निरोगी आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. त्वचा नीट दिसण्याकरिता संयम असणे आवश्यक आहे. प्रत्येकजण त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक प्रकारचे स्कीन केअर प्रोडक्ट वापरत असतात. अशातच तुम्ही नवीन प्रोडक्ट वापरताना आपल्या त्वचेला सूट होतील हे पाहणे महत्वाच आहे. यानंतर तुम्ही तुमच्या त्वचेनुसार प्रोडक्टची खात्री केल्यानंतर त्यांचा रोजच्या वापरासाठी वापर करू शकता. पण काहींना वाटतं की ३० व्या आणि ४० व्या वयात आपल्या त्वचेची काळजी नाही घेतली तरी चालते. यावेळी स्किनकेअर प्रशिक्षक तरुण दोसांझ सांगतात की त्वचेचे संरक्षण करण्यासाठी आणि निरोगी ठेवण्यासाठी एखाद्याने २० व्या वयापासूनच काही सोप्या दैनंदिन सवयी एक रुटिंग ठेवले तर तुम्ही नैसर्गिक तजेलदार त्वचा मिळवता येऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात निरोगी आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी या पाच खास टिप्स.

१) तुमच्या त्वचेच्या टोन नुसार म्हणजे तेलकट, कोरडी अशी त्वचा असल्यास तुम्ही त्या पद्धतीने व विशिष्ट आवश्यकतांनुसार योग्य क्लीन्झर निवडा.

२) दररोज तुमच्या त्वचेला ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन लावा. याने तुमची त्वचा चांगली आणि तजेलदार राहील.

३) तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला जाताना फाउंडेशन वापरत असाल तर त्या ऐवजी तुम्ही टिंटेड मॉइश्चरायझर वापरा. हा मॉइश्चरायझर लावल्याने तुमच्या त्वचेवरील डाग लपेल. तसेच याने  त्वचेला कोणत्याही प्रकारचे साइडइफेक्ट होत नाही. यात तुमच्या त्वचेला पुरेसा ओलावा देखील मिळतो आणि तुमची त्वचा कोरडी रहात नाही.

४)डोळ्यांच्या त्वचेची काळजी घेणे खूप महत्वाच आहे. कारण डोळ्यांची त्वचा अतिशय नाजुक असते. त्यामुळे या त्वचेची योग्य निगा राखणे आवश्यक आहे. या करिता तुम्ही योग्य आणि उच्च प्रतीची क्रीम वापरा. अशा पद्धतीची क्रीम वापरा जी तुमच्या डोळ्यांच्या सभोवतालच्या नाजूक भागाचे पोषण करण्यास मदत करेल.

५) एखाद्या कार्यक्रमावरून थकून आल्यावर झोपायच्या आधी नेहमी तुमचा मेकअप पिसून किंवा धुवून काढावा. तुम्हाला जर रात्री तुम्हाला मेकअप काढण्याचा कंटाळा आला असेल तर मेकअप तसाच न ठेवता तुम्ही मेकअप रिमूव्हरने मेकअप पुसून काढा आणि मगच झोपा. याने तुमच्या त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी किंवा एलर्जी होणार नाही.

या पाच टिप्सची तुम्ही दैनंदिन जीवनात सवय ठेवली तर तुम्हाला निरोगी आणि तजेलदार त्वचा मिळेल. व कोणत्याही प्रकारची त्वचेची समस्या उद्भवणार नाही.