Home Remedies for Flies in House: पावसाळा सुरू झाला की, हवेत गारवा, धुंद वातावरण, गरमागरम चहा आणि भजी यांचा आनंद काही वेगळाच असतो. पण, या आनंदात एक गोष्ट सतत अडथळा आणते आणि ती म्हणजे घरभर भिरभिरणाऱ्या माश्या. स्वयंपाकघर, हॉल, अगदी बेडरूममध्येही डोक्यावर येऊन बसणाऱ्या या माश्या जीव नकोसा करतात. वरून जर त्या खाण्याच्या वस्तूंवर बसल्या, तर त्यातून पोटाचे विकार आणि रोगराई होण्याची शक्यता अधिक वाढते.

घरात भिरभिरणाऱ्या माश्यांनी डोकं उठवलंय? अगदी स्वयंपाकघरात, जेवणाच्या ताटात आणि कधी तुमच्या डोक्यावरसुद्धा त्या येऊन बसतात? कितीही घरगुती उपाय केले तरी या माश्या काही केल्या पळून जात नाहीत. पण थांबा… सध्या सोशल मीडियावर एक असा उपाय व्हायरल होत आहे, जो केल्यावर माश्या अक्षरशः काही तासांत गायब होतात आणि विशेष बाब म्हणजे त्यासाठी तुम्हाला घराबाहेरही पडावं लागणार नाही.

तुम्हीही असाच त्रास सहन करत असाल आणि बाजारातील अनेक स्प्रे, अगरबत्त्या वापरून कंटाळला असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण- सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट घरगुती उपाय प्रचंड व्हायरल होत आहे, जो करून माश्या काही वेळातच गायब होतात आणि हो, त्यासाठी तुम्हाला कोणतंही महागडं प्रॉडक्ट विकत घ्यावं लागणार नाही. तुमच्या पैशांचीही बचतच होणार आहे. चला तर मग भन्नाट उपाय काय ते जाणून घेऊया..

अशा प्रकारे पावसाळ्यात माश्यांचा त्रास करा कमी, आजारही राहतील लांब

या घरगुती ट्रिकसाठी लागणाऱ्या गोष्टी म्हणजे घरातील वापरले जाणारे युज अ‍ॅण्ड थ्रो प्लास्टिक डबे, थोडं मीठ, डिश वॉश लिक्विड किंवा फॅब्रिक सॉफ्टनर आणि फिनाईलच्या गोळ्या. हे सगळं जवळजवळ प्रत्येक घरात सहज सापडतं.

  • व्हिडीओमध्ये दाखविल्याप्रमाणे सर्वांत आधी युज अँड थ्रो डब्यांच्या झाकणांवर बारीक छिद्रं करा.
  • प्रत्येक डब्यामध्ये अर्धा डबा मीठ टाका.
  • त्यात थोडं डिश वॉश लिक्विड किंवा फॅब्रिक सॉफ्टनर मिसळा आणि एकजीव करा.
  • आता त्यात दोन ते चार फिनाईल गोळ्या टाका आणि झाकण लावून मिश्रण तयार ठेवा.
  • हे डबे घराच्या कोपऱ्यांत, खिडकीजवळ किंवा जिथून माश्या येतात तिथे ठेवा.

या मिश्रणातून येणारा वास इतका प्रभावी असतो की, माश्या काहीच वेळात मरून पडलेल्या दिसतात. त्याचबरोबर घरात एक प्रसन्न सुगंधही दरवळतो. त्यामुळे एअर फ्रेशनरची गरजच भासत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडीओ

शेवटी काय?

हा उपाय अजमावल्यानंतर तुम्हीही म्हणाल– “इतकं सोपं होतं? एवढा त्रास का सहन केला?” तर पावसाळ्याच्या या माशी-युद्धात हा घरगुती उपाय ठरतो ‘ब्रह्मास्त्र’. एकदा नक्की करून पाहा आणि परिणाम बघून स्वतःच आश्चर्यचकित व्हा!