होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने आपली लोकप्रिय बाइक ‘CB युनीकॉर्न 150’ अपडेट करुन पुन्हा एकदा भारतीय बाजारात उतरवली आहे. अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम(एबीएस) या नव्या फीचरचा या बाइकमध्ये समावेश करण्यात आला आहे. एप्रिल महिन्यापासून भारतात वाहनांसाठी नवे सुरक्षा नियम लागू होणार आहेत. त्यानुसार अनेक कंपन्या आपल्या गाड्या अपडेट करत आहेत.

Honda CB Unicorn 150 मध्ये सिंगल-चॅनल एबीएस आहे. याशिवाय बाइकला ट्युबलेस टायरने अपडेट केलं आहे. बाइकच्या पुढील चाकाला 240mm डिस्क ब्रेक देण्यात आला असून एबीएस फीचर यासोबतच देण्यात आलं आहे. तर मागील चाकाला 130mm ड्रम ब्रेक सेटअप देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त बाइकमध्ये अन्य कोणतेही बदल केलेले नाहीत.

indian railways irctc rpf caught 21 people in ac coach without tickets from bhagalpur district of bihar
रेल्वेमधून विनातिकीट प्रवास करताय? मग ‘हा’ VIDEO पाहाच, तुम्हालाही भरावा लागू शकतो ‘इतका’ दंड
Hyundai Aura
बाकी कंपन्या पाहतच राहिल्या; देशातील बाजारात ‘या’ स्वस्त सेडान कारचा जलवा; झाली दणक्यात विक्री, मायलेज २२ किमी
bmrcl
मळलेले कपडे, तुटलेली शर्टाची बटणं पाहून तरुणाला मेट्रोतून प्रवास करण्यापासून रोखलं, बंगळुरू मेट्रोची असंवेदनशीलता
Kanjurmarg metro car shed, MMRDA, additional space
एमएमआरडीए कांजूरमार्गमधील जागेच्या प्रतीक्षेतच, कारशेडसाठी अतिरिक्त जागेची राज्य सरकारकडे मागणी

78 हजार 815 रुपये(दिल्ली एक्स-शोरुम) इतकी नव्या ‘B युनीकॉर्न 150’ ची किंमत ठेवण्यात आली आहे. आधीच्या बाइकपेक्षा अर्थात एबीएस फीचर नसलेल्या जुन्या बाइकपेक्षा या बाइकची किंमत 6 हजार 500 रुपयांनी जास्त आहे. कंपनीची ही बाइक देशात बऱ्याच वर्षांपासून विकली जात असून मागणी अधिक असल्यामुळे कंपनीने 160cc इंजिनऐवजी 150cc इंजिनसह सादर केली आहे. या बाइकमध्ये 149.2cc, सिंगल-सिलिंडर इंजिन असून हे इंजिन 8,000rpm वर 12.91hp ची पावर आणि 5,500rpm वर 12.80Nm टॉर्क जनरेट करतं.