Hero Motocorp या प्रसिद्ध मोटारसायकल उत्पादक कंपनीने आपल्या दुचाकी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीने ‘होम डिलिव्हरी’ ही नवी सेवा सुरू केलीये.

https://www.hgpmart.com या इ-कॉमर्स संकेतस्थळावरुन बाइक अथवा स्कुटर खरेदी केल्यासच ग्राहकांना या नव्या सेवेचा लाभ घेता येईल. बाइक किंवा स्कुटरच्या होम डिलिव्हरीसाठी ग्राहकांना दुचाकीच्या किंमतीपेक्षा 349 रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. ही सेवा मुंबई, नोएडा आणि बेंगळुरू या तीन शहरांमध्ये सुरू केली आहे. येत्या काही महिन्यांमध्ये देशातील 25 शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे.

– या सेवेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम कंपनीच्या https://www.hgpmart.com या संकेतस्थळावर जावं.
– लॉग-इन केल्यानंतर बाइक आणि त्यानंतर डिलर निवडा.
– त्याखाली होम डिलिव्हरीचा पर्याय दिसेल.
– हा पर्याय निवडल्यानंतर किंमतीनुसार ऑनलाइन पेमेंट करावे लागेल.
– यानंतर हिरो कंपनीशी निगडीत थर्ड-पार्टी सर्विस प्रोव्हायडर तुम्ही दिलेल्या पत्त्यावर पोहोचेल आणि आवश्यक कागदपत्र घेईल.
– बूक केलेल्या बाइक किंवा स्कुटरचं आरटीओमध्ये रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमच्यापर्यंत गाडी पोहोचवली जाईल.