Liver Problem Symptoms in Feet: लिव्हर हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे जो शरीराला डिटॉक्स करतो. अयोग्य आहार, जास्त प्रमाणात मद्यपान आणि अनुवांशिक कारणांमुळे लिव्हरच्या समस्या वाढू शकतात. लिव्हर हा शरीराचा असा भाग आहे जो शरीराच्या प्रत्येक अवयवाला नक्कीच काहीतरी देत ​​असतो. लिव्हरचे मुख्य कार्य म्हणजे प्रथिने आणि प्रतिकारशक्ती वाढवणे, ज्याच्या मदतीने आपण रोगांपासून सुरक्षित राहतो. शरीराच्या या महत्वाच्या भागात काही बिघाड झाला तर अनेक आजार शरीरात निर्माण होऊ लागतात.

लिव्हरच्या आजारांबद्दल बोलायचे झाले तर त्याची लक्षणे शरीरात आधीपासूनच दिसू लागतात. शरीरात अशक्तपणा, भूक न लागणे, उलट्या होणे, झोप न लागणे, दिवसभर थकवा जाणवणे, शरीरातील आळस आणि वजन झपाट्याने कमी होणे ही लिव्हर खराब होण्याची लक्षणे आहेत. किडनी खराब झाल्याची काही लक्षणे पायांमध्येही दिसू लागतात.

Weight Lose Tips
झटपट वजन कमी करायचंय? सकाळी उठल्या-उठल्या करा ‘या’ ५ गोष्टी; महिनाभरात कमी होईल वजन, दिसाल फिट
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Fennel seeds carom seeds water benefits
आरोग्याच्या ‘या’ ५ समस्या होतील झटक्यात दूर; जाणून घ्या ओवा, बडीशेपच्या मॅजिक ड्रिंकचे फायदे
risk of cancer from bakery products marathi news
बेकरीजन्य पदार्थांमुळे कर्करोगाचा धोका; भंगारातील फर्निचरमधून उत्सर्जित होणारी रसायने आणि वायू हानिकारक
‘या’ वेळात शेंगदाणे खाल्ल्यास झपाट्याने होणार वजन कमी? सेवनाची ‘ही’ पद्धत फक्त एकदा समजून घ्या…
are you always in a stress due to workload
Work Stress : तुम्ही कामाचा सतत ताण घेता का? कसं ओळखाल? जाणून घ्या लक्षणे
Do Bike Service At Right Time
Bike Service: किती दिवसांनी करावी बाईकची सर्व्हिसिंग? योग्य वेळ जाणून घ्या; पावसाळ्यात प्रवास होईल सुखाचा
Vinesh Phogat challenges faced
विश्लेषण: वजन कमी करणे कुस्तीगीरांसाठी अवघड का ठरते? विनेशला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला?

सायंटिफिक बेस्ड होमिओपॅथी डॉ.मनदीप दहिया यांच्या मते, लिव्हरच्या समस्यांची काही लक्षणे पायांमध्ये दिसू लागतात. ही लक्षणे वेळीच ओळखली नाहीत तर समस्या वाढू शकते. लिव्हर खराब होण्याआधी पायात कोणती लक्षणे दिसतात ते तज्ज्ञांकडून जाणून घ्या.

पायावरील लाल खुणा (Red marks near the feet are symptoms of liver damage)

हेल्थलाइनच्या बातमीनुसार, लिव्हर निकामी झाल्यास पायाजवळ लाल रंगाचे डाग दिसू लागतात. या खुणा गुडघ्याच्या खाली आणि पायाच्या वर दिसून येतात. पायात दिसणाऱ्या या खुणा दुर्लक्ष करू नका. या खुणा लाल रॅशेस सारख्या दिसतात.

पायांवर सूज येणे (Swelling in the feet)

पायाला सूज येणे हे लिव्हर खराब झाल्याचे लक्षण आहे. जेव्हा शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात तेव्हा शरीराच्या खालच्या भागात सूज येऊ लागते. या समस्येला पेरिफल एडेमा म्हणतात, ज्यामुळे पायांवर सूज येते. पायांवर दीर्घकाळ सूज येणे हे लिव्हर निकामी होण्याचे लक्षण आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नका.

( हे ही वाचा: लघवीद्वारे खराब युरिक ॲसिड सहज बाहेर पडेल? फक्त पाणी पिण्याची ‘ही’ योग्य पद्धत जाणून घ्या)

पायात निळ्या शिरा (blue veins in the legs)

पायांमध्ये दिसणार्‍या नसा निळ्या दिसणे हे लिव्हर निकामी होण्याचे लक्षण असू शकते. लिव्हरमध्ये काही समस्या असल्यास या नसा निळ्या पडतात.

त्वचा क्रॅक होणे (Cracked skin)

तुम्हाला माहीत आहे की टाचांना वारंवार भेगा पडणे हे देखील लिव्हर खराब होण्याचे लक्षण आहे. शरीरात व्हिटॅमिन बी३, ओमेगा-३ आणि ओमेगा-६ च्या कमतरतेमुळे टाचांमध्ये ही समस्या सुरू होते. टाचांना वारंवार भेगा पडत असतील तर शरीरातील या आवश्यक पोषक तत्वांची कमतरता पूर्ण करणे गरजेचे आहे. या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे लिव्हरचे आरोग्य बिघडते.

पायाच्या तळव्यावर खाज येणे

पायाच्या तळव्याला वारंवार खाज येणे हे लिव्हर निकामी होण्याचे लक्षण आहे. फॅटी लिव्हर आणि लिव्हर सिरोसिस सारख्या समस्यांमुळे पायाच्या तळव्याला खाज सुटू लागते. जेव्हा शरीरातून टॉक्सिन बाहेर पडू शकत नाही, तेव्हा पायांमध्ये खाज सुटण्याची समस्या उद्भवते.