Holi 2024: होळी, रंगांचा सण.. याची आपण अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतो. दरवर्षी फाल्गुन महिन्यात, पौर्णिमेच्या दिवशी होळी साजरी केली जाते. यंदा हा सण २५ मार्च रोजी आला असून, य दिवशी देशभरात सर्वत्र अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने रंगांची उधळण केली जाते. एकमेकांना रंग लावले जातात. लाल, हिरवा, निळा, पिवळा अशा वेगवेगळ्या रांगांमध्ये प्रत्येक व्यक्ती, गल्ली, रस्ते न्हाऊन निघतात.

मात्र आपण हे जे रंग वापरतो त्या रंगांना काही खास अर्थ आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर, पांढऱ्या रंगाचा उल्लेख आपण कायमच शांतेचे प्रतीक म्हणून करत असतो. त्याचप्रमाणे होळीमध्ये खेळल्या जाणाऱ्या, उधळल्या जाणाऱ्या काही निवडक रंगांचे अर्थ किंवा ते कोणत्या गोष्टीचे प्रतीक आहेत ते आपण पाहू.

हेही वाचा : Holi recipe : ‘होळी रे होळी पुरणाची पोळी’! पाहा पदार्थाचे अचूक प्रमाण अन् पुरण वाटायची सोपी पद्धत

होळीचे रंग आणि त्याचे अर्थ

१. लाल रंग

लाल रंग हा प्रेम, आवड / उत्कटता यांचे प्रतीक आहे. तसेच, वाईट गोष्टीवर चांगल्या गोष्टींचा विजय मिळवण्याचेदेखील हे एक प्रतिक आहे.

२. हिरवा रंग

हिरवा रंग सुसंवाद, वाढ आणि नवीन सुरुवात यांचे प्रतीक आहे. तसेच हिरवा रंग हा वसंत ऋतूची सुरुवात, नूतनीकरण आणि नवजीवनाच्या बहराचे प्रतिनिधित्व करते.

३. पिवळा रंग

पिवळा रंग हा शिक्षण, ज्ञान आणि आत्मज्ञान दर्शवणारा रंग आहे. तसेच हा सकारात्मकतेचेदेखील प्रतीक आहे.

हेही वाचा : ‘खेळताना रंग बाई होळीचा..’ नैसर्गिक रंगांचा वापर करूया! घरच्याघरी कसे तयार करायचे हे ५ रंग पाहा

४. केशरी

केशरी हा एक अत्यंत उत्साही, चैत्यन्य आणि आनंदी असा रंग आहे. या रंग सूर्यापासून, उन्हापासून मिळणाऱ्या उबेचे प्रतीक आहे. तसेच केशीर रंग हा एक अत्यंत सकारात्मक आणि आशावादी रंग असल्याचेही आपण म्हणू शकतो.

५. निळा रंग

हिंदू धर्मात निळा रंग हा अनेकदा भगवा श्री कृष्ण किंवा प्रभू श्री रामाचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. निळा रंग हा शांतात, प्रसन्नता या भावनांचे प्रतिनिधित्त्व करत असून; समुद्र आणि आकाशाच्या विशालतेचे / अथांगतेचे प्रतीक आहे.

६. जांभळा रंग

जांभळा रंग हा श्रीमंती, समृद्धी, विलास [लग्झरी] यांचे प्रतीक आहे. तसेच, कल्पनाशक्ती, अध्यात्मिक प्रबोधन यांचेही प्रतिनिधित्त्व जांभळा रंग करत असतो.

७. गुलाबी रंग

मैत्री, प्रेम, आपुलकी यांचे प्रतीक म्हणजे गुलाबी रंग. तसेच गुलाबी रंग हा खेळकर नातेसंबंध आणि मैत्रीतील गोडवा यांचे प्रतिनिधित्वदेखील करते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असे हे होळीला खेळले जाणारे सात रंग आणि त्यांच्या या अर्थाबद्दल डीएनएच्या [DNA] एका लेखातून ही माहिती मिळाली आहे.