How to make puran poli recipe : रंग, पिचकारी, पुरणपोळी आणि कटाची आमटी याशिवाय होळी हा सण साजरा होऊच शकत नाही; नाही का? मात्र सध्या बरेचजण विकतची पुरणपोळी आणणे पसंत करतात. किंवा ती घरी ऑर्डर करून मागवली जाते. याचे कारण म्हणजे पुरणपोळी हा पदार्थ करण्यास तसा अवघड असून, वेळ खाणारा आहे. तसेच पुरण तयार करण्यासाठीही अनेकांना अडचणी येतात.

मात्र यंदाच्या होळी सणानिमित्त तुम्हाला घरीच पुरणपोळी करून पाहायची असेल, किंवा सोप्या पद्धतीने पुरण तयार करायचे असेल तर, vmiskhadyayatra103 या युट्युब चॅनलने पुरणपोळी तयार करण्यासाठीचे प्रमाण तसेच पुरण बनवण्याची सोपी पद्धत दाखवली आहे ती पाहा.

Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
Benefits of Millets
नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात कोणती बाजरी खावी? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…
How Suryanamaskar and pranayama help to fight allergies
तुम्हाला वारंवार ॲलर्जी होते? सूर्यनमस्कार आणि प्राणायाम ठरतील फायदेशीर
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या

पुरणपोळी रेसिपी :

साहित्य

चणाडाळ – ५०० ग्रॅम
गूळ – ५०० ग्रॅम
कणिक – ३/४ कप
मैदा ३/४ कप
तेल [आवश्यकतेनुसार]
पाणी [आवश्यकतेनुसार]
मीठ
जायफळ
वेलची पूड

हेही वाचा : Recipe : लहान मुलांसाठी बनवून पाहा कलिंगड पॅनकेक! पाहा गोड अन् पौष्टिक रेसिपी…

कृती

  • सर्वप्रथम चण्याची डाळ ३ ते ४ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
  • धुतलेली डाळ कुकरमध्ये घालून कुकरच्या चार ते पाच शिट्या काढून घ्या. डाळ शिजवताना त्यामध्ये थोडी हळद घालावी. यामुळे पुरणाला चांगला रंग येतो.
  • डाळ शिजल्यानंतर त्यामधली उरलेले पाणी निघून जाण्यासाठी डाळीला चाळणीवर घालून घ्यावे. शिजलेल्या डाळीतून निथळलेले पाणी म्हणजेच कट.
  • आता शिजलेली डाळ पूर्ण यंत्रामध्ये घालून चांगली वाटून घ्या. डाळ गरम असताना वाटल्यास ती डाळ वाटणे सोपे होते.
  • डाळ वाटत असतानाच गॅसवर एका कढईमध्ये गूळ शिजण्यासाठी ठेवावा. पुरण यंत्रातून वाटलेली डाळ लगेचच कढईमधील गुळात टाकून द्यावी.
  • आता कढईमध्ये गूळ आणि वाटलेल्या डाळीचे घट्ट पुरण होईपर्यंत मिश्रण ढवळत राहावे. मिश्रण शिजत असतानाच यात जायफळ आणि वेलचीपूड घालावी.
  • पुरण तयार होण्यासाठी साधारण अर्धातास लागू शकतो. कढईमधील शिजणारे पुरण चांगले घट्ट झाल्यावर, त्यामध्ये चमचा/डाव उभा राहिला कि आपले पुरण तयार झाले आहे असे समजावे.

हेही वाचा : Recipe : थंडगार चटपटीत ‘मसाला पन्हे’! कैरीच्या सरबताला ‘असा’ द्या मिरचीचा ठसका…

  • आता एका पातेल्यामध्ये कणिक आणि मैदा समप्रमाणात चाळून घ्यावे. कणिक मळण्यासाठी आवश्यकतेनुसार पाणी, तेल आणि चवीसाठी किंचित मीठ घालावे.
  • पुरण पोळ्यांसाठी सैलसर कणिक मळून घ्यावी. तसेच तयार झालेले पुरणदेखील मळून घेऊन त्याचे मध्यम आकाराचे गोळे बनवून घ्या.
  • पोळ्या लाटताना, कणकेच्या गोळ्यांपेक्षा पुरणाचा गोळा दुप्पट असावा.
  • कणकेच्या गोळ्याला मैदा लावून घ्या. यामुळे पोळी पोळपाटाला चिकटणार नाही. आता तो गोळा हातावर थोडासा चपटा करून त्यामध्ये पुरणाचा गोळा व्यवस्थिती भरून घ्यावा.
  • आता पुरण भरल्यानंतर कणिकेचा गोळा ज्या बाजूने बंद केला आहे, ती बाजू पोळपाटावर ठेवावी आणि अतिशय हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यावी.
  • पोळी लाटून झाल्यानंतर तिला लाटण्याच्या मदतीने तव्यावर भाजण्यासाठी टाकावी. तसेच पोळीवरील अतिरिक्त पीठ ब्रशच्या मदतीने काढून टाकावे.
  • दोन्ही बाजूंनी पुरणपोळी खमंग भाजून घ्यावी आणि एखाद्या वर्तमान पत्रावर अथवा टिशूपेपर ठेवून घ्यावी.
  • तयार झालेल्या स्वादिष्ट पुरणपोळीचा आस्वाद साजूक तूप आणि कटाच्या आमटीबरोबर घ्यावा.

पुरणपोळीची ही रेसिपी युट्युबवरील @vmiskhadyayatra103 नावाच्या अकाउंटने शेअर केलेली आहे.