Kimchi For Weight Loss: बीएमजे ओपन मधील एका नवीन अभ्यासानुसार आपल्याला किमची या नावाने ओळखली जाणारी प्रसिद्ध कोरियन साईड डिश (तोंडी लावायचा पदार्थ) किमची ही वजन कमी करण्यात खूप मदत करू शकते असे दिसून आले आहे. मुळात किमची म्हणजे काय तर तिखट कोबीची रेसिपी. अभ्यासात समोर आलेल्या माहितीनुसार, एका दिवसात तीन वेळा कोबीची ही किमची खाणे हे लठ्ठपणा कमी करण्यासाठी विशेषतः पोट किंवा ओटीपोटावरील चरबी घटवण्यासाठी मदत करू शकते. अपोलो हॉस्पिटलच्या मुख्य पोषणतज्ञ डॉ प्रियंका रोहतगी यांनी आंबवलेल्या पदार्थांचे महत्त्व सांगत किमची प्रमाणेच कोणत्या भारतीय पदार्थांना आपण आहारात समाविष्ट करणे फायद्याचे ठरू शकते याविषयी इंडियन एक्सस्प्रेसला माहिती दिली आहे.

किमची कशी बनवली जाते?

किमची ही कोबी, मुळा, हिरवा पातीचा कांदा आणि इतर भाज्यांपासून बनवलेली मुख्य कोरियन साइड डिश आहे. यामध्ये मसाल्यांचे मिश्रण घालून पदार्थ आंबवला जातो. काही दिवस आंबवल्यावर मसाले व भाज्यांचे मिश्रण हे आरोग्यदायी बनते असे आता अभ्यासातून समोर आले आहे.

How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय
Benefits of Drinking Okra Water
एक महिना ‘हे’ पाणी प्यायल्याने झपाट्याने वजन होईल कमी; कोलेस्ट्रॉलही राहील नियंत्रणात, एकदा फायदे वाचाच!
Before blaming diabetes drugs understand What chemicals are used in medicines
मधुमेहावरल्या औषधांना दोष देण्याआधी समजून तरी घ्या…

किमची शरीरासाठी कशी फायदेशीर आहे?

डॉ. रोहतगी सांगतात की, किमची हा पदार्थ फायबर आणि आतड्यांचे पोषण करणारा बॅक्टरीया यांनी समृद्ध असतो, ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते, चरबी शरीरात साठून राहण्याचे प्रमाण कमी होते. आंबवल्याने तयार होणारे प्रोबायोटिक बॅक्टेरिया पचनास मदत करतात. तसेच यामध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीराला बाह्य व अंतर्गत अवयवांना येणारी सूज कमी होते. तसेच कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, रोग प्रतिकारशक्ती वाढवणे व कर्करोग प्रतिबंधित करणे अशाही काही फायद्यांसाठी किमची ओळखली जाते. याशिवाय, किमची चवदार पण कमी-कॅलरी युक्त चविष्ट पदार्थ असल्याने जिभेचे चोचले पुरवण्यासाठी सुद्धा याचा आस्वाद घेता येतो. प्रमाणात सेवन केल्यास यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

आंबवण्याच्या प्रक्रियेमुळे किमचीला लोणच्यासारखी आंबट चव येते. तर पोषणमूल्यांमध्ये सुद्धा या प्रक्रियेचा फायदा होतो. उलगडून सांगायचं झाल्यास या प्रक्रियेत अनेक जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वांची टक्केवारी वाढते. तसेच प्रोबायोटिक घटक वाढवण्यास मदत होते. किमचीमध्ये वापरण्यात येणाऱ्या कोबी आणि अन्य भाज्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के यांचा साठा असतात ज्यामुळे शरीरातील निरोगी लाल रक्तपेशी, ऊर्जा व लोह वाढण्यास सुद्धा मदत होऊ शकते.

भारतातील कोणते आंबवलेले पदार्थ किमचीसारखेच आहेत?

अनेक पारंपारिक भारतीय पदार्थ आहेत जे आंबवण्याच्या प्रक्रियेचा वापर करून तयार केले जातात. तुमच्या आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊन यातील काही अगदी कमी प्रमाणात पदार्थ तुमच्या आहारात समाविष्ट केल्यास वजन कमी करण्याच्या प्रवासात जिभेला सुद्धा वैविध्यपूर्ण चवींचा आस्वाद देऊ शकता.

इडली/डोसा : आंबलेल्या उडीद आणि तांदळाच्या पिठात आतड्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर सूक्ष्मजीव असतात.

दही आणि ताक: दही व ताक हे प्रभावी प्रोबायोटिक आहे, जे चांगले बॅक्टेरिया वाढवते.

आंबवलेला तांदूळ – शिजवण्यापूर्वी तांदूळ आंबू दिल्याने त्याचे पौष्टिक प्रमाण वाढते. उदाहरणार्थ इडली डोश्याचं पीठ

लोणचे – लिंबू, आंबा आणि अनेक फळ भाज्या एकत्रित करून तयार केले जाणारे लोणचे चव आणि पोषक तत्वे वाढतात. जेवणासह या प्रोबायोटिक-समृद्ध लोणच्याचे सेवन केल्याने पचनशक्ती सुधारू शकते.

कांजी – बीट, गाजर आणि कोबी यांसारख्या भाज्या आंबवून तयार केले जाणारे पेय हे किमचीच्या रेसिपीसारखेच आहे.

हे ही वाचा<< वर्षभर साखर न खाल्ल्याने शरीराचं काय बदल होतात? कार्तिक आर्यनचा प्रयोग तुमच्या कामी येणार का?

आंबवण्याची प्रक्रिया ही एका प्रकारे पूर्व-पचनासारखेच काम करते, ज्यामुळे अन्न अधिक पौष्टिक होऊन आपल्या शरीरासाठी आवश्यक बॅक्टरीया सुद्धा उपलब्ध होतो. त्यामुळेच कदाचित लोणच्यासारखा पदार्थ हा भारतीय आहाराचा एक अविभाज्य भाग आहे.