“हळू हळू गुलाबी थंडी पडू लागली. मंद झुळूक वाहत होती आणि सकाळी लवकर जाग आली. मन प्रसन्न झालं. तेवढ्यात एक सुंदर गाणे कुठून तरी ऐकू आलं आणि आनंदातच अंथरुणातून उठलो.”

“माझ्या मुलीने खरंच खूप प्रयत्न केले. सी. ए. झाली! इतका आनंद झाला आहे म्हणून सांगू!”

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
There is no end to the songs of Dalits
गीतांचा भीमसागर… : दलितांच्या सुरांना अंत नाही!
swanand kirkires article on kumar gandharv
आठवणींचा सराफा: गुरू तो सारिखा कोई नाही…
lokrang article, book review, ekla chalo re, Autobiographical book, sanjeev sabnis, loksatta,
सकारात्मक आत्मकथन

“गेल्या काही दिवसांपासून मी खूप आनंदात आहे. माझा मुलगा, सून, नातवंडे सगळे अमेरिकेतून आले आहेत. किती दिवसांनी सगळे एकत्र आहोत घरात! मनात आनंद मावेनासा झाला आहे.”

आपण कधी आनंदात असतो, कधी दुःखात असतो. कधी काही क्षण मनाला आनंद होतो, काही वेळेस दिवसभर आपण आनंदात राहतो; कधी कधी काही दिवस आपण आनंदात डुंबतो! आनंद, दुःख याच्याबरोबर इतरही अनेक भावना आपल्या मनात निर्माण होत असतात आणि या भावनांचे चढउतार सतत सुरू असतात.

पण काही वेळेस आपल्याला अशी काही माणसे भेटतात, जी कायम आनंदी असतात. म्हणजे त्यांच्या आयुष्यात काही प्रतिकूल घडत नाही, असे अजिबातच नाही. किंबहुना, संकटे आली, परिस्थिती बदलली, तरीही त्यांची वृत्ती ही आनंदी राहते. चेहऱ्यावर प्रसन्न भाव, लोकांशी वागण्यामध्ये एक सहजता आणि माया, विचार आणि बोलणे अतिशय सकरात्मक आणि त्यामुळे वागणेही तसेच! आमच्या सुमाताई अशा आहेत! आता ७५ वर्षांच्या झाल्या. अनेक वर्षे घरच्या व्यवसायात लक्ष घातले, त्यातले चढ उतार सोसले, चाळीस वर्षांत दोन वेळा पतीची बायपास सर्जरी झाली, तितकीच वर्षे त्यांना असलेल्या डायबिटीसची त्यांनी कायम काळजी घेतली, स्वतःला मेंदूत रक्ताची गाठ फुटून रक्तस्राव झाला, ते मोट्ठे आजारपण निस्तरले, कोविडच्या काळात आपण आणि पती दोघांची तब्येत नीट राहावी यासाठी सतत जागरूक आणि प्रयत्नशील राहिल्या! शिवाय नातवंडांना सांभाळायला, शिकवायला कायम तयार! या वयात वेगवेगळे छंद जोपासण्याचा उत्साह दांडगा. प्रत्येकाला प्रोत्साहन द्यायचे, दुसऱ्याचे हित चिंतायचे, कोणाच्याही अडचणीला मदत करायला तत्पर राहायचे, आपल्याला नवीन काही शिकायला मिळाले तर ते ज्ञान इतरांना अवश्य सांगायचे! अशा कितीतरी गोष्टी. तरीही वास्तववादी, स्वतःचे गुण दोष जाणणाऱ्या आणि परिस्थिती स्वीकारणाऱ्या! त्या नुसत्या येताजाता भेटल्या तरी मनात आनंद होतो आणि आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य येते.

हेही वाचा… Health Special : मस किंवा चामखीळ स्किन कॅन्सरचं लक्षण आहे का?

स्वाभाविक प्रश्न असा निर्माण होतो की क्षणिक किंवा तात्पुरता आनंद आपल्या सगळ्यांनाच अनुभवला येतो, पण असे कायम आनंदी राहणे, समाधानी असणे आणि वृत्तीच आनंदी बनणे हे कसे सध्या करता येते? हे नव्याने शिकता येते की जन्मतःच कोणी आनंदी तर कोणी दुःखी वृत्तीचे असते?

‘आनंदी जीवन’, ‘आनंदी वृत्ती’ हा गेल्या काही वर्षातील संशोधनाचा मोठ्ठा विषय राहिला आहे. प्रत्येकालाच आपल्या जीवनात आनंद मिळवायचा आहे आणि म्हणून हा आनंदाचा शोध! अशी काही गुरुकिल्ली किंवा पासवर्ड आहे का की हे पासवर्ड घातल्यावर आपले आयुष्य आनंदमय होईल?

मुळात आनंद म्हणजे काय? आनंद ही तात्पुरती भावना नाही, ती अधिक सखोल सकारात्मक भावना आहे. यात विशेष नकारात्मकता नाही आणि आपल्या आयुष्याविषयी मनात खूप समाधान आहे अशी स्थिती म्हणजे आनंद. जीवनातला अर्थ सापडला की आनंद क्षणिक राहत नाही, तो कायम स्वरूपी राहतो.

आनंदी वृत्ती सुद्धा काही प्रमाणात अनुवांशिक असते. तर काही प्रमाणात घडणाऱ्या घटना, आजूबाजूची परिस्थिती, त्या परिस्थितीचे, घटनांचे आपण आकलन कसे करतो, त्यांना काय अर्थ देतो यावर अवलंबून असते. याचा अर्थ काही जणांमध्ये आनंदी वृत्ती उपजतच असते, तर बाकीच्यांना आनंदी होण्याचा मार्ग शोधावा लागतो. आनंदी बनणे आपल्या हाती असू शकते आणि ते शिकता येते. आनंदाबरोबरच दुःख, राग, मत्सर अशा अनेक भावनांची आंदोलने मनात सुरू असतात, पण जर मनातली सखोल समधानाची, आनंदाची भावना कायम असेल, तर मनाचा लवचिकपणा (resilience) या सगळ्या आंदोलनांमध्येसुद्धा मनःस्थिती कायम ठेवायला, म्हणजे समाधानी ठेवायला मदत करतो. थोडक्यात काय तर आनंदाच्या वाटेवर चालायचे तर योग्य मार्ग सापडावा लागतो. काय आहे हा आनंदाचा पासवर्ड? पुढील लेखात पाहूया.