scorecardresearch

एपिलेप्सी आजार नेमका काय आहे? जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपाय

मेंदूशी संबंधित हा आजार असला तरी त्याचा इतर अवयवांवरही परिणाम होतो. परिणामी इतर आजार बळवण्याचा धोका वाढतो.

purple day Epilepsy awareness day 2023
एपिलेप्सी आजार (फोटो – जनसत्ता)

Purple Day of Epilepsy 2023 : फिट येणे, आकडी, मिरगी अशा नावांनी एपिलेप्सी अर्थात अपस्मार हा आजार ओळखला जातो. मेंदूशी संबंधित हा एक जुना आजार आहे. या आजारावर bs उपचार होऊ शकतात. परंतु औषधांनी बरा न झाल्यास शस्त्रक्रिया करून बरा करता येतो. बदलती जीवनशैली, अपुरी झोप, तणाव, असंतुलित आहार यामुळे एपिलेप्सी आजाराचा धोका वाढतो. यामुळे एपिलेप्सी आजाराबाबत जगजागृती करण्यासाठी दरवर्षी २६ मार्च हा पर्पल डे ऑफ एपिलेप्सी म्हणून साजरा केला जातो. जगभरात हा ४ क्रमांकावरील एक सामान्य आजार आहे.

जगभरातील ५० मिलियन लोकांवर एपिलेप्सीचा परिणाम होत आहे. दरवर्षी अंदाजे ५ मिलियन लोकांना एपिलेप्सीचे निदान होत आहे. तर भारतात १० मिलियनपेक्षा जास्त रुग्णांना एपिलेप्सीचे निदान केले जाते, म्हणजे जगभरातील ५० मिलियन रुग्णांपैकी २० टक्के रुग्ण एकट्या भारतात आहेत.

एपिलेप्सी म्हणजे काय

एपिलेप्सी हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, ज्यात मेंदूवर दीर्घकालीन परिणाम होतात. ज्यामुळे रुग्णाला कोणतीही पूर्वकल्पना न मिळता अचानक झटका येतो. बऱ्याचदा रुग्णाची शुद्ध हरपते. फिट येणे हे या आजाराचे प्राथमिक लक्षण आहे. यात अनेकदा रुग्णाची स्मरणशक्ती कमी होऊ शकते. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला हा आजार होऊ शकतो.

एपिलेप्सीची लक्षणे

१) शुद्ध हरपणे
२) स्नायूंचा ताठरपणा
३) अचानक खाली कोसळणे
४) हाता- पायांना मुंग्या येणे
५) डोळे, कान, चव यांच्या ज्ञानेंद्रियांवर परिणाम होणे
६) भीती वाटणे, मूड बदलने

वैद्यकीयदृष्ट्या इंट्रॅक्टेबल एपिलेप्सी हा एपिलेप्सीचा एक गंभीर प्रकार आहे, जो औषधाने नियंत्रित केला जाऊ शकत नाही. या प्रकारच्या एपिलेप्सी झालेल्या लोकांना दररोज अनेकदा फिट येऊ शकते, ज्यामुळे त्यांच्या जीवनाच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. या प्रकारच्या आजारावर शस्त्रक्रिया किंवा प्रत्यारोपणाचा समावेश असू शकतो.

एपिलेप्सी आजार टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल करा

एपिलेप्सी आजाराचे व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे महत्त्वाचे आहेत. यासाठी दररोज पुरेशी झोप मिळायला हवी. थकवा हा या आजारातील सर्वात सामान्य ट्रिगर मानला जातो. झोपेत व्यत्यय आल्याने मेंदूचे आरोग्य खराब होण्याचा धोका वाढतो. तसेच ड्रग्ज आणि अल्कोहोलचा वापर टाळा पाहिजे, कारण एपिलेप्सी असलेल्या रुग्णांमध्ये हे फिट येण्याचे कारण बनू शकते. निरोगी राखण्यासाठी तुम्ही भावनिक ताण कमी केला पाहिजे. नियमित व्यायाम केल्या तुम्हाला या आजाराचा धोका कमी होतो. परंतु व्यायाम करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हा आजार टाळण्यासाठी काय कराल?

१) दररोज पुरेशी झोप घ्या, आराम करा.
२) नियमित व्यायाम करा.
३) दारु, सिगारेट, ड्रग्जचे सेवन टाळा.
४) दिनचर्या एका डायरीत नोंद करा.
५) संतुलित आहार घ्या.
६) तणाव व्यवस्थापित करा
७) कोणतीही औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
८) टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युट पाहणे कमी करा.
९) तुमच्या आजाराची इतरांना माहिती द्या.
१०) वारंवार हेल्थ चेकअप करा.

एपिलेप्सीचा झटका आलेल्या रुग्णाला कशी मदत कराल?

१) एपिलेप्सीचा झटका आलेल्या व्यक्तीला तात्काळ सुरक्षित ठिकाणी घेऊन जा. अन्यथा तिला दुखापत होऊ शकते.

२) शक्य झाल्यास झटका आलेल्या व्यक्तीच्या डोक्याखाली पटकन काहीतरी मऊ उशी, जॅकेट ठेवा.

३) ती व्यक्ती कोसळत असल्याचे जाणवल्यास पटकन तिचे शरीर व्यवस्थित पकडण्याचा प्रयत्न करा. अनेकदा या व्यक्ती अशास्थितीत पडतात ज्यात त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो.

४) त्या व्यक्तीला केव्हा झटका आला, कितीवेळ होता याची नोंद घ्या. ही माहिती वैद्यकीय उपचारासाठी गरजेची असते

५) झटका येत असल्याचे दिसल्यास त्या व्यक्तीला रोखण्याचा प्रयत्न करु नका किंवा त्याचं तोंड दाबून ठेवण्याचा प्रयत्न करु नका.

६) झटका आलेली व्यक्ती पूर्णपणे सावध अथवा शुद्धीवर येईपर्यंत तिच्यासोबत रहा.

आजाराची कारणे

१) मेंदूला झालेली दुखापत
२) गंभीर आजार
३) मेंदूला ऑक्सिजन पुरवठा कमी होणे
४) मेंदूत गाठी होणे, स्मृतीभ्रंश
५) एचआयव्ही, एड्स
६) ड्रग्ज, दारूस, सिगारेटचे सेवन
७) झोप न लागणे
८) आजारपण, ताप, तणाव
९) विशिष्ट औषधांचे सेवन
१०) वेळी अवेळी जेवणे, जेवण स्किप करणे

एपिलेप्सी आजाराची वेळीच लक्षणे ओळखून विलंब न करता त्वरीत उपचार घेणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 10:11 IST

संबंधित बातम्या