२०२१ हे वर्ष संपण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक आहे. त्यामुळे सर्वत्र नवीन वर्षाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. २०२२ हे वर्ष सुरू होण्यास काही दिवसच शिल्लक आहेत. त्यामुळे प्रत्येकजण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. नववर्षाचे कॅलेंडर आल्यानंतर सर्वप्रथम सण, सभारंभ, वाढदिवस यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींचे वार किंवा तारखा पाहिल्या जातात. पण त्यासोबतच काही मद्यप्रेमी हे ड्राय डे कधी आहे याचीही माहिती घेत असतात. नुकतंच उत्पादन शुल्क विभागाने दरवर्षीप्रमाणे यंदाही ड्राय डेची यादी जाहीर केली आहे.
भारतातील बहुतांश राज्यांमध्ये प्रमुख सण किंवा राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी ड्राय डे जाहीर केला जातो. धार्मिक सण-उत्सव, तसेच देशभक्तीच्या भावनांचा आदर करण्यासाठी राज्य सरकार काही ठराविक दिवस दारुची दुकाने बंद ठेवतात. हा दिवस सर्वच मद्यप्रेमींमध्ये ड्राय डे म्हणून ओळखला जातो. उत्पादन शुल्क विभाग दरवर्षी ड्राय डे ची यादी प्रसिद्ध करतो.
यंदाही उत्पादन शुल्क विभागाने ही यादी प्रसिद्ध केली आहे. यानुसार यंदा वर्षभरात जवळपास २८ दिवस ड्राय डे असणार आहे. या दिवशी दारू विक्रीची सर्व दुकाने पूर्णपणे बंद असणार आहेत. जर या दिवशी दारुचे दुकाने सुरू ठेवल्यास दारू विक्रेत्याकडून दंड आकारला जातो.
पाहा ड्राय डे ची संपूर्ण यादी
जानेवारी
- १४ जानेवारी : मकर संक्रांती – शनिवार
- २६ जानेवारी : प्रजासत्ताक दिन – गुरुवार
- ३० जानेवारी : महात्मा गांधी पुण्यतिथी, शहीद दिवस – रविवार
फेब्रुवारी
- १६ फेब्रुवारी : गुरु रविदास जयंती- बुधवार
- १९ फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज जयंती – शनिवार
- २६ फेब्रुवारी : स्वामी दयानंद सरस्वती जयंती – शनिवार
मार्च
- १ मार्च : महाशिवरात्री – मंगळवार
- १८ मार्च : होळी – शुक्रवार
एप्रिल
- १० एप्रिल : राम नवमी – रविवार
- १४ एप्रिल : डॉ.आंबेडकर जयंती आणि महावीर जयंती – गुरुवार
- १५ एप्रिल : गुड फ्रायडे – शुक्रवार
मे
- १ मे : महाराष्ट्र दिन – शनिवार
- ३ मे : ईद – मंगळवार
जुलै
- १० जुलै : आषाढी एकादशी, बकरी ईद – रविवार
- १३ जुलै : गुरुपौर्णिमा – बुधवार
ऑगस्ट
- ८ ऑगस्ट : मोहरम – सोमवार
- १५ ऑगस्ट : स्वातंत्र्यदिन – सोमवार
- १९ ऑगस्ट : जन्माष्टमी – शुक्रवार
- ३१ ऑगस्ट : गणेश चतुर्थी – बुधवार
सप्टेंबर
- ९ सप्टेंबर : गणेश विसर्जन – शुक्रवार
ऑक्टोबर
- २ ऑक्टोबर : गांधी जयंती – रविवार
- ५ ऑक्टोबर : दसरा – बुधवार
- ८ ऑक्टोबर : दारूबंदी सप्ताह (महाराष्ट्र) – शनिवार
- ९ ऑक्टोबर : ईद-ए-मिलाद, महर्षि वाल्मिकी जयंती – रविवार
- २४ ऑक्टोबर : दिवाळी – सोमवार
नोव्हेंबर
- ४ नोव्हेंबर : कार्तिकी एकादशी – शुक्रवार
- ८ नोव्हेंबर : गुरु नानक जयंती – मंगळवार
डिसेंबर
- २५ डिसेंबर : ख्रिसमस – रविवार