Fruits for Heart Health: हृदयाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या दोन वर्षांत देशात आणि जगात कमी वयात हार्ट अटॅकमुळे मृत्यूच्या घटना वाढल्या आहेत. हृदयविकार हा एक प्रकारचा कार्डियोव्हॅस्कुलर (हृदय व रक्तवाहिन्यांचा) आजार आहे, ज्यामध्ये हार्ट अटॅक आणि स्ट्रोक हे मुख्य कारणं असतात.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), दरवर्षी सुमारे १.७९ कोटी लोकांचे मृत्यू कार्डियोव्हॅस्कुलर आजारांमुळे होतात आणि त्यामध्ये सुमारे ८५% मृत्यू हार्ट अटॅक आणि स्ट्रोकमुळे होतात. दरवर्षी जवळजवळ १.५ ते १.८ कोटी लोक हृदयविकारांमुळे मृत्युमुखी पडतात, ज्यामध्ये १.२ ते १.५ कोटी मृत्यू हार्ट अटॅक आणि स्ट्रोकमुळे होतात. हे लक्षात घेणं आवश्यक आहे की, हृदयविकार बळावण्यामागे वाढता ताण, खराब आहार व बिघडलेली जीवनशैली या बाबी मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत.

हृदयाशी संबंधित आजार अचानक होत नाहीत, ते हळूहळू तयार होतात. त्यामागे खराब कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब हे मुख्य कारण असतात. हार्ट अटॅक ही एक हळूहळू आणि दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असते. खराब कोलेस्ट्रॉल (LDL) आणि उच्च रक्तदाब (Hypertension) हे दोन्ही त्रास यासाठी जबाबदार असतात. भविष्यात या आजारापासून वाचायचं असेल, तर आपल्या आहारात योग्य तो बदल करा. तणाव कमी ठेवा आणि जीवनशैलीत सुधारणा करा. त्यामुळे तुमचं हृदय नेहमी निरोगी राहील.

हेही वाचा

हृदय रोग तज्ञ डॉ. विमल झाजर यांनी ५ उत्तम हृदयासाठी फायदेशीर अन्नपदार्थ खाण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी सांगितले की रोज हे अन्न खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो, रक्तदाब (बीपी) सामान्य राहतो आणि शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊया असे कोणते अन्नपदार्थ आहेत, ज्यांचे सेवन केल्याने हृदय निरोगी राहते आणि बीपीही सामान्य राहतो.

काळी द्राक्षे

जर तुम्हाला तुमचं हृदय निरोगी ठेवायचं असेल, तर काळी द्राक्षे खा. काळ्या द्राक्षांमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे हृदय सुस्थितीत ठेवण्यासाठी खूप उपयोगी असतात. हे घटक शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास आणि चांगलं कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवायला मदत करतात. त्याशिवाय काळी द्राक्षे रक्तवाहिन्यांचे नुकसान होण्यापासून वाचवतात आणि त्यांची लवचिकता टिकवून ठेवतात. त्यामधील फ्लेवोनॉइड्स रक्ताच्या गाठी होण्यापासून रोखतात आणि सूज कमी करतात, ज्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक होण्याचा धोका कमी होतो. दररोज एक मूठ काळी द्राक्षे खाणे हृदयासाठी फायदेशीर ठरू शकते.

सफरचंद

सफरचंदामध्ये फायबर, विशेषतः पेक्टिन आणि पॉलीफेनॉल्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायला मदत करतात. सफरचंद खाल्ल्याने रक्तवाहिन्यांच्या भिंतींवरची सूज कमी होते आणि त्यामध्ये साचलेली चरबी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे रक्तदाब (ब्लडप्रेशर) नियंत्रित राहून, हृदयाचे ठोके नियमित राखायला मदत होते. सफरचंदामधील अँटीऑक्सिडंट्स हृदयाला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचवतात. दररोज एक सफरचंद खाल्ल्याने हृदयाच्या आजारांचा धोका कमी होतो आणि हृदयाचे कार्य सुरळीत सुरू राहते.

पेर

पेर हे एक असे फळ आहे, जे पोटॅशियमने भरलेले असते. हे फळ खाल्ल्याने हृदयाच्या स्नायूंना बळकटी मिळते. त्यातील पोटॅशियम हृदयाचे ठोके नियंत्रणात ठेवते आणि उच्च रक्तदाब सामान्य ठेवतो. पेरमध्ये फायबरही भरपूर असतं, जे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं. हे फळ शरीरात इलेक्ट्रोलाइटचा समतोल राखण्यात मदत करतं आणि त्यामुळे हृदयाचं कार्य चांगलं होतं. नियमित पेर खाल्ल्यामुळे हृदयाच्या आजारांचा धोका कमी होतो, विशेषतः ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे, त्यांच्यासाठी हे फळ खूप उपयुक्त आहे.

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन C, अँटीऑक्सिडंट्स व फाइटोन्यूट्रिएंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे फळ खाल्ल्याने शरीरातील सूज नियंत्रणात राहते आणि धमन्या (रक्तवाहिन्या) स्वच्छ राहतात. त्यामधील अँटीऑक्सिडंट्स हृदयाच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून वाचवतात, ज्यामुळे हृदय निरोगी राहते. त्याशिवाय स्ट्रॉबेरी खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि कोलेस्ट्रॉलही कमी होते. स्ट्रॉबेरीमधील फायबर व पोटॅशियम हे दोन्ही घटक हृदयासाठी खूप फायदेशीर असतात. हे फळ चविष्ट असून, हृदयाच्या आजारांपासून संरक्षण करते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ताजी फळे खा

हृदय सुस्थितीत राखून, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी व रक्तदाब सामान्य ठेवण्यासाठी ताजं सॅलड खा. सॅलडमध्ये तुम्ही काकडी, टोमॅटो, गाजर, मुळे अशा भाज्यांचा समावेश करा. या भाज्यांमध्ये फायबर, व्हिटॅमिन्स व खनिजे भरपूर असतात. हे सर्व घटक शरीरातील मेटाबॉलिझम वाढवतात आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांना मजबूत ठेवतात. सॅलडमध्ये असलेले फायबर वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते आणि पचनक्रिया सुधारते. टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचा घटक असतो, जो हार्ट अटॅकचा धोका कमी करतो. दररोज जेवणासोबत सॅलड खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात आणि हृदयाशी संबंधित त्रास कमी होतो.