केरळ राज्यातील कुट्टीअडी नावाचे छोटे शहर, पश्चिम घाटात उतारावर वसलेले. मागील दहा बारा दिवसांपासून या गावात शोककळा पसरली आहे. निपा आजाराने इथे पुन्हा डोके वर काढले आहे. कोझिकोडे याच जिल्ह्यात निपा पुन्हा पुन्हा का येतो आहे, हे ही एक अजूनही न सुटणारे कोडे आहे. २०१८ पासून केरळ राज्यातील निपाचा हा चौथा उद्रेक आहे. २०१८ च्या मे जून मध्ये झालेला उद्रेक सर्वाधिक गंभीर म्हटला पाहिजे कारण या उद्रेकात २३ रुग्णांपैकी २१ रुग्ण मृत्युमुखी पडले. त्यानंतरचे दोन उद्रेक तुलनेने लहान स्वरूपाचे होते. जून २०१९ मध्ये केवळ एक रुग्ण आढळला आणि तोही बरा झाला. २०२१ मध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला. आता या वर्षी मागील पंधरा एक दिवसात तिथे ६ रुग्ण आढळून आले आहेत आणि त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे.

निपा आजार नेमका काय आहे?

Shukra Gochar in Mesh
२४ तासांनी ‘या’ ६ राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी? शुक्रदेवाच्या कृपेमुळे व्यापारात होऊ शकतो मोठा फायदा
Before Going For Evening Gym Beetroot juice or coffee Which Drink is better For Your Health Read What Experts Said
जिमला जाण्यापूर्वी ‘या’ वेळेत करा बीटाच्या रसाचे सेवन; स्नायू राहतील मजबूत, वाचा तज्ज्ञ काय म्हणतात
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार
diy best safe summer travel tips and tricks health tips for summer vacation
उन्हाळ्याच्या सुटीत कुटुंबासह फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? मग जाताना ‘या’ चार गोष्टी आठवणीने बरोबर घ्या

निपा हा एक विषाणूजन्य आजार आहे. तो प्राण्यांपासून माणसाला होत असल्यामुळे त्याला झुनोटीक किंवा प्राणीजन्य आजार असेही म्हणतात. फ्रूट बॅट्स किंवा मुख्यत्वे फळांवर जगणा-या वटवाघुळामार्फत तो पसरतो. वटवाघुळांनी खाऊन पडलेली फळे खाल्ल्याने किंवा ज्या विहिरीत वटवाघुळांचा रहिवास आहे त्या विहिरीचे पाणी प्यायल्यामुळे तसेच ज्या झाडांच्या बुंध्यावर वटवाघुळांनी टोच्या मारल्या आहेत अशा खजूर किंवा ताडीच्या झाडांचा रस प्यायल्यामुळे हा आजार होऊ शकतो.

ज्या मलेशियामध्ये या आजाराचा पहिला उद्रेक १९९९ मध्ये आढळला तिथे तो वराह पालन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये डुकरांमार्फत पसरला. वटवाघुळांनी टाकलेले उष्टावलेल्या अन्नातून डुकरांना प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे मलेशियातील या भागात निपा आजाराची मोठ्या प्रमाणावर लागण झाली. मलेशियातील ज्या गावांमध्ये सर्वप्रथम हा आजार पसरला त्या गावाच्या सुंगाई निपाह या नावावरूनच या आजाराला निपा हे नाव पडले. या आजाराची लागण संसर्ग झालेल्या एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या शरीरस्त्रावापासून होऊ शकते शकते. रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना याची लागण होऊ शकते.

या आजाराबाबत अशी काही माहिती असली तरीही कोझीकोडे या केरळमधील जिल्ह्याच्या नावाप्रमाणे हा आजार नेमका कसा पसरतो आणि आत्तापर्यंत चारही वेळा तो कोझीकोडे या जिल्ह्यातच कसा काय पसरला, नेमका कशाप्रकारे वटवाघुळांमार्फत तो माणसांपर्यंत येतो, याबाबत अनेक प्रश्न अनुत्तरीत आहे आणि म्हणून या आजाराचे कोडे पूर्ण सुटले आहे,असे नाही.

बांगला देशात या आजाराचे अनेक उद्रेक झाले आहेत. भारतात या पूर्वी पश्चिम बंगाल मध्ये सिलीगुडी आणि नाडिया जिल्ह्यात या आजाराचा उद्रेक झाला होता. मात्र केरळमध्ये मागील पाच वर्षात चार वेळा म्हणजे जवळपास दरवर्षी या आजाराचा उद्रेक होताना दिसतो आहे.

निपा आजारात रुग्णाला तीव्र ताप येतो, खोकला ,श्वास घ्यायला त्रास होणे, थकवा, स्नायुदुखी आणि श्वसनास त्रास होऊन न्युमोनिया सारखी लक्षणे दिसू लागतात. याशिवाय झटके येणे, बेशुद्धी अशी लक्षणे या आजारात दिसतात. हा आजार अत्यंत गंभीर आहे. मृत्यूचे प्रमाण ४० ते ७५ टक्के आहे.

आणखी वाचा: डॉक्टर बाबासाहेब आणि सार्वजनिक आरोग्य

निपा आजाराच्या या ताज्या उद्रेकाने काही महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा पृष्ठभागावर आले आहेत.

(१) वन हेल्थ संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची आवश्यकता : नव्याने होणाऱ्या उद्रेकात सुमारे ७० टक्के आजार हे प्राणीजन्य आहेत. प्राणी, मानव आणि आपले पर्यावरण या तिन्ही घटकांचे आरोग्य एकमेकावर अवलंबून आहे, हा वन हेल्थचा अर्थ. निपा जवळपास दरवर्षी केरळ मधील विशिष्ट भागातच का येतो आहे, याची कारणे शोधण्यासाठी पशुसंवर्धन, वन विभाग, पर्यावरण यांच्या समन्वयाने आपल्याला वटवाघुळांचे सर्वेक्षण युद्ध पातळीवर हाती घ्यावे लागेल कारण फ्रूट बॅट्स भारतात सर्वत्र आहेत पण निपा केवळ केरळ मधील एक दोन जिल्ह्यातच का आढळतो आहे याचे उत्तर शोधणे या आजारावरील प्रभावी नियंत्रणासाठी आवश्यक आहे . या आजाराच्या प्रसाराचा नेमका कालावधी कोणता, या बाबतही निश्चितता नाही. वटवाघुळांच्या प्रजनन काळात म्हणजे डिसेंबर ते मे या कालावधीत या आजाराचा प्रसार होत असावा हे निरीक्षण अलिकडील उद्रेकातून चुकीचे असल्याचे लक्षात येते आहे. प्राण्यांमधील सर्वेक्षणातून निपा उद्रेकाचे सतर्कतेचे इशारे वेळेत मिळाले तर संभाव्य उद्रेक टाळण्यास मदत होऊ शकते. सार्वजानिक आरोग्य ,पशुसंवर्धन वनविभाग, पर्यावरण विभाग या सर्वांनी समन्वयाने काम करत एकमेकांकडील माहिती परस्परांना वेळेत शेअर केली तरच हे शक्य होणार आहे

(२) प्रशिक्षित साथरोगशास्त्रतज्ञ मनुष्यबळ उपलब्धता : वातावरणातील बदल आणि वाढते दळणवळण यामुळे विविध भौगोलिक भागातील संसर्गजन्य आजार नव्या भूप्रदेशात प्रवेश करत आहेत. आपल्या समाजातील साथरोग नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षित साथरोगतज्ञांची गरज आहे. आपल्याला भविष्यातील साथरोग नियंत्रणासाठी हे मनुष्यबळ निर्माण करणे आवश्यक आहे. या सोबतच प्रत्येक राज्यात साथरोग सर्वेक्षण व्यवस्था अधिकाधिक बळकट करणे, देखील काळाची गरज आहे. विशेषत: या संदर्भात एन आय व्ही सारख्या प्रयोगशाळा ही अनेक राज्यांची गरज आहे.

(३) पर्यावरणीय बदलाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज : आपण विकासाच्या नावावर मोठ्या प्रमाणावर जंगलतोड करुन प्राण्यांच्या अधिवासावर आक्रमण करत आहोत. त्याची किंमत म्हणूनच निपासारख्या आजाराला आपण तोंड देतो आहोत. या आजाराच्या प्रसारास कारणीभूत असणारी वटवाघळे फळांवर गुजराण करतात पण

जंगलतोड, व्यापारी हेतूने केलेली रबराची लागवड यामुळे या वटवाघळांना जंगलात फळझाडे न मिळाल्याने ती मानवी वस्तीत येतात, हे अनेक तज्ज्ञ सांगत आहेत. या सर्व बाबींचा विचार करून शाश्वत विकासाची वाटचाल आपल्याला करावी लागेल.

आणखी वाचा: Health Special: स्वच्छ हवा ,आरोग्याचा ठेवा

तुम्ही आम्ही काय करावे?

सध्याचा निपा उद्रेक हा कोझीकोडे या एका जिल्ह्यात आहे. त्यामुळे आपण इकडे घाबरून जाण्याची गरज नाही. आपण फळे खाणे बंद करण्याची आवश्यकता नाही. फळे ,भाज्या स्वच्छ धुवून घेणे नेहमीसाठी आवश्यक आहे, हे मात्र निश्चित.

महत्त्वाचे म्हणजे आपले आरोग्य सांभाळणे हे आवश्यक आहे. निपा असो नाहीतर कोविड किंवा स्वाइन फ्लू कोणत्याही आजारात गंभीर आजार निर्माण होऊन मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक असते ते ज्यांना अति जोखमीचे आजार आहेत अशा व्यक्तींना. त्यामुळे आपण प्रत्येकाने नियमित व्यायाम , चौरस संतुलित आहार याच्या आधारे आपले मधुमेह उच्च रक्तदाब, स्थूलत्व हे आणि यासारखे आजार नियंत्रणात ठेवले पाहिजे. साथ कोणत्याही आजाराची आली तरी आपले आरोग्य चांगले असेल तर आपण त्याला समर्थपणे तोंड देऊ शकतो.

आणि महत्त्वाचे म्हणजे केरळमध्ये उद्रेक सुरू आहे म्हणून प्रत्येक केरळी माणसाकडे संशयाने पाहण्याची गरज नाही. अनेकांनी मागील उद्रेकावेळी गावी सुट्टीवर गेलेल्या आपल्या केरळी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेतले नाही, त्यांनी निपासाठी टेस्ट करून तिचा रिपोर्ट सादर करावा, असा वेडा आग्रह धरला. हे आपण टाळले पाहिजे.

आपल्या तथाकथित विकासाच्या फांदीला निपाचे हे वटवाघुळ उलटे लटकते आहे. असे उद्रेक टाळायचे असतील तर शाश्वत विकासाच्या दिशेने आपणा सर्वानाच दोन पावले टाकावी लागतील.