lung damage in children and teens with Long Covid : एका नवीन आभ्यासात ‘लाँग कोविड’ने ग्रस्त असलेली लहान मुले आणि किशोरवयीन तरूणांच्या फुफ्फुसांमध्ये मोठ्या प्रमाणात विकृती (Lung Abnormalities) दिसून आल्याचे समोर आले आहे. रेडिएशन किंवा कॉन्ट्रास्ट डाईजची (contrast dyes) आवश्यकता नसलेल्या PREFUL एमआरआय या प्रगत तंत्राचा वापर करून ही माहिती सादर करण्यात आली आहे. या अभ्यासासंबंधीचे निष्कर्ष रेडिओलॉजी या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत.

कोविडनंतर फुफ्फुसांच्या समस्या जाणवत असलेल्या प्रौढ व्यक्तींच्या फुफ्फुसांना झालेले नुकसान मोजण्यासाठी छातीचे स्कॅन केले जाते. मात्र लाँग कोविड असलेल्या मुलांबाबत हे स्कॅन साधारणपणे वापरले जात नाहीत. कारण यामुळे तरुण रुग्णांना रेडिएशनचा धोका असतो आणि त्यांना इंट्राव्हेनस कॉन्ट्रास्ट एजंट्सची आवश्यकता असते, जे त्यांच्यासाठी अस्वस्थ करणारे आणि नियंत्रणाच्या बाहेर जाणारे असू शकते. यामुळे मुलांच्या बाबतीत लंग परफ्यूजन किंवा फुफ्फुसातून रक्त आत आणि बाहेर कसे जाते-येते याबद्दल माहिती घेणे कठीण जाते.

लाँग कोविड असलेल्या लहान मुलांमध्ये आणि किशोरवयीन मुलांच्या प्रगत एमआरआ स्कॅनमध्ये फुफ्फुसात मोठ्या प्रमाणात विकृती आढळून आल्या आहेत. हे प्रगत एमआरआय तंत्र फ्री-ब्रेथिंग फेज-रिझोल्ड फंक्शनल लंग (PREFUL) या नावाने ओळखले जाते. या अभ्यासाचे निष्कर्ष काल रेडिओलॉजी या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत.

PREFUL एमआरआय म्हणजे, फ्री-ब्रेथिंग फेज-रिझोल्ड फंक्शनल लंग एमआरआय. पारंपारिक एमआरआयच्या उलट PREFUL एमआरआय मध्ये डॉक्टरांना मुलांचे श्वसन सामान्यपणे सुरू असताना देखील फुफ्फुसे स्कॅन करता येते. तसेच हे पूर्णपणे रेडिएशन-फ्री असून यामध्ये कोणत्याही कॉन्ट्रास्ट डाईची आवश्यकता नसते, ज्यामुळे हे कमी वयाच्या रुग्णांसाठी अधिक सुरक्षित ठरते.

या अभ्यासासाठी २७ लाँग कोविड असलेले आणि २७ लाँग कोविड नसलेल्या एकूण ५४ जणांनी सहभाग घेतला होता. एप्रिल २०२२ ते एप्रिल २०२३ पर्यंत त्यांचे PREFUL केले गेले. अभ्यासात सहभाही झालेल्या अर्ध्या लोकांना लाँग कोविड होता, तर उर्वरित अर्ध्या लोकांना असा काही त्रास नव्हता. या सहभागींचे सरासरी वय १५ वर्षे होते. एमआरआयनमध्ये रिजनल व्हेंटिलेशन (ऑक्सिजन प्रवाह), फ्लो-व्हॉल्युम लूप कोरिलेशन मेट्रिक (FVL-CM), क्वांटिफाइड परफ्यूजन (रक्त प्रवाह), व्हेंटिलेशन आणि परफ्यूजन डिफेक्ट टक्केवारी आणि व्हेंटिलेशन-परफ्यूजन गुणोत्तरांचे मोजमाप केले गेले.

आभ्यासात काय दिसून आले?

दरम्यान या स्कॅनमधून असे दिसून आले की लाँग कोविड असलेल्या मुलांमध्ये आणि किशोरवयीन तरुणांच्या फुफ्फुसांना इजा झाल्याची चिन्हे स्पष्ट दिसून आली आहेत. विशेष म्हणजे स्टँडर्ड चाचण्यांमध्ये ही चिन्हे आढळून आली नव्हती. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये रक्त प्रवाह (परफ्यूजन) कमी झाला होता आणि व्हेटिलेशन-परफ्यूजनमध्येही विसंगती दिसून आली, म्हणजेच याचा अर्थ असा की फुफ्फुसांमधील काही भाग हवेचा प्रवाह आणि रक्तचा प्रवाह योग्य पद्धतीने बॅलेन्स करत नव्हता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाँग कोविड म्हणजे काय?

करोनामुक्तीनंतरही करोनाची लक्षणे रुग्णांमध्ये चार ते १२ आठवड्यांपर्यंत दिसू शकतात. काही प्रकरणांमध्ये हा कालावधी अधिक असू शकतो, असं डॉक्टर सांगतात. या लक्षणांमुळे अनेकदा करोनावर मात केलेल्या रुग्णांना पुन्हा एकदा आपल्याला करोनाचा संसर्ग झाला की काय असं वाटू लागतं. या अशापद्धतीच्या आजारपणाला पोस्ट कोव्हिड सिंड्रोम किंवा लाँग कोविड असे म्हणतात.