला वागायचे आहे. आपल्या मुलावर विश्वास ठेवायचा आहे. पण त्याचबरोबर त्याचे वागणे योग्य आहे ना याकडे लक्षही ठेवायचे आहे. या वयात मुलांना आपले मत असते, त्यामुळे कोणताही निर्णय करताना, मग तो गाडी/स्कूटर कुठली घ्यायची असा महत्त्वाचा निर्णय घेतानाही मुलांशी चर्चा करावी. एखाद्या निर्णयात त्यांना पर्यायांचा विचार करायला प्रवृत्त करावे. योग्य काय, अयोग्य काय हे ठरवण्याचे स्वातंत्र्य जरूर द्यावे, त्यासाठी आधी आपले मत काय आहे, ते का तसे आहे आहे, इतर मते काय काय असू शकतात अशी सगळी चर्चा केली की मुलांना आपल्या मताचेही महत्त्व समजते.

समाजाला अपेक्षित असलेले सगळे संकेत आपला मुलगा/ मुलगी पाळेल असे नाही, घरात पाहुणे आले तरी आपली मुलगी गाणी ऐकत बसते आणि त्यांच्याशी विशेष बोलत नाही, हे कदाचित आपल्याला सहन करावे लागते. काही मर्यादा घालून दिल्या आणि त्या आग्रहाने पण न रागावत पाळल्या तर आपोआप मुले आपल्याशी सहकार्य करतात. उदा. पाहुणे आल्यावर त्यांच्याशी ओळख देऊन, त्यांनी आपल्याला विचारलेल्या दोन प्रश्नांना उत्तर देऊन मग गाणी ऐकायला जावे, असा नियम सहज पाळता येण्यासारखा आहे. जर असे नाही वागले, तर पाहुण्यांच्या समोर न रागावता, नंतर आपली नापसंती स्पष्ट शब्दात व्यक्त करावी. आपली काय अपेक्षा आहे आणि का आहे हे ही स्पष्ट करावे.

हेही वाचा…Health Special: ड जीवनसत्वाची कमतरता केव्हा निर्माण होते? त्यावर उपाय काय?

आपला मुलगा अभ्यास करतो ना, अशी सतत शंका बाळगण्यापेक्षा त्याच्या अभ्यासाची दर काही दिवसांनी विचारपूस करावी, त्याचे वेळापत्रक काय आहे हे माहीत करून घ्यावे. आपल्या असे लक्षात आले, की तो पुरेसा अभ्यास करत नाही आहे, तर त्याला हा ‘फीडबॅक’ नक्की द्यावा, आपली अपेक्षा काय ते सांगावे आणि त्याच्याशी चर्चा करून काही उद्दिष्ट ठरवावे. आपल्या आईचा असा दृष्टिकोण, सारखे जाब न विचारता विश्वासाने वागणे याचा चांगला परिणाम होतो आणि आईची ‘कटकट’ वाटत नाही.

आपल्या मुलाला या काळात मित्र सगळ्यात महत्त्वाचे असतात. सहजपणे त्याच्या मित्रांची चौकशी करणे, त्यांची मते जाणून घेणे, प्रत्येक गोष्टीवर टीका न करणे हे मुलांचा विश्वास संपादन करायला फार आवश्यक. आपल्या मुलांवर काही ना काही जबाबदारी टाकणेही आवश्यक! त्यातून त्याचा आत्मविश्वास वाढतो. या सगळ्यात मुलांबरोबरचा संवाद महत्त्वाचा ठरतो. पालक आणि मुले यांच्यातले सुदृढ नाते हा संघर्षमय किशोरवयाचा काळ पार पाडायला मदत करते.