लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : चेष्टा मस्करीतून एकाच्या पायावर पेट्रोल टाकून जळती काडीपेटी टाकली. भडका झाल्याने तरुणाचा पाय होरपळला असून, शेजाऱ्यांनी पायावर चादर टाकल्याने तरुण बचावला. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी शुभम पवार आणि मयूर भुंबे (रा.सहकारनगर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत बापू जालिंदर खिलारे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी पवार, भुंबे आणि खिलारे एकाच वसाहतीत राहायला आहेत. खिलारे कामावरुन घरी निघाले होते. त्यावेळी वसाहतातील एका मुलाच्या दुचाकीच्या टाकीत पाणी शिरले होते. दुचाकी आडवी करुन टाकीतील पाणी खिलारे काढत होते. टाकीतील पेट्रोल त्याने बाटलीत काढून ठेवले होते. यावेळी शेजारी थांबलेले आरोपी पवार आणि भुंबे यांनी चेष्टामस्करीत बाटलीतील पेट्रोल पायाजवळ शिंपडले आणि पेटती काडी टाकले.

आणखी वाचा-“पाणी वाटपासाठी महिलांना पैसे दिले” म्हणणाऱ्या रवी राणांना रोहित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “एवढा खर्च केला असेल, तर…”

पायावर पेट्रोल पडल्याने भडका उडला. ही घटना पाहताच वसाहतीतील एका तरुणीने घरातील चादर खिलारेंच्या पायावर टाकली. या घटनेच खिलारेंच्या पायाला दुखापत झाली.