Home remedies for chest congestion: बदलत्या हवामानासोबत आरोग्याशी संबंधित अनेक समस्या सामान्य होतात. त्याशिवाय अस्वास्थ्यकर जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे शरीर आजारांना बळी पडते. सर्दी ही फ्लू, अॅलर्जी किंवा श्वसनसंसर्गाचे एक सामान्य लक्षण आहे. आयुर्वेदिक गुरू स्वामी ध्यान नीरव यांच्या मते, छातीत साचलेल्या कफावर उपचार करण्यासाठी काही घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात.

आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, थंडी, प्रदूषण व धुळीमुळे छातीत अनेकदा श्लेष्मा जमा होतो. त्यामुळे केवळ श्वास घेण्यास त्रास होत नाही, तर फुप्फुसांचे कार्य हळूहळू कमकुवत होते. जर वेळीच उपचार केले नाहीत, तर खोकला, घसा खवखवणे, छातीत रक्तसंचय यांसारख्या समस्या वाढू शकतात. मध-आधारित पेये आणि हर्बल उपायांपासून ते स्टीम थेरपी आणि ह्युमिडिफायर्सपर्यंतच्या नैसर्गिक पद्धती रक्तसंचय कमी करू शकतात आणि बरे होण्यास मदत करू शकतात.

विश्रांती घेताना पोजिशन्स बदला

अमेरिकन लंग असोसिएशनच्या मते, तुम्ही तुमच्या शरीराची स्थिती कशी ठेवलीय यावर तुमच्या श्वसनाची स्थिती अवलंबून असते. पोटावर झोपल्याने अनेकदा रक्तसंचय वाढतो, विशेषतः रात्रीच्या वेळी जास्त काळजी घ्या. तसेच, विश्रांती घेताना किंवा झोपताना सरळ झोपा.

मध टाकून कोमट पेय प्या

खोकला आणि घसा खवखवत असेल, तर मधाचा वापर बराच काळ नैसर्गिक उपाय म्हणून केला जातो. छातीत जळजळ होण्यावरही हा उपाय फायदेशीर ठरू शकते. चहा किंवा लिंबूपाणी यांसारख्या कोमट पेयांमध्ये एक चमचा मध मिसळल्याने आराम मिळतो आणि तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते. मधात अँटीमायक्रोबियल आणि अँटी-इम्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे श्वसनमार्गातील जळजळ कमी होण्यास मदत होते आणि कफ असेल, तर तो सहजगत्या बाहेर पडतो. नियमित वापरामुळे श्वसन संसर्गातून जलद बरे होण्यास आणि अस्वस्थता कमी होण्यास मदत होते.

हळद सेवन

छातीत असलेला कफ काढून टाकण्यासाठी हळद खाणे फायदेशीर ठरू शकते. हळदीचे दूध किंवा हळदीचा चहा बनवून प्या. हळदीमध्ये दाहक-विरोधी आणि जीवाणूविरोधी गुणधर्म असतात, जे घसा व छातीतील कफ जाळतात आणि अस्वस्थतेपासून आराम देतात. हे उपाय फुप्फुस स्वच्छ करण्यास मदत करतात.

धूम्रपान आणि धुराचे सेवन टाळा

छातीत रक्तसंचय कमी करण्यासाठी सर्वांत महत्वाचे पाऊल म्हणजे धूम्रपान आणि पर्यावरणीय त्रासदायक घटकांच्या संपर्कात येणे टाळणे. बीएमसी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, सिगारेटचा धूर फुप्फुसातील केसांसारख्या लहान रचनांना नुकसान पोहोचवतो, ज्याला सिलिया म्हणतात.