scorecardresearch

लघवीद्वारे खराब युरिक ॲसिड सहज बाहेर पडेल? फक्त पाणी पिण्याची ‘ही’ योग्य पद्धत जाणून घ्या

How To Drink Hot Water in Uric Acid Problem: युरिक ॲसिड नियंत्रित करण्यासाठी पाणी पिण्याची योग्य पद्धत माहीत असणे गरजेचे आहे.

लघवीद्वारे खराब युरिक ॲसिड सहज बाहेर पडेल? फक्त पाणी पिण्याची ‘ही’ योग्य पद्धत जाणून घ्या
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

युरिक ॲसिड हे रक्तामध्ये आढळणारे एक प्रकारचे टॉक्सिन आहे जे प्रत्येकाच्या शरीरात तयार होते. युरिक ॲसिड तयार होणे ही एक समस्या आहे जी प्युरिन नावाच्या रसायनाच्या विघटनाने उद्भवते. प्रत्येकाच्या शरीरात युरिक ॲसिड तयार होते आणि ते रक्तात विरघळते. किडनी हे यूरिक ॲसिड फिल्टर करते आणि लघवीद्वारे शरीराबाहेर काढून टाकते. आहारात प्युरीनचे जास्त सेवन केल्याने रक्तातील यूरिक ॲसिडची पातळी वाढू लागते. जेव्हा शरीरात यूरिक ॲसिडचे प्रमाण वाढू लागते तेव्हा ते सांध्यांमध्ये क्रिस्टल्सच्या रूपात जमा होऊ लागते आणि त्यामुळे वेदना होतात.

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनवर प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, रक्तातील यूरिक ॲसिडचे उच्च प्रमाण किडनीसोबत अनेक अवयवांना नुकसान पोहोचवू शकते. उच्च यूरिक ॲसिड पातळी गाउटचा धोका वाढवते. युरिक ॲसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी प्युरीन आहार टाळा आणि पाण्याचे जास्त सेवन करा. तुम्हाला माहिती आहे की जास्त पाणी प्यायल्याने युरिक ॲसिड सहज नियंत्रित करता येते.

आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ.भूषण यांच्या मते, पाण्याचे सेवन केल्याने युरीक ॲसिड लघवीद्वारे अगदी सहजपणे निघून जाते. काही खास पद्धतीने पाण्याचे सेवन करून युरिक ॲसिड सहज नियंत्रित करता येते. यूरिक ॲसिड नियंत्रित करण्यासाठी पाण्याचे सेवन कोणत्या मार्गांनी करावे हे जाणून घेऊया तज्ञांकडून.

पाणी उकळून प्या

पाणी पाणी उकळून प्यायल्यास युरिक ॲसिड सहज नियंत्रित करता होते. जर तुम्हाला पाणी औषध म्हणून वापरायचे असेल तर एका कढईत एक ग्लास पाणी टाकून ते पाणी अर्धे होईपर्यंत उकळवा. हे पाणी पायात येणाऱ्या वातावर उत्तम औषध आहे.

( हे ही वाचा: खराब कोलेस्टेरॉल हृदयापर्यंत पोहोचताच येऊ शकतो हार्ट अटॅक; ‘हे’ ४ पदार्थ आतड्यांमधून कोलेस्ट्रॉल बाहेर काढून टाकतील)

दिवसातून दोन ते तीन वेळा अशाप्रकारे गरम पाण्याचे सेवन केल्याने युरिक ॲसिड वितळेल आणि ते लघवीद्वारे शरीरातून सहज निघून जाईल. जर यूरिक ॲसिडची पातळी जास्त वाढली असेल तर गरम पाणी पिण्याची ही पद्धत उपयुक्त ठरेल. पाण्याचे सेवन करून तुम्ही सहजपणे युरिक ॲसिड नियंत्रित करू शकता.

कोमट पाण्यासोबत हळद आणि व्हिनेगरचे सेवन करा

जर यूरिक ॲसिडची पातळी जास्त वाढत असेल तर हळद आणि सफरचंदाचा व्हिनेगर कोमट पाण्यासोबत घ्या. हळद आणि सफरचंदाचा व्हिनेगर युरिक ॲसिड वितळवून ते शरीरातून लघवीद्वारे काढून टाकते. हळद आणि व्हिनेगर गरम पाण्यात मिसळून वापरल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीराला फायदा होतो.

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 12:25 IST

संबंधित बातम्या