“मी गेल्या आठवड्यात आवळे आणून ठेवले पण सगळेच वाळून गेले”

“हे आवळे फ्रिजमध्ये पण टिकत नाहीत काय करायचं नेमकं”

pune lok sabha, rupali chakankar pune marathi news
पराभवाच्या भीतीने आणि नैराश्यातून रवींद्र धंगेकरांचे आरोप सुरू – रुपाली चाकणकर
Loksatta samorchya bakavarun opposition parties Prime Minister Narendra Modi campaign
समोरच्या बाकावरून: ‘५६ इंची छाती’च्या नेत्याने खोटे का बोलावे?
Anti-Rape Wears To Avoid Rape Cases:
Anti Rape Underwear काय काम करतात बघा; श्रीमंतीच्या वेडात उत्पादकांनी महिलांच्या ‘या’ प्रश्नांची उडवली खिल्ली
Counseling, Jealous, colleagues,
समुपदेशन : सहकाऱ्यांचा मत्सर करताय?
Review of Mahesh Elkunchwars play Aatmakatha
‘ती’च्या भोवती..! सामान्याकडून असामान्याकडे!
bihar man weds with mother in law
Video: जावयाचा सासूवर जडला जीव; सासऱ्याला कळताच लावले दोघांचे लग्न
constitution of india
लेखक अभ्यासक प्रा. आनंद रंगनाथन का म्हणाले, ‘घटनेत बदल आवश्यकच…’
ashok gehlot son vaibhav loksabha election
भाजपाने पेपर फुटी प्रकरणाचा मुद्दा तापवला, अशोक गहलोतांच्या कार्यकाळातील मुद्द्यामुळे सुपुत्र अडचणीत?

“आवळ्याचा ज्यूस करून ठेवला तोदेखील काळा पडला.”

आवळा आणि सफरचंद एकत्र करून ठेवलं चालतं का?

आवळा आणि आलं एकत्र करून ठेवलं तरी चालेल का?

आवळ्याबद्दलचा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर मला अनेक प्रश्न विचारले गेले होते. या प्रश्नांना अनुसरूनच आजचा लेख. आजच्या लेखांमध्ये बहुगुणी आवळ्याच्या साठवणीबद्दल थोडंसं.

हेही वाचा – दही की ताक? आरोग्यासाठी काय अधिक फायदेशीर? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात…

आवळा रोजच्या आहारात उपयुक्त असल्याचे आपण मागील लेखात वाचलं आहेच. सध्याच्या गुलाबी थंडीमध्ये त्वचेची, केसांची निगा राखण्यासाठी तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवळा अत्यंत गुणकारी आहे. हा आवळा आहारामध्ये कसा वापरावा त्यातील जीवनसत्व आणि इतर पोषणमूल्यांचा आहारात जास्तीत जास्त वापर करता येऊ शकेल याबद्दल आजच्या लेखात जाणून घेऊया.

हेही वाचा – न्यू इअर पार्टीत मद्यपानाचा भुर्दंड बसणार? हॉलिडे हार्ट सिंड्रोम टाळण्यासाठी काय कराल? वाचा डॉक्टरांचा सल्ला

१.माझी आई आवळा गुळांबा एकत्र करायची. चविष्ट आणि नेमका गोड असायचा आवळा…

आवळा साठवून ठेवताना त्यात तो भिजेल इतकं पाणी, २०० ग्रॅम आवळा, ३०० मिली पाणी, २० ग्रॅम गूळ, ५ ग्रॅम मीठ, असं मिश्रण एकत्र करावं. हे मिश्रण व्यवस्थित ढवळून एकत्र करावं. नंतर हवाबंद डब्यात ठेवून द्यावं.

२. आवळा बारीक किसून घ्यावा. १०० ग्रॅम आवळा, २५ ग्रॅम साखर, एक चमचा आमचूर पावडर हे सगळे मिश्रण एका बरणीमध्ये एकत्र करून ठेवावं.

३. दोनशे ग्रॅम गुळाचा पाक तयार करावा आणि या गुळाच्या पाकामध्ये दोनशे ग्रॅम आवळ्याच्या फोडी करून त्या मुरायला ठेवाव्यात.

४. एक लिटर पाण्यामध्ये २० ग्रॅम मिरी पूड जास्तीचं मीठ एकत्र करून त्यामध्ये आवळ्याच्या पातळ उभ्या फोडी करून किंवा जाड्या उभ्या फोडी हवाबंद डब्यात साठवून ठेवाव्यात.

५. १०० ग्रॅम आलं आणि १०० ग्राम आवळा साडेसातशे एमएल पाण्यामध्ये एकत्र करून भिजवून ठेवावा. भिजवताना त्यामध्ये एक चमचा धने पूड एक चमचा जिरे आणि एक चमचा मिरपूड असे मिश्रण एकत्र करावे.

६. दीड लिटर पाण्यामध्ये २०० ग्रॅम आवळ्याच्या फोडी एकत्र कराव्यात त्यामध्ये किमान ३० ग्रॅम मध एकत्र करावा आणि हे मिश्रण आटवावे. हा मुरांबा साधारण सहा ते आठ महिने किंवा वर्षभरदेखील पुरतो.

७. आवळा आणि आमचूर पावडर याचे मिश्रण हलके तेलावर परतून घ्यावे आणि हे मिश्रण सॅलड मध्ये dressing म्हणून वापरावे.