Home Remedies For  Kidney Health : आपल्या शरीरात किडनी हा अत्यंत महत्वाचा अवयव आहे. शरीरात असलेल्या अनावश्यक गोष्टी आणि पाणी युरीनद्वारे बाहेर फेकण्यास किडनी मदत करते. शरीर निरोगी राहण्यासाठी किडनीचं कार्य खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही किडनीच्या आरोग्यावर दुर्लक्ष केलं, तर तुम्हाला गंभीर आजारांना सामोरं जावं लागू शकतं. पण किडनी निरोगी असल्यास अनेक आजारांवर मात करता येऊ शकते. कधीतरी किडनीत काही पदार्थांचा साठा जमा होतो आणि ते पदार्थ लघवीद्वारे बाहेर फेकले जात नाहीत. ज्यामुळे मुतखड्यासारखी गंभीर समस्या उद्भवू शकते. पण आज आम्ही तुम्हाला किडनी निरोगी ठेवण्यासाठी काही घरगुती उपायांबद्दल माहिती देणार आहोत. ज्याचा तुमच्या आरोग्यासाठी जबरदस्त फायदा होऊ शकतो.

डॉ अमरेंद्र पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, किडनी इन्फेक्शन्स आणि मुतखड्याच्या समस्या सामान्य झाल्या आहेत. जी लोकं मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असलेल्या पदार्थांचं सेवन करतात आणि पुरेसं पाणी पित नाहीत. त्यांना किडनीच्या आजारांना सामोरं जावं लागू शकतं. मुतखड्याची समस्याही उद्भवू शकते. इतरही काही कारणांमुळे किडनीच्या इंफेक्शनची समस्या निर्माण होते. ज्यांना लठ्ठपणा, डायबिटीज आणि रक्त दाबाच्या समस्या आहेत, अशा लोकांना किडनी इन्फेक्शन आजार होऊ शकतात. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आहे. याला पायलोनेफ्रायटिस असं म्हणतात.

नक्की वाचा – Weight Loss : वजन झटपट कमी करायचंय ना? मग रोजच्या आहारात या सॅलडचा समावेश नक्की करा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खूप पाणी प्यायल्याने किडनी स्वच्छ होते?

डॉ अमरेंद्र पाठक सांगतात, ज्यांना मुतखड्याची समस्या आहे, अशा लोकांनी खडा लघवीद्वारे बाहेर पडण्यासाठी खूप जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात लोकांनी दररोज २ ते २.५ लिटर पाणी पिणे अत्यंत गरजेचं आहे. पाण्याचं प्रमाण वाढवून ३ लिटरही करु शकता. आरोग्य तज्ज्ञ सांगतात, जेव्हा एखादा व्यक्ती खूप दिवसांपासून पाण्याचं सेवन कमी करतो, अशांना मुतखड्याचा आजार होऊ शकतो. तसंच किडनीच्या इतरही आजारांचा धोका उद्भवू शकतो. किडनी निरोगी ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच गोळ्या औषधे घेतली पाहिजेत.

किडनी स्वच्छ कशी ठेवाल?

  • दररोज शरीराला आवश्यक असणाऱ्या पाण्याचं सेवन करा.
  • मांसाहार खाणे कमी करा.
  • डेअरी प्रोडक्ट्स खाण्याचे प्रमाण कमी करा.
  • रक्तदाब, साखर आणि वजनावर नियंत्रण ठेवा.
  • किडनीच्या आरोग्याला फायदेशीर ठरतील अशा पदार्थांचे आणि पाण्याचे सेवन करा
  • दररोज व्यायाम करा.
  • वेळोवेळी आरोग्याची चाचणी करा.