Health Special छातीतील जळजळ प्रत्येकाने कधी ना, कधी तरी अनुभवलेली असतेच असते. तर काही व्यक्तींची ती कायम सोबती असते. आपल्या आजूबाजूला कुटुंबात, शेजारीपाजारी अनेक जण यामुळे त्रस्त असतात. कुणाला जळजळत, तर कुणाला मळमळत, कुणाचे यामुळे डोके दुखते तर कुणाचे पोट दुखत असते. कधी खूप ढेकर येतात किंवा तोंडामध्ये कडवटपणा येतो. या सर्वाना एकच प्रश्न पडतो? अ‍ॅसिडिटी म्हणजे नेमके काय? अ‍ॅसिडिटी, आम्लपित्त असे संबोधून त्यावर घरगुती किंवा स्वईलाज पण होत असतात. छातीत किंवा काळजाकडे अश्या प्रकारे जळजळ होण्याची अनेक कारणे आहेत, म्हणून याकडे गांभीर्याने पाहायला हवे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छातीत जळजळ होण्याचे पहिले कारण म्हणजे अ‍ॅसिडिटी किंवा आम्लपित्त. परंतु इतर कारणेही असू शकतात जी लक्षणे दिल्यास धोकादायक ठरू शकतात. – जसे की, हार्ट अ‍ॅटॅक, पित्ताशयातील खडे, पित्ताशयाची सूज, स्वादुपिंड दाह, वगैरे वगैरे. त्यामुळेच जर अ‍ॅसिडिटी किंवा जळजळ थांबली नाही किंवा प्रमाणाबाहेर दुखत असेल तर इतर योग्य तपासण्या करून घ्याव्यात.

हेही वाचा : रोज सकाळी ब्रेड खाणे आतड्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक?अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ खाणे का टाळावे?

अ‍ॅसिडीटी म्हणजे नेमके काय?

आपल्या पोटात म्हणजे जठरात एक पाचक रस तयार होत असतो, तो अ‍ॅसिडिक म्हणजे आम्लयुक्त असतो. आपण जेवलेल्या अन्नाच्या पचनासाठी या पाचक रसाची अत्यंत गरज असते पण योग्य प्रमाणातच. हाच पाचक रस जर जास्त प्रमाणात निर्माण झाला किंवा अवेळी (म्हणजे जेवणाच्या वेळेव्यतिरिक्त) तयार झाला तर आम्लपित्ताचा त्रास होतो. यालाच अ‍ॅसिडीटी असे म्हणतात.

अ‍ॅसिडिटी का होते?

पोटात जास्त प्रमाणात व अवेळी हा आम्लयुक्त पाचकरस तयार होण्याची महत्वाची कारणे म्हणजे worry, hurry, curry

१. आपलं आयुष्य हल्ली सुपरफास्ट झालंय. लोकांना सकाळी ब्रेकफास्ट घ्यायला पण वेळ नसतो. नुसताच चहा, कॉफी आदी पेयं घेतली जातात. ज्यामुळे पोटातील अ‍ॅसिड किंवा आम्लपित्त वाढते व अ‍ॅसिडीटी जाणवू लागते.

२. धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण विविध टेन्शनखाली जगत असतो. ८.३० ची लोकल गाठायची. ऑफिसातल्या बॉसचं व कामाचं टेन्शन, मुलांच्या अभ्यासचे, करिअरचे टेन्शन, बायकांना ऑफिस, मुलं, घरकाम, स्वयंपाक या सर्व गोष्टीत ताळमेळ साधायचे टेन्शन, डोक्यावर कर्ज असेल तर त्याचे अजून टेन्शन, या विविध ताणांमुळे आपल्या मज्जासंस्थेवर परिणाम होत असतो व त्यामुळे जठर-रसाची निर्मिती जास्त प्रमाणात होत राहते व अ‍ॅसिडीटीची सुरुवात होते.

हेही वाचा : Health Special: स्मृतिभ्रंश कोणाला होतो? का होतो?

३. फास्ट फूडच्या जमान्यात भूक लागली की रस्त्यात उभे राहून कुठेही वडापाव, पावभाजी, पिझ्झा, पाणीपुरी, दाबेली इ. सटरफटर खाल्ल जातं. त्यामुळे अमिबीयासिस किंवा जियारडिआसिस सारखे इन्फेक्शन होते व त्यामुळे अ‍ॅसिडीटी (gastritis) चा त्रास होतो.

४. रात्री भरपेट जेवून तत्काळ झोपणे
५. रात्री खूप उशिरा झोपणे.
६. कॉल सेंटर किंवा शिफ्ट बदलीच्या नोकऱ्या. यामुळे रात्री जागरण व दिवसा अपुरी झोप यामुळे अ‍ॅसिडीटी बळावते.
७. मद्यपान करणे.
८. अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी अशा कुठल्याही दुखण्यासाठी ब्रुफेन किंवा त्यासारखे वेदनाशामक औषध घेत रहाणे.
९. आहारात जास्त तेलकट, तिखट, जळजळीत मसाल्याचे पदार्थ घेतल्याने ही अ‍ॅसिडिटी वाढते.
१०. अति कडक उपवास किंवा उपवासाचे पदार्थ खाल्ल्याने पोटात अ‍ॅसिडिटी होते.
११. शिळे अन्न खाल्ल्याने पोटातले आम्लपित्त वाढते आणि गॅसेस व ढेकर येऊ लागतात.
१२. भूकेपेक्षा दोन घास कमी खावेत हा आयुर्वेदाने सांगितलेला मूल्यवान मुद्दा आपण विसरतो व अनेकदा दोन घास जास्तीचे खातो. त्यामुळे देखील आम्लपित्त वाढते व आंबट ढेकर येऊ लागतात.

हेही वाचा : Jugaad Video : फक्त एका कांद्याच्या मदतीने घरातील डास पळवा, पाहा हा सोपा जुगाड; व्हिडीओ होतोय व्हायरल

अ‍ॅसिडीटी या रोगाच्या लक्षणांचा आढावा

१. जळजळ, आम्प्लपित्त
२. पोटाच्या वरच्या भागात किंवा छातीत जळजळ होणे ही अ‍ॅसिडीटीची मुख्य लक्षणे आहेत. काहीही तिखट किंवा तेलकट जास्त खाल्यास जळजळ होते. जेव्हा जठरात किंवा आतड्यात व्रण (अल्सर) असतो, तेव्हा प्रभावी उपाययोजना करून जळजळ नाहीशी होते. जर व्रण नसेल तर त्याला वैद्यकीय भाषेत नॉन अल्सर डीस्पेप्सिया म्हणतो, म्हणजे लक्षणे तर अल्सरची आहेत, पण एन्डोस्कॉपी केल्यास अल्सर नाही. अश्या रुग्णांना वारंवार हा त्रास सतावतो.

हेही वाचा : भात करण्याआधी तांदूळ भिजवण्याचे फायदे वाचून व्हाल खुश; डॉक्टर सांगतायत, तांदूळ किती वेळ पाण्यात ठेवावा?

३. काही वेळा जेवताना किंवा जेवणानंतर जठरातील आम्ल घश्यात येऊन अन्ननलिकेत जखमा होतात.
४. जठरात H. Pylori ह्या जंतूंचा संसर्ग झाल्यास अ‍ॅसिडिटी बळावते व ulcer किंवा काही गाठी सुद्धा होऊ शकतात.

त्यामुळेच जर अ‍ॅसिडिटी काही काळ आपल्याला असेल तर दुर्बिणीचा तपास व इतर तपासण्या करणे आवश्यक ठरते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are the exact causes of acidity worry hurry and curry hldc css