त्वचेची काळजी घेताना अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. विशेषत: चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी नवनवीन प्रॉडक्ट वापरले जातात. सध्या अनेक ब्युटी प्रॉडक्टपैकी शीट मास्क हा असा प्रॉडक्ट आहे की सध्या ट्रेंडमध्ये आहे. पण शीट मास्क बद्दलचे सत्य प्रत्येक त्वचेची काळजी घेणाऱ्या व्यक्तीला माहित असले पाहिजे. वेगवेगळ्या चर्चेत असलेल्या घटकांमध्ये उत्पादित असलेले शीट मास्क त्वचेची काळजी घेणाऱ्या उत्पादनांमध्ये गेम-चेंजर्स म्हणून विकले जातात आणि त्याच वेळी, आपल्या सौंदर्य दिनचर्येमध्ये एक चांगला पर्याय जोडला आहे.

कोरिअन सौंदर्यामध्ये प्रसिद्ध 10-स्टेप स्किनकेअर रूटीनमधील एक पायरी म्हणून शीट मास्कचे अनिवार्यपणे वर्चस्व होते. पण ते खरंच इतके प्रभावी आहेत का असा प्रश्न त्वचाशास्त्रज्ञ आणि त्वचा तज्ज्ञांनी आता उपस्थित केला आहे.

ते खरोखर त्वचेवर काम करतात का? असे शीट मास्क वापरणाऱ्यांना विचारले असता आश्चर्यकारत प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. याबाबत संभ्रम दूर करण्यासाठी यूके-स्थित त्वचाविज्ञानी डॉ. जुश्या भाटिया सरीन यांनी शीट मास्क वापरण्याबद्दल आणि ते त्वचेवर कशाप्रकारे प्रभाव करत आहे की त्याबद्दल त्यांचे मत मांडले आहे.

त्वचेची काळजी घेण्यासाठी शीट मास्क वापरतायं ( Freepik)
त्वचेची काळजी घेण्यासाठी शीट मास्क वापरतायं ( Freepik)

“तुम्ही त्यांच्यापैकी एक आहात का ज्यांना वेळोवेळी शीट मास्क वापरणे आवडते?” असे कॅप्शन तिने तिच्या इंस्टाग्राम पोस्ट शेअर करताना दिले आहे. त्याचबरोबर तिने असेही म्हटले आहे की, फक्त दोन परिस्थितीमध्ये शीट मास्कचा फायदा होऊ शकतो.

आश्चर्यकारकपणे, शीट मास्क प्रभावीपणे काम करतो पण काही विशिष्ट परिस्थितीमध्ये.

जेव्हा तुम्ही हायलुरोनिक अ‍ॅसिड किंवा सॅलिसिलिक अ‍ॅसिडने समृद्ध शीट मास्क वापरत असाल तेव्हा ते तुम्हाला आश्चर्यकारक मुलायम त्वचा देण्याचे दोन मार्ग आहेत.

या दोन्ही अ‍ॅसिडमध्ये विशिष्ट गुणधर्म असतात जे त्वचेच्या विशिष्ट गरजांसाठी काम करतात. हायलुरोनिक अ‍ॅसिड त्वचेला हायड्रेट करतात आणि त्वचेतील हानिकारक घटक चुंबकाप्रमाणे बाहेर काढतात. तर सॅलिसिलिक अ‍ॅसिड हे बीटा हायड्रॉक्सी अ‍ॅसिड (BHA) आहे जे त्वचेला एक्सफोलिएट करते, म्हणजेच, त्वचेच्या मृत पेशी काढून टाकते.

सॅलिसिलिक अ‍ॅसिड खूप सौम्य आहे आणि तेलकट आणि मुरुम-प्रवण त्वचा असलेल्यांसाठी ते वापरण्याची शिफारस केली जाते. ” हायलुरोनिक अ‍ॅसिड शीट मास्क – ते तुमच्या त्वचेला हायड्रेशन प्रदान करते. तुमच्या त्वचेवर निर्माण होणाऱ्या तेलाला नियंत्रित करण्यासाठी सॅलिसिलिकअ‍ॅसिड शीट मास्क वापरण्याची शिफारस केली जाते,” डॉ सरीन यांनी सांगितले आहेत.

त्वचेची काळजी घेताना अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते ( Freepik)
त्वचेची काळजी घेताना अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते ( Freepik)

“पण, सत्य हे आहे की जरी हे दोन्ही शीटमास्क थोडेसे लाभ देऊ शकत असले तरी त्यांचा प्रभाव दीर्घकाळ टिकणारा आणि तात्पुरता नाही,” असे त्यांनी सांगितले आहे

तज्ज्ञांच्या मते, शीट मास्कचे दीर्घकाळ टिकणारे प्रभाव नसतात आणि ते केवळ तात्पुरत्या वापरासाठी उत्तम असतात. याशिवाय, शीट मास्क वापरण्याचा एक मोठा दोष म्हणजे ते पुनर्वापर करण्यायोग्य नसतात

“तसेच, जर तुम्हाला पर्यावरणाबद्दल काळजी वाटत असेल, तर यापैकी बहुतेक मास्क पुनर्वापर करण्यायोग्य नसतात आणि ते लवकर नष्ट होत नाही,” असे डॉ सरीन यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तुम्हाला स्वतःची काळजी घेण्यासाठी ते कधीतरी वापरायचे असल्यास, ते वापरा. पण, त्याचे कोणतेही वास्तविक किंवा दीर्घकाळ टिकणारे फायदे नाहीत,” हे त्वचाशास्त्रज्ञ अधोरेखित करतात.