नेत्रा नेहमीप्रमाणे ऑफिसला निघाली. स्टेशनवर ट्रेनची वाट पाहात असताना तिला वडिलांचा फोन आला. काहीतरी महत्वाचे सांगायचे असेल म्हणून नेत्राने तातडीने तो उचलला, कारण ऑफिसच्या वेळेत वडील फक्त मेसेज करत असत. नेत्रा भाऊ, वहिनी, त्यांची दोन मुलं आणि आई वडिलांबरोबर आनंदाने राहात होती. नेत्राची वहिनी खाली पडली असे सांगण्यासाठी वडिलांनी नेत्राला फोन करून मदतीसाठी घरी बोलावले. एकदा नव्हे तर तीन- तीन वेळा फोन केला…

नेत्नेरा त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला, “अहो येते बाबा , तोवर तिला बेडवर बसवण्याचा प्रयत्न करा आणि दादालाही बोलवा.” गडबडीत कामाला उशिर होईल अस ऑफिसला कळवून ती घरी पोहोचली. सोसायटीत पोहोचता क्षणी तिला ॲम्ब्युलन्स दिसली आणि जमा झालेल्या गर्दीच्या घोळक्यात तिचे आई – बाबा भांबावलेले आणि भाऊ ओक्साबोक्शी रडतांना तिने पाहिला. नेत्राची वहिनी लुब्धाने घराच्या गॅलरीतून आपल्या ८ महिन्याच्या मुलासोबत उडी घेतली होती आणि त्यातच दोघे दगावले होते. ना मनी, ना ध्यानी असतांना हे सगळं घडलं होतं…

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

या प्रसंगानंतर जवळपास ४० दिवसानंतर नेत्रा आणि तिचे कुटुंबीय क्लिनिकला मदतीसाठी आले. त्यांचे अनेक प्रश्न होते आणि त्यांना बरंच काही बोलायचं होतं. ते बोलू लागले… डॉक्टर, आमच्या घराला कोणाची नजर लागली देव जाणे. असं आमच्या सुनबाईंना काय सुचलं की त्यांनी असं पाऊल उचललं? हळुवारपणे आपल्या मनातील दुःख ते हलकं करत होते. दुसऱ्या बाळंतपणानंतर लुब्धा काहिशी उदास दिसायची, तिची लहानसहान गोष्टींवर चिडचिड व्हायची, अगदी लहानशा गोष्टीवरून ती ४ वर्षाच्या मोठ्या मुलाला मारायची. असं या आधी तिने कधीच केलेलं नव्हतं. ती सारखं बोलायची की, मी चांगली आई नाहीये. तिच्या पतीबरोबरही तिचे अचानक वाद वाढले होते. कधी तरी रागात ती खोली बंद करून एकटीच रडत असे आणि विचारल्यावर जास्त चिडत असे. रात्रीची झोपही पुरेशी घेत नसे.

हेही वाचा… Health Special : रोगप्रतिकारशक्तीसाठी काढ्यांचा उतारा

तिचा मूड क्षणाक्षणाला बदलत असे. घरची लोक तिला समजून घेऊन तिला शांत होईपर्यंत तिचा वेळ घेऊ देत असत. ती आपोआप शांत होई. हे सगळे गेले ६-७ महिने चालू होते. पण ही सगळी लक्षणे पोस्टपार्टम डिप्रेशनची आहेत हे त्यांना लक्षात आले नाही. पोस्टपार्टम डिप्रेशनचे भारतातील प्रमाण जवळपास १५ टक्के आहे. बहुतांश मातांमधे अशी लक्षणे बाळंतपणानंतर २ ते ३ आठवड्यात किंवा २ ते ३ महिन्यात दिसू लागतात. काहींमध्ये लक्षणांची तीव्रता कमी असून ते आपोआप बरे होतात त्याला ‘पोस्टपार्टम ब्लुझ’ म्हणतात. पण काहींमध्ये याची तीव्रता भरपूर असते. रात्री झोप न येणे , चिडचिडेपणा, उदास वाटणे, बाळाबद्दल ममत्व न वाटणे, आपण चांगली माता नाही अशी अपराधीपणाची भावना येणे, नवजात बालकाच्या भविष्याबद्दल भरपूर काळजी वाटणे अशा विचारांबरोबर स्वतः ला किंवा बाळाला इजा पोहोचवण्याचे किंवा जिवे मारण्याचे विचार मनात येतात. त्याला ‘पोस्टपार्टम डिप्रेशन’ म्हणतात.
काहींना गोंधळल्यासारखे वाटणे, भास होणे अशी लक्षणेही दिसतात त्याला ‘पोस्टपार्टम सायकोसिस’ म्हणतात. अशावेळी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे खूप आवश्यक असते.

बाळंतपणानंतर दिसणारे हे मानसिक आजार बऱ्याच कारणांनी असू शकतात. शरीरात होणारे हार्मोनल बदल, गर्भधारणेआधी काही मानसिक आजार असणे, महिलेच्या घरात असा आजार इतर कुणाला असेल, सासरचे लोक समजून घेणारे नसतील, पतीची साथ नसेल, काही मोठी तणावपूर्ण घटना बाळंतपणाच्या वेळेस घडलेली असेल तर हे आजार होण्याची शक्यता असते.

अशावेळी घरातील व्यक्तींबरोबर बोलून प्रसूती नंतरच नवजात बालकाच्या मातेला योग्य ते वातावरण मिळेल असे पाहणे आवश्यक असते. तिच्या आहाराकडे लक्ष देणे, पुरेशी झोप मिळावी आणि आराम मिळावा म्हणून बाळाची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. तरीही त्रास होत असल्यास मातेचे आणि घरच्या मंडळींचे समुपदेशन आवश्यक असते. बऱ्याच मातांना समुपदेशनाबरोबर आजाराच्या तीव्रतेनुसार गोळ्या घ्याव्या लागतात. आत्महत्येचे किंवा बाळाला जीवे मारण्याचे विचार मातेच्या मनात येत असतील तर बाळाला मातेपासून काही दिवस दूर सुरक्षित ठेऊन ईसीटी किंवा शॉक थेरपी मातेला द्यावी लागते.

नवजात बालकाचे घरात आगमन मातेसाठी आणि सगळ्या कुटुंबासाठी आनंदाचे क्षण घेऊन येते. तेव्हा हा आनंद थोडा उशिराने का असेना जास्तीत जास्त घरांना अनुभवता यावा यासाठी वरील आजार आणि त्यावरचे उपाय यांची माहिती असणे गरजेचे आहे.

Story img Loader