चातुर्मास्यामध्ये कडधान्ये टाळावीत असा स्पष्ट संकेत धर्मशास्त्रांनी तरी दिलेला आहे. (श्रीस्कंदमहापुराणम्‌ २.२.३६.३४-४५) आयुर्वेदाचा दृष्टिकोन लक्षात घ्यायचा असेल तर मोड आलेली कडधान्ये पावसाळ्यात खाऊ नयेत असे आयुर्वेदशास्त्र म्हणते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कडधान्ये पचायला खूप जड आहेत.(वाचकांना कदाचित माहित नसेल की एकवेळ माणूस कच्चे मांस पचवू शकेल पण कच्चं कडधान्य पचणं तर दूर, चावणं सुद्धा माणसाला अशक्य आहे)


प्रावृट्‌ वा वर्षा या उभय ऋतुंमध्ये अग्नी मंद असल्याने कडधान्यांचे पचन होणे कठीण हे तर नक्की. त्यात कडधान्ये वातूळ आहेत म्हणजे शरीरामध्ये वायू वाढवतात (मुद्गवनमुद्गकलायमकुष्ठ…..वैदलाः׀ …..मरुत्कराः…..׀ ׀ सुश्रुत संहिता १.४६.२८) प्रावृट्‌ व वर्षा या उभय ऋतूमध्ये मुळातच वात वाढलेला असल्याने कडधान्ये खाऊन वायू वाढवण्यात काय हशील? असा विचार आयुर्वेदाने केलेला दिसतो. साहजिकच वात वाढल्यामुळे होणार्‍या पोटफुगी,पोटदुखी,सातत्याने ढेकर वा वारंवार अधोवायू सरणे,सांधेदुखी,अंगदुखी,शरीरामध्ये लचक वगैरे तक्रारींचा त्रास होत असताना किंवा होऊ नयेत म्हणून कडधान्ये टाळणे योग्य.

pune vegetable prices marathi news, pune vegetable prices today marathi news
पुणे : अवकाळी पावसाचा फळभाज्यांना फटका; हिरवी मिरची, घेवडा, मटारच्या दरात वाढ
Heat wave again in Vidarbha Akola recorded the highest temperature on Friday
विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट? जाणून घ्या, अकोल्यात पारा कुठे पोहचला
Recipes of raw mango mango sauce recipe in marathi
वाळवण विशेष! घरगुती मसाल्यासह बनवा कैरीचा वर्षभर टिकणारा सॉस; लहान मुलंही खातील आवडीनं
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू

आणखी वाचा: Health Special: पावसाळ्यात एसी आरोग्याला धोकादायक?
त्यात अधिक म्हणजे कडधान्ये पचनानंतर शरीरावर तिखट परिणाम दाखवतात, (वैदला….कटुपाका।सुश्रुतसंहिता १.४६.२७,२८) जे पित्तकारक होऊ शकते. वर्षा ऋतूमध्ये तसाही पित्तसंचय होत असल्याने कडधान्याचे सेवन करुन पित्त अधिक का वाढवा असा विचार आयुर्वेदाने केलेला आहे. स्वाभाविकरीत्या ज्यांना घशात,छातीत,पोटामध्ये जळजळ होते,आंबट,तिखट,कडू पित्त तोंडामध्ये येते किंवा तशी चव तोंडामध्ये जाणवते, कडधान्यांचे अपचन होऊन पित्त वाढल्याचा अनुभव येतो त्यांनी कडधान्ये खाऊ नयेत किंवा तारतम्याने खावीत. मात्र हा झाला शास्त्रविचार. शास्त्रापेक्षा कधी कधी व्यवहार वेगळा असतो किंवा करावा लागतो.
आणखी वाचा: Health Special: पावसाळ्यात उघड्यावरचे पदार्थ एवढे धोकादायक का?

पावसाळ्यात कधी असं होतं असं की सलग मुसळधार पाऊस पडल्यानंतर शेतांमध्ये पाणी शिरल्यामुळे भाज्या खराब होतात. पुरामुळे पुलांवरुन पाणी वाहू लागल्याने व रहदारीच्या रस्त्यांवर पाणी तुंबल्यामुळे भाज्यांचा पुरवठा करणार्‍या गाड्या येऊ न शकल्यामुळे लोकांना भाज्या मिळू शकत नाहीत. मिळाल्या तरी भाज्या सकस दिसत नाहीत, पालेभाज्या तर खराब झालेल्या मिळतात. श्रावण महिना सुरु असला की मांसाहार निषिद्ध असतो. अशावेळी घरात साठवून ठेवलेल्या कडधान्यांचा उपयोग करण्याची वेळ गृहिणीवर येते. अर्थात पावसाळ्यात जेव्हा दुसरा पर्याय उपलब्ध नसेल तेव्हा कडधान्यांची उसळ हाच कुटुंबीयांचे पोट भरण्याचा उत्तम मार्ग. मात्र त्यामध्येही काय व कसे तारतम्य ठेवता येईल हे समजून घेऊ.

कडधान्यांमधील आकाराने मोठी असलेली कडधान्ये पचायला अधिक जड आहेत. जसे- चणे,वाटाणे,पावटे, वाल, राजमां, छोले, सोयाबीन,इत्यादी. या कडधान्यांचा उपयोग भूक व पचनशक्ती मंद असलेल्या या पावसाळ्यात कटाक्षाने टाळावा. रात्री तर अजिबात खाऊ नयेत. ही जड कडधान्ये रात्री खाल्ल्यानंतर ’वरचा श्वास वर आणि खालचा खाली’ अशी भयंकर स्थिती झाल्याची अनेक उदाहरणे माझ्या पाहण्यात आहेत. कडधान्यांमधील मूग,मटकी,तूर,मसूर,कुळीथ ही आकाराने लहान असलेली कडधान्ये पचायला (तुलनेने) हलकी आहेत. यांचा उपयोग पावसाळ्यात करता येईल. यांची उसळ तयार करताना गरम मसाल्यांचा व कोकम,चिंच अशा आंबट पदार्थांचा उपयोग करावा, जेणेकरुन त्यांचे पचन सुलभ होईल. महत्त्वाचे म्हणजे कडधान्ये व्यवस्थित शिजवावीत आणि चांगली नरम झाली आहेत हे लक्षात आल्यावरच जेवण्यास वाढावी.

कडधान्यांचा रुक्ष (रुक्षाः…शिम्बाः׀ ׀ सुश्रुत संहिता १.४६.३२) अर्थात कोरडेपणा वाढवणारा गुण बघून पावसामुळे सभोवतालचे वातावरण जलमय झालेले असताना, हवेतला ओलावा वाढलेला असताना कडधान्ये खाणे हितकारक. कडधान्यांचा कोरडेपणा हा एकान्तिक होऊ नये म्हणून शिजवताना तुपाची फोडणी द्यावी किंवा गरमगरम उसळीवर तूप घालून खावे. अशाप्रकारे तुपासह सेवन केलेली कडधान्ये ही शरीर विकृत करु शकणार्‍या वात-पित्त-कफ या तीनही दोषांचे शमन करतात हे विशेष. (त एव घृतसंयुक्तास्त्रिदोषशमनाः परम्‌׀׀सुश्रुत संहिता १.४६.४४,४५) महत्त्वाचे म्हणजे म्हणजे कडधान्यांचे सेवन करताना आणि जेवल्यावर पाऊण तासाने कढवून आटवलेले असे कोमट पाणी प्यावे. तितकंच महत्त्वाचं हे की भूक लागल्याशिवाय कडधान्ये खाऊ नयेत. तिखट-आंबट चवीची रुचकर उसळ या पावसाळ्यात कितीही खावीशी वाटली तरी आपल्या पोटाचा एक चतुर्थांश हिस्सा रिकामा राहिल इतपतच जेवावे.

पोटाचे तीनच हिस्से अन्नपाण्याने भरावे व एक हिस्सा मोकळा ठेवावा हा आरोग्य-सल्ला विशेषतः पाळला पाहिजे तो या पावसाळ्यात. कारण पावसाळ्यातल्या या दिवसांमध्ये अजीर्ण होऊ न देण्याचा कटाक्ष आयुर्वेदाने ठेवलेला आहे, हे विसरु नये. (…..अजीर्णं च वर्जेयत्तत्र यत्नतः।सुश्रुतसंहिता ६.६४.१३)