Heart Attack Symptoms in Mouth: आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोकांना कोणत्याही गोष्टीसाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे ते आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत आणि त्यांना लठ्ठपणा, हृदयविकार यांसारख्या अनेक समस्या होतात.
हृदयाच्या आजारांचं प्रमाण हल्ली खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे. त्यात हार्ट अटॅकचे प्रमाण तर गेल्या काही वर्षांपासून वाढतच चालले आहे. केवळ वयोवृद्धच नाहीत, तर तरुणांमध्येही हृदयाच्या आजारांचं प्रमाणही वाढतंय. अनेकदा लोकांना ही समस्या वाढली की, जाणवते आणि ते डॉक्टरांकडे धाव घेतात. पण हृदयाशी संबंधित समस्यांचे काही संकेत आपण लक्षात घेणे आवश्यक आहे.
हिरड्यांमधून रक्त येणे (Heart Attack Symptoms)
कधी कधी लोकांच्या हिरड्या लाल होतात आणि त्यातून रक्त येऊ लागते. तुमच्यासोबतही असं होत असेल, तर सावध व्हा. कारण- असे जंतू रक्तात शिरून हृदयापर्यंत पोहोचणाऱ्या नसांना नुकसान पोहोचवू शकतात.
तोंडातून दुर्गंधी येणे (Heart Attack Signs)
ब्रश केल्यानंतरही तोंडातून दुर्गंध येत असेल आणि हा त्रास बराच काळ चालू असेल, तर याला शरीराच्या आतील सूज कारणीभूत असू शकते आणि ही गोष्ट हृदयासाठी धोकादायक मानली जाते.
दात हलणे (Heart Attack Reason)
दात कारण नसताना हलत असतील किंवा पडत असतील, तर हे शरीरात कुठेतरी सूज असल्याचे लक्षण आहे आणि ते हृदयाच्या आजारांकडे बोट दाखवते.
वारंवार तोंड कोरडे पडणे (Heart Attack Signs in Marathi)
तुमचं तोंड वारंवार कोरडं पडत असेल तर याचा अर्थ शरीरात पाण्याची कमतरता आहे किंवा रक्तप्रवाह कमी होत आहे आणि त्यामुळे हृदयाचा आजार होऊ शकतो.
जबडा दुखणे (Heart Disease)
खालच्या जबड्यात अचानक तीव्र वेदना होऊ लागली किंवा ती छातीत पसरत असेल, तर हेही हृदयाशी संबंधित समस्येचे लक्षण असू शकते हे समजून घेणे गरजेचे आहे.